नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मातीतल्या बियाला

ravindradalvi's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

कविता :- मातीतल्या बियाला

साधाच प्रश्न केला मातीतल्या बियाला
का? उगतोस बाबा पुन्हा इथे मरायला
उगलास की, येतो अंगावर काटा
रात्र रात्र लागत नाही
डोळ्याला डोळा
कितीही पेरलं तरी
हाती फक्त बोळा
ईथे माझेच मला उमजत नाही
त्यात तुझा घोर
भरवश्यावर तुझ्या
अजून उजवली नाही पोर
सांभाळतांना तुला
भरडला जातोय मी
अस्मानी सुलतानी शुक्लकाष्ठाने
एवढे करूनही जगला वाचलास की
टपूनच असतात लांडगे
कळपा कळपाने
मग पोटच्या गोळ्याची पाहून तगमग
माझाही सुटतो धीर,
अन् तू कमावता होण्याच्या आशेवर, कोसळते वीज
तेव्हा ऐक माझं
रहा गपगुमान पडून
होऊ दे बोंबाबोंब
उसळू दे आगडोंब
तसही तुझं कोण करतं मोल
जो तो लावतो तुझी बोली
बिनभावांनच साजरी करावी लागते इथे
दिवाळी अन् होळी
तेव्हा, हो बिनधास्त, एखाद्या निष्पाप पाखराच्या चोचीतला दाना
सांगू दे त्याला, तुझ्या न येण्याची कहाणी जगाला
येऊ दे, तुझी आत्महत्या रोखल्याचं पुण्य फळाला

रवींद्र अंबादास दळवी नाशिक

Share

प्रतिक्रिया