बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel

shetkari

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.
लेखनप्रकार शीर्षक लेखक वाचने प्रतिसाद साहित्यप्रकार
वाङ्मयशेती असा आहे आमचा शेतकरी गंगाधर मुटे 31 0 वाङ्मयशेती
वाङ्मयशेती गाय,वाघ आणि स्त्री गंगाधर मुटे 54 0 वाङ्मयशेती
चित्रफ़ित हृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके गंगाधर मुटे 119 0 भावगीत
अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे संपादक 51 1 समीक्षण
कृषिजगत कापसाचा उत्पादन खर्च. गंगाधर मुटे 194 0 वाङ्मयशेती
काव्यधारा क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११ गंगाधर मुटे 102 0 मराठी गझल
काव्यधारा शाप आदीमायाशक्तीचा......! गंगाधर मुटे 71 1 कविता
काव्यधारा हात घसरतो आहे गंगाधर मुटे 79 0 मराठी गझल
काव्यधारा ते शिंकले तरीही.....! गंगाधर मुटे 65 0 मराठी गझल
काव्यधारा अ आ आई गंगाधर मुटे 77 0 बालकविता
शेतकरी गीत हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट गंगाधर मुटे 506 9 नागपुरी तडका
काव्यधारा बत्तीस तारखेला गंगाधर मुटे 135 3 मराठी गझल
लेख प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती गंगाधर मुटे 241 1 वाङ्मयशेती
लेख कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! गंगाधर मुटे 476 27
लेख सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध गंगाधर मुटे 219 3 वाङ्मयशेती
गणपतीची आरती गंगाधर मुटे 180 6 आरती
काव्यधारा माझी ललाटरेषा गंगाधर मुटे 106 5 मराठी गझल
काव्यधारा मी मराठी - स्पर्धा विजेती कविता गंगाधर मुटे 318 7 मराठी गझल
वाङ्मयशेती स्वप्नरंजन फार झाले गंगाधर मुटे 98 2 मराठी गझल
काव्यधारा अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक गंगाधर मुटे 97 0 मराठी गझल
वाङ्मयशेती आयुष्याची दोरी गंगाधर मुटे 101 1 कविता
लेख मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा गंगाधर मुटे 268 12 वाङ्मयशेती
वाङ्मयशेती शेतकरी पात्रता निकष गंगाधर मुटे 162 1

समिक्षण

हत्या करायला शीक गंगाधर मुटे 243 1
काव्यधारा उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ......! गंगाधर मुटे 72 0 कविता

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी ...!!

म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली ...!!

                                   - गंगाधर मुटे
--------------------------------------
(कविश्रेष्ठ सुरेश भटांचा क्षमाप्रार्थी)
--------------------------------------

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!

                                      - गंगाधर मुटे
-----------------------------------------

मग हव्या कशाला सलवारी ?

हव्या कशाला सलवारी ?

भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
मग हव्या कशाला सलवारी ?

नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढीगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ....!

टकमक बघू द्या बघणार्‍यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेऊ द्या घेणार्‍यांना
सुखावू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
नव्या युगाची मी नारी ...!

स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी ...!

                       - गंगाधर मुटे
-------------------------------

बिपाशाले लुगडं

             बिपाशाले लुगडं

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला..॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला..॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला..॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेऊन, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं
त्याच्या पुढचा एपीसोड, राहूनच गेला..॥४॥

                                          - गंगाधर मुटे
.....................................................................
           -: ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली. बंदी = पूर्णं
आवमाय = अगबाई, मांगं = मागे

नावकूल = पुर्णपणे.
....................................................................