नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

मोती असे गळाले..

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

जेव्हा जेव्हा झाली अवकृपा तोंडचे पाणी पळाले
सवय झाली जिंदगीला कित्येक मोती असे गळाले ||धृ||

व्यवस्था तर भलतीच चालली आहे माजत
धर्म असुन नाही कुणी कुणास पाणी पाजत
लुटारुही आम्हा नाही लुटण्यासाठी लाजत
ढिले झाले तार आता विणाही नाही वाजत
कितीतरी ओले जीव असेच विनाकारण जळाले||१||

झुंजलो वादळाशी प्राणज्योत नाही विझत
पाऊस पडतोय असा की अंग नाही भिजत
थकलेत सारे शरीर तरी डोळे नाही निजत
आपलीच डाळ आपल्या घरी नाही शिजत
भांडवलशाहीच्या जात्यात मजूर लागलेत दळाले||२||

लागवडीचा खर्चही आता नाही शेती काढत
डोंगर कर्जाचा दिवसेंदिवस चालला वाढत
मरणघडी येईस्तोवर राहायचे असेच नाडत
शासनयंत्रणा जित्यापनीच आहे आम्हा गाडत
या गंभीर विकाराला सरकारने वरपांगी पडताळले||३||

शोधतो प्रीतीची किरणं कुठे पाझरततात
अश्रूंच्या थेंबातून कशी काव्य उमलतात
वाट बघतोय कोण आम्हाला हृदय देतात
नव्यानेच श्वासांची नवी भेट घेऊन येतात
मृत्यू कुणा आवडतो जर जीवनाचे दान मिळाले||४||

Share

प्रतिक्रिया