बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel
काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.

हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
शेतकरी गीत
काव्यप्रकार: 
नागपुरी तडका

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                                   - गंगाधर मुटे

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. अवश्य ऐका.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया (9)

वाहव्वा मुटे साहेब

संपादक's picture

मिसळपाववरील parag p divekar यांचा प्रतिसाद

वाहव्वा मुटे साहेब

एकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.
शब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.

शेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.

वाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.

लय भारी!!

संपादक's picture

मिसळपाववरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद

लय भारी!! एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.

कविता अत्यंत घणाघाती

संपादक's picture

फेसबुकवरील फेस बुके यांचा प्रतिसाद

आपली ही वीर रसातील कविता अत्यंत घणाघाती की काय म्हणतात,तशी वाटली.मनापासून अभिनंदन.

पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट !

आता हे काही मनाला पटले नाही.पौरुष हे असतेच.त्याचे 'घुट' कशाला लावावे लागतात?हे समजले नाही.मला तर आधी व्हिस्कीचे घुट आहेत की काय असे दिसले.आता माझी दृष्टी थोडी अधू आहे,त्याला माझा नाईलाज आहे.आपली कविता सध्याच्या ज्वलंत परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरावी.मला ओघातच लहानपणी वाचलेली कविता आठवली.शिरवाडकरांची-

"मोरासारखा छाती काढून उभा रहा.
तिच्या नजरेत नजर घालून पहा.
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...

प्रेम कर भिल्लासारखं,बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं!"(कुसुमाग्रज)

आता यात ओळी थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील.तर एवढे क्षम्य असणारच.आता ही कविता मला का आठवली हा एक महान दुर्बोध प्रश्नच आहे.कदाचित या प्रतिक्रियेइतकाच.तर ते अर्थातच असो. एक चांगली कविता!
आपल्या वाड:मय शेतीत कवितांचे असेच मनमुराद पिक येवो ही शुभेच्छा.धन्यवाद.

कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय.

संपादक's picture

मिसळपाववरील सौंदर्य यांचा प्रतिसाद

तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.

तुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.

खूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.

अजुन वीररस संपला नाही.

संपादक's picture

मिसळपाववरील अभिजीत राजवाडे यांचा प्रतिसाद

हल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.
कविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

नागपुरी तडका बाकी जोरदरा झालाय.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

लई भारी..तुफानी,

अनिलमतिवडे's picture

मुटेजी,
लई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता !
या ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही. स्मित

अनिल

अ‍ॅक्शनपॅक्ड कविता

संपादक's picture

मायबोलीवरील देवनिनाद यांचा प्रतिसाद.

सणसणीत आणि तितकीच एक अ‍ॅक्शनपॅक्ड कविता ... वा !! मुटेसाहेब ..

मस्त!! अप्रतिम

अतुल कडलग's picture

एकदम मस्त झाला आहे नागपुरी तडका !!! ..

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *