नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मरणगीत

प्रदीप थूल's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

उन चीड चीड करते आकाशात अति।
बळीच्या आसवांनी भिजली धरती।।१।।

थंडी पावसात दिवसांत रात्री।
श्रमाला पारावार नाही, ना आरामाची खात्री।।२।।

हृदयात वेदना दुःखाच्या, मनात आशेच्या वाती।
पोसु शकेल का प्रपंच, अशी उरात भिती।।३।।

पीक येवून ही, बाजार नाडवतो किती।
माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या किती हो गती।।४।।

कर्ज माफी झाली, तरी गेली नाही साडेसाती।
पैसा एक नाही हाती, ना माझ्या खाती।।५।।

धनधान्य पीकवून ही देशोधडीला माती।
चहा विकून लोकं मात्र झाले देशाचे पती।।६।।

वाटे अन्याया शिवाय काहीच नाही जगती।
आकाश पातळ सारेच शेतकऱ्याचे मरणगीत गाती।।७।।

Share

प्रतिक्रिया