नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

क्रांतकळी

Dr. Ravipal Bharshankar's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

जीवन सारे कळलेले
परिपूर्ण अजूनी ना वळलेले ।।धृ।।

त्या दिवशी उमलली क्रांतकळी
त्या रात्री निद्रा पेटवली
त्या सोन सकाळी गहीवरले
जीवन सारे कळलेले.. ।।१।।

त्या दिवशी सागर कोसळला
त्या रात्री नौका जलभरली
त्या सोनसकाळी ओसरले
जीवन सारे कळलेले.. ।।२।।

त्या दिवशी सारे नभ भिजले
त्या रात्री धरती तळमळली
त्या सोनसकाळी डबडबले
जीवन सारे कळलेले.. ।।३।।

त्या दिवशी शेतकरी मावळला
त्या रात्री शेती थरथरली
त्या सोन सकाळी हळहळले
जीवन सारे कळलेले.. ।।४।।

Share

प्रतिक्रिया