नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल

admin's picture
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे
पंचप्राण 

शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक 

 

युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१७) आयोजित

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल

 
            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे. 
 
        पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ४ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे चवथे वर्ष.
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकरी आत्महत्त्या" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री राजीव जावळे (जालना), प्रा. अविनाश अवचट (नागपूर), श्री हेमंत वकारे (वर्धा), श्री बाबासाहेब अवचार (परभणी)
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
 
अनु
लेखनविभाग
 
लेखक/कवी
जिल्हा
लेखाचे/कवितेचे शिर्षक
कथा
प्रथम
क्रमांक
गंगाधर मुटे 
वर्धा
कथा
व्दितिय
क्रमांक
अर्चना लाड
सांगली
कथा
तृतीय
क्रमांक
सिद्धेश्वर इंगोले
बीड
अनुभवकथन
प्रथम
क्रमांक
रामेश्वर अवचार
परभणी
ललितलेख 
प्रथम 
क्रमांक
डॉ विशाल इंगोले
बुलडाणा
ललितलेख
व्दितिय
क्रमांक
विनिता माने पिसाळ
पुणे
ललितलेख
तृतीय 
क्रमांक
संयोगिता चव्हाण
सांगली 
वैचारिक लेख
प्रथम
क्रमांक
रवींद्र कामठे
पुणे
वैचारिक लेख
व्दितिय
क्रमांक
पंकज गायकवाड
पुणे 
१०
वैचारिक लेख
तृतिय
क्रमांक
किरण डोंगरदिवे
बुलडाणा
११
पोवाडा
प्रथम
क्रमांक
रंगनाथ तळवटकर
वर्धा
१२
गझल
प्रथम
क्रमांक
संध्या पाटील
सातारा
१३
गझल
व्दितिय 
क्रमांक
निलेश कवडे
अकोला
१४
गझल
तृतिय
क्रमांक
आत्माराम जाधव
परभणी
१५
गीतरचना
प्रथम
क्रमांक
रविपाल भारशंकर
वर्धा
१६
गीतरचना
व्दितिय
क्रमांक
महेश देसले
नासिक
१७
गीतरचना
तृतिय
क्रमांक
चित्रा कहाते
नागपूर
१८
छंदमुक्त
कविता
प्रथम
क्रमांक
रवींद्र दळवी
नासिक
१९
छंदमुक्त
कविता
व्दितिय 
क्रमांक
केशव कुकडे
बीड
२०
छंदमुक्त
कविता
तृतिय
क्रमांक
राजेश जौंजाळ
वर्धा
२१
छंदोबद्ध
कविता
प्रथम
क्रमांक
संदीप गुजराथी
नासिक
२२
छंदोबद्ध
कविता
व्दितिय
क्रमांक
रावसाहेब जाधव
नासिक
२३
छंदोबद्ध
कविता
तृतिय
क्रमांक
प्रदीप थूल
बीड
२४
पद्यकविता
प्रथम
क्रमांक
रमेश बुरबुरे
यवतमाळ
२५
पद्यकविता
व्दितिय 
क्रमांक
के.एन.साळुंके
धुळे
२६
पद्यकविता
तृतिय
क्रमांक
सुशांत बाराहाते
वर्धा
२७
कविता
प्रथम
क्रमांक
धीरजकुमार ताकसांडे
वर्धा
२८
कविता
व्दितिय
क्रमांक
डॉ. शरयू शहा
मुंबई
२९
कविता
तृतिय
क्रमांक
अनिकेत देशमुख
अकोला
३०
अभंग
प्रथम
क्रमांक
श्रीकांत धोटे
वर्धा
३१
कविता
उत्तेजनार्थ
स्वरुपाराणी उबाळे
डोबिंवली
३२
कविता
उत्तेजनार्थ
किशोर झोटे
औरंगाबाद
३३
वैचारिक
लेख
उत्तेजनार्थ
रमेश खांडेभराड
जालना
शेतकरी आत्महत्त्या : कारणे आणि उपाय
Congrats
Congrats
Congrats Congrats Congrats Congrats
 
 
 
 
     

Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram

आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
पारितोषिकाचे स्वरूप : 

मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके

पारितोषिक वितरण :

  1. ३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.

  2. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.

  3. पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.

                   गंगाधर मुटे
                     अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

Share

प्रतिक्रिया