Gazal

Sandhya Patil's picture
लेखनप्रकार: 
लेखनप्रकार निवडा
लेखनविभाग: 
गझल

प्रश्न सारे संपले का आत्महत्तेने तुझ्या
रक्त कुठले पेटले का आत्महत्तेने तुझ्या

राहुनी तू अर्धपोटी पोसले त्यांना तरी
ते उपाशी झोपले का आत्महत्तेने तुझ्या

मांडला आक्रोश ज्यांनी हा तुझ्या प्रेतापुढे
दुःख त्यांचे गोठले का आत्महत्तेने तुझ्या

पंचनामा सांगतो की बेवडा होता निघा
हे खुलासे वाचले का आत्महत्तेने तुझ्या

निर्विकारी लोक त्यांनी झाकली तोंडे तरी
बिंग त्यांचे फोडले का आत्महत्तेने तुझ्या

बायको पोरे उपार्‍शी जाहली बेघर तुझी
छञ त्यांना लाभले का आत्महत्तेने तुझ्या

फोडला होता चितेवर ऐक हंबरडा तिने
प्राण अपुले सोडले का आत्महत्तेने तुझ्या

घेउनी पदरात उठली पोर मोठ्या जिद्दिने
हे तिचे बळ वाढले का आत्महत्तेने तुझ्या

जायचे तर शासणाचे दार ठोठावून जा
एवढेही ऐकले का आत्महत्तेने तुझ्या

रोज चर्चा रोज फतवे कर्जमाफीची हमी
हे मुखवटे फाडले का आत्महत्तेने तुझ्या

प्रा. सौ. संध्या पाटील
साधना विद्यालय व
आर, आर, शिंदे .ज्यु. काॅलेज
हडपसर पुणे२८

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! CongratsCongrats