बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel

B-H

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
प्रकाशन दिनांक लेखनप्रकार शीर्षक लेखक साहित्यप्रकार
20-01-12 शेतकरी संघटक शेतकरी संघटक २१ जानेवारी २०१२ श्रीकान्त झाडे
20-01-12 योद्धा शेतकरी What went wrong with Independence? chapter - 5 - Sharad Joshi संपादक
20-01-12 काव्यधारा आमची शरणागती विश्वजीत गुडधे काव्यधारा
20-01-12 योद्धा शेतकरी What went wrong with Independence? - Sharad Joshi - chapter-4 संपादक
11-01-12 योद्धा शेतकरी What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi संपादक
10-01-12 योद्धा शेतकरी खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने संपादक
06-01-12 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ श्रीकान्त झाडे
03-01-12 आंदोलन कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी निवृत्ती कडलग
31-12-11 चित्रफ़ित हृदय तोड दे - दगा जर दिला - कारावके गंगाधर मुटे भावगीत
30-12-11 अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे संपादक समीक्षण
22-12-11 चित्रफ़ित अन्न सुरक्षा कायदा - स्टार माझा चर्चा संपादक
22-12-11 योद्धा शेतकरी शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार संपादक
21-12-11 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक २१ डिसेंबर २०११ श्रीकान्त झाडे
14-12-11 आंदोलन प्रतिविधानसभा - वृत्तांत संपादक
06-12-11 शेतकरी संघटक शेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११ श्रीकान्त झाडे
04-12-11 ध्वनीफ़ित रिटेल परकीय गुंतवणूक संपादक
30-11-11 शेतकरी संघटना शेतकर्‍यांची प्रति विधानसभा संपादक
27-11-11 आंदोलन कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली संपादक
26-11-11 काव्यधारा जात्यावरील ओव्या Malubai जात्यावरची गाणी
22-11-11 शेतकरी संघटक शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०११ श्रीकान्त झाडे
20-11-11 आंदोलन वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन संपादक
18-11-11 कृषिजगत कापसाचा उत्पादन खर्च. गंगाधर मुटे वाङ्मयशेती
16-11-11 शेतकरी संघटना राजू शेट्टींनी उस आंदोलनाचे नुकसान केले संपादक
15-11-11 शेतकरी संघटना कापूस उत्पादक परिषद नांदेड संपादक
14-11-11 आंदोलन १९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक संपादक

मायमराठीचे श्लोक

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                      - गंगाधर मुटे
----------------------------------
(वृत्त-भुजंगप्रयात)

---------------------------------

स्टार माझा TV - Vdo
ब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता
स्टार माझा TV - प्रसारण
दिनांक - २७ मार्च २०११
 

----------------------------------------

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

                                - सुरेश भट
-------------------------------------
रानमेवा काव्यसंग्रह

वाचण्यासाठी क्लिक करा.

------------------------------------------

हाण त्याच्या टाळक्यात

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                      - गंगाधर मुटे
----------------------------------------

----------------------------------------