नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

श्याम सावळासा :अंगाईगीत

गंगाधर मुटे's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
श्याम सावळासा

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरुपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

                                - गंगाधर मुटे
...............................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...............................................................................

Share

प्रतिक्रिया

 • संपादक's picture
  संपादक
  बुध, 23/05/2012 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

  फेसबूकवरील स्वामीजी निश्चलानंद यांचा प्रतिसाद

  मुटेसाहेब....
  शब्दांची जादूच केलीत....!
  "जरासा जरासा, जरा साजरासा...!!"
  केवळ एक अक्षर इकडचे तिकडे नेऊन अफलातून श्लेष साधला आहे...

  आणि आपल्या बाळाचं कौतुक करताना आईच्या होणाऱ्या द्विधा मन:स्थितिचं अत्यन्त सुरेख दर्शन आपण या ओळीचा ध्रुवपदासारखा वापर करून घडवलं आहे...!
  एकीकडे आईला आपला बाळ हा सावळा श्याम, गोजिरा चन्द्र, हासरा विठू किंवा सुंदर राम वाटतो.... तेच वर्णन ती एकेका कडव्यात गाते.... आणि क्षणभरात जणु भानावर येत तिला तो "जरासा जरासा" आणि "जरा साजरासा" असा आपला चिमणा बाळ दिसायला लागतो.... ती ध्रुवपदाच्या त्या विलक्षण ओळीवर येते...!!

  आईच्या या मन:स्थितिचं असं विलोभनीय दर्शन घडवत या रचनेनं काव्यात्मकतेची वेगळीच उंची गाठली आहे.... !!
  अद्भुत !!


 • प्रद्युम्नसंतु's picture
  प्रद्युम्नसंतु
  शुक्र, 15/06/2012 - 23:20. वाजता प्रकाशित केले.

  गंगाधरजी: ग्रेट. मजा आली.

  प्रद्युम्नसंतु


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  बुध, 24/04/2013 - 12:44. वाजता प्रकाशित केले.

  प्रद्युम्नसंतु,

  आज तुमची प्रकर्षाने आठवण झाली. Sad

  देव तुमच्या आत्म्यास शांती प्रदान करो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! Sad

  शेतकरी तितुका एक एक!