नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

हिरवंं सपान

Chitra Kahate's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गीतरचना

" हिरवंं सपान "

माया कुंंकवाचा धनी
काया मातीत राबतो ।
घाम त्यो गायतो
हिरवंं सपान पह्यतो ।

कायजाले ओरबाडे त्याच्या
भुईच्या या भेगा ।
काया पोतीची रे आन
आता बरस तू मेघा ।
कव्हा सजन शिवार
त्याचीवाट त्यो पाह्यतो ।।
घाम त्यो गायतो ......

जव्हा फुलते पर्‍हाटी
दिसे बरफाची खाण ।
माया भरल्या संंसारा
नसे सुखाची रे वान ।
पिक दारी येई तव्हा
डोये त्यो गायतो ।।
घाम त्यो गायतो......

माया धनी ह्यो किरसान
दुनियेचा अन्नदाता ।
त्याच्या जोडीनंं खपीन
किती देशील तू दगा ?
समद्याच्या पोटापाण्याची
त्यो कायजी वाह्यतो ।।
घाम त्यो गायतो.....

चिञा कहाते
नागपूर

Share

प्रतिक्रिया