बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel

SS

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.
लेखनप्रकार शीर्षक लेखक वाचने प्रतिसाद शेवटचा प्रतिसादsort icon
शेतकरी संघटक शेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०१२ श्रीकान्त झाडे 37 0 2 दिवस 14 तास
शेतकरी संघटना वर्धा जिल्हा शेतकरी संघटना स्वभाप - जि.प. निकाल संपादक 26 0 3 दिवस 15 तास
योद्धा शेतकरी जग बदलणारी पुस्तके संपादक 56 0 4 दिवस 14 तास
योद्धा शेतकरी अंगारमळा - आत्मचरित्र संपादक 63 0 १ आठवडा 3 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? संपादक 9 0 १ आठवडा 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? chapter - 11 संपादक 15 0 १ आठवडा 5 दिवस
लेख What went wrong with Indian Independence? chapter - 10 संपादक 10 0 १ आठवडा 6 दिवस
शेतकरी संघटक शेतकरी संघटक ६ फेब्रुवारी २०१२ श्रीकान्त झाडे 59 0 2 आठवडे 2 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? chapter - 9 संपादक 18 0 2 आठवडे 4 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? chapter - 8 संपादक 15 0 2 आठवडे 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? chapter - 7 संपादक 13 0 2 आठवडे 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Indian Independence? chapter - 6 संपादक 22 0 2 आठवडे 6 दिवस
शेतकरी संघटक शेतकरी संघटक २१ जानेवारी २०१२ श्रीकान्त झाडे 104 0 4 आठवडे 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Independence? chapter - 5 - Sharad Joshi संपादक 27 0 4 आठवडे 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Independence? - Sharad Joshi - chapter-4 संपादक 40 0 4 आठवडे 5 दिवस
योद्धा शेतकरी What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi संपादक 56 0 6 आठवडे 9 तास
योद्धा शेतकरी खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने संपादक 56 0 6 आठवडे १ दिवस
शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ श्रीकान्त झाडे 84 0 6 आठवडे 5 दिवस
आंदोलन कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी निवृत्ती कडलग 46 0 7 आठवडे १ दिवस
योद्धा शेतकरी शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार संपादक 117 2 8 आठवडे 5 दिवस
शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक २१ डिसेंबर २०११ श्रीकान्त झाडे 100 0 9 आठवडे 15 तास
आंदोलन प्रतिविधानसभा - वृत्तांत संपादक 114 0 10 आठवडे 5 तास
शेतकरी संघटना शेतकर्‍यांची प्रति विधानसभा संपादक 164 5 10 आठवडे 4 दिवस
शेतकरी संघटक शेतकरी संघटक ६ डिसेंबर २०११ श्रीकान्त झाडे 145 0 11 आठवडे 3 दिवस
आंदोलन कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली संपादक 99 0 12 आठवडे 3 दिवस

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी

नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥ 

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर 
टायरचे खेटर पायामधी..॥२॥ 

तुळशीहार जणू घामाचीच धार 
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥ 

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या 
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥ 

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा 
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥ 

आरतीला नाही त्याची रखुमाई 
चारतसे गाई माळरानी..॥६॥ 

राजा शेतकरी बळीराज यावे 
संघटित व्हावे अभयाने..॥७॥ 
                        - गंगाधर मुटे
-------------------------------
           गंधवार्ता

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता

                   - गंगाधर मुटे

शीक बाबा शीक

शीक बाबा शीक

शीक बाबा शीक लढायला शीक

कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक

लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ईक
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख
मागं मागं नको पुढं सरायला शीक
आत्महत्या नको हत्या करायला शीक

कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं
बुडिविती त्याचा कधी करिती ना घोरं
तुला टाळून जाणार्‍याला आडवायला शीक
घेतलेली कर्जं सारी बुडवायला शीक

उंटावून शेळ्या हाकी सरकारं शहाणं
त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण
तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शीक
तूच दिली सत्ता त्याला पाडायला शीक

जातील हे दिस आणि होईलही ठीक
उद्या तुझा शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टीक
हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक

                          - इंद्रजित भालेराव
------------------------------------

सजणीचे रूप

रुपये पाहता लोचनी।
सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा।
म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी।
परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप।
पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा।
डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                     - गंगाधर मुटे

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||

लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||

शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||

                           - गंगाधर मुटे
.................................................
प्रतिसाद लिहा

बरं झालं देवा बाप्पा...!!

बरं झालं देवा बाप्पा...!!

सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥धृ॥

कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी
कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥

कधी चालुनिया येते कहर अस्मानी
विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी
कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥

इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले
शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले
पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ..॥३॥

                                           - गंगाधर मुटे
.....................................................................
.
.
.
हताश औदुंबर

ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे
.
पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे
.
दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                         - गंगाधर मुटे
------------------------------------------