बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel

K-H

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.
काव्यप्रकार शीर्षक कवी प्रतिसाद वाचने प्रकार
शेतकरी गीत शीक बाबा शीक संपादक 0 140
शेतकरी गीत हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट गंगाधर मुटे 9 612
काव्यधारा पलाट साडेबाराचा - आगरी गझल डॉ.कैलास गायकवाड 1 160
काव्यधारा च्यायला बुडवा हा सहकार Ghanwat 1 158
शेतकरी गीत आयुष्य कडेवर घेतो गंगाधर मुटे 0 131
शेतकरी गीत आम्ही शेतकरी बाया संपादक 0 150
शेतकरी गीत डोंगरी शेत माझं गं संपादक 0 192
शेतकरी गीत वरुणा ! वरुणा ! डॉ.श्रीकृष्ण राऊत 5 186
बळीराजाचे ध्यान ....!! गंगाधर मुटे 0 137 शेतकरी गीत
सजणीचे रूप ...!! गंगाधर मुटे 0 93 शेतकरी गीत
हताश औदुंबर गंगाधर मुटे 0 91 शेतकरी काव्य
आईचं छप्पर गंगाधर मुटे 0 104 शेतकरी काव्य
औंदाचा पाऊस गंगाधर मुटे 0 92 शेतकरी काव्य
रे जाग यौवना रे....!! गंगाधर मुटे 0 80 शेतकरी गीत
शेतकरी मर्दानी...! गंगाधर मुटे 0 105 शेतकरी गीत
नंदनवन फ़ुलले ...!! गंगाधर मुटे 0 107 शेतकरी काव्य
ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 0 119 शेतकरी गीत
रे नववर्षा गंगाधर मुटे 0 71 शेतकरी गीत
चाहूल नवःउषेची गंगाधर मुटे 0 94 शेतकरी गीत
हक्कदार लाल किल्ल्याचे…! गंगाधर मुटे 0 136 शेतकरी गीत
गंधवार्ता गंगाधर मुटे 0 89 शेतकरी गीत
धकव रं श्यामराव गंगाधर मुटे 0 85 नागपुरी तडका
कसे अंकुरावे अता ते बियाणे? गंगाधर मुटे 0 120 मराठी गझल
स्मशानात जागा हवी तेवढी गंगाधर मुटे 0 95 मराठी गझल
मोरा मोरा नाच रे गंगाधर मुटे 0 106 बडबडगीत

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *

ऊठ ऊठ शेतकरी बाळा

ऊठ ऊठ शेतकरी बाळा, तोड रे पैंजणचाळा
भूमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ...!

ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या का रे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ...!

तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
घामदाम गिळण्यासाठी, घारी-गिद्ध होती गोळा
दूध-दही कोण प्याले? तुझ्या ताटी ताक आले
चातुर्याला हिरेमोती, श्रम मातीमोल झाले
ठेवुनिया ताठ कणा, मना... शोध रे कारणा ...!

आई करी शेण-गोठी, भात गहू भरती कोठी
दुरडीला सांजी नाही, झोपी जाते अर्धापोटी
भुईवरी घाम सांडी, कापुसबोंड कांडोकांडी
मलमली कोण ल्याले? तिची उघडीच मांडी
समजुनी घे धोरणा, मना... शोध रे कारणा .....!

कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?
काळी आई का बंधना? मना... अभय दे कारणा ..!

                                   - गंगाधर मुटे
------------------------------------------------

वरुणा ! वरुणा !

वरुणा ! वरुणा !                    मिठाच्या कणाला
तुझ्या डोळ्यातून                  झोंबू दे भाकर ;
झरू दे करूणा !                     मुंगीच्या सणाला
                                           सांडू दे साखर.
गाईच्या पोटाला                
हिरवा चारा दे ;                     तहानेचे बुंद
चिमण्या ओठाला                 खुरात साचू दे ;
दुधाच्या धारा दे.                  मुळांचा आनंद
                                          शेंड्यात नाचू दे.

                                        - श्रीकृष्ण राऊत
------------------------------------------------

              आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेऊन गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

                                       - साने गुरुजी
---------------------------------------------

डोंगरी शेत माझं गं

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून
पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून
आम्ही मरावं किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडंना
टीचभर पोटाला,
हातभर देहाला जपावं किती?

अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास
एकीचं निशाण हाती

- नारायण सुर्वे
---------------------------------------