नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सिंगापूरची सफर

Rajesh Jaunjal's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

सावकार दरबारी, टोंगळे टेकवू टेकवू
त्याचा टोंगळ्यावर पँट फाटला होता,
ए.सी.तल्याना तो, सलमानचा अंदाज वाटला होता.

याच्या दारिद्र्यात, त्यांना फँशन दिसत होती
तणावात लावली असेल,घोटभर जराशी
काहींना ती, त्याची ऐश वाटत होती.

जात होता तो, यमाच्या विमानात बसून
बघ्यांना ती, सिंगापूरची सफर भासत होती
जेव्हा पांढरी पब्लिक, स्टेडियममध्ये क्रिकेट बघत होती

यमदरबारातली काळीकुट्ट चीअरलीडर,
म्रुत्यूचे तांडव करून, याच्यासमोर नाचत होती.

राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा

***************************

Share

प्रतिक्रिया