नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

admin's picture

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

Share

प्रतिक्रिया

 • Andi2702's picture
  Andi2702
  रवी, 08/10/2017 - 03:21. वाजता प्रकाशित केले.

  लय दिवसान
  लय नवसान
  लागलय आभाळ गाया
  धरणी आईची माया
  जाते काय सोयाबीन वाया

  (संकलित)


 • Andi2702's picture
  Andi2702
  रवी, 08/10/2017 - 03:46. वाजता प्रकाशित केले.

  एका मालवणी माणसाक
  गणपती प्रसन्न झालो,
  गणपतीन त्येका इचारल्यान...
  " काय व्हया तुका ता माग..?"
  तो मालवणी म्हणालो की "देवा महाराजा माका Nano
  व्हयी...."
  गणपती म्हणालो " आवशिक खाव्
  व्हरान, nano व्हयी तुका..
  मीया उंदरा वरुन फिरतय,
  माझो बापूस नंदि वरुन फिरता,
  माझी आव्स वाघा वरुन फिरता,
  माझो भावस मोरा वरुन फिरता..
  आणि तुका वाटता काय मीया तुका nano
  देयन..?.."

  जोक हयच संपना नाय...
  त्यावर ह्यो मालवणी देवाक लय
  भारी उत्तर दिता.. तो म्हणता..
  देवा महाराजा "मग मी विंचू वर
  बसान फिराक तयार आसय..
  माका एक scorpio दी रे महाराजा......

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  सोम, 09/10/2017 - 14:49. वाजता प्रकाशित केले.

  पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
  जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
  .
  .
  ....
  .
  .
  .
  .
  .
  "एक गाणं म्हणू का?"!!!!!!!

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  मंगळ, 24/10/2017 - 22:06. वाजता प्रकाशित केले.

  एक मुंबईकर, पुण्यातील सदाशिव पेठेतील माणसाला विहीर विकतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईकर, त्या पुणेकराला भेटतो व सांगतो की मी माझी फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, तुला पाणी हवे असल्यास पाण्याची किंमत मोजावी लागेल. यावर पुणेकर म्हणतो की अहो मीच तुम्हाला भेटणार होतो माझ्या विहिरीत जे तुमचे पाणी आहे ते दोन दिवसात काढून घ्या नाहीतर तुम्हाला पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल.
  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 27/10/2017 - 20:29. वाजता प्रकाशित केले.

  एका पेट्रोल पंप मध्ये काम करणाऱ्या मुलाची भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. पहिल्या सामन्यात अॉस्ट्रेलिया विरुद्ध त्याला ओपनिंग बॉलिंग देण्यात आली. बॉलिंग टाकण्याआधी स्कोरबोर्ड कडे बोट दाखवत तो डेविड वार्नर ला म्हणाला
  .
  .
  .
  झिरो बघा

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 27/10/2017 - 20:56. वाजता प्रकाशित केले.

  मेंदू हा २४ तास काम करत आसतो.
  तो फक्त दोनदाच बंद पडतो.

  १:-परीक्षेच्यावेळी...
  .

  .
  आणि
  .
  .
  २:- बायको पसंद करताना

  (संकलित)


 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 28/10/2017 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

  8 वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो....

  पप्पा, साडू-साडू म्हणजे काय....?
  .
  .
  वडील: एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक....!
  ********
  आई, जावा जावा म्हणजे काय ग?
  "मालकी हक्क दिला जाईल" ह्या आश्वासनावर एकाच कंपनीत वेठबिगार ठेवलेल्या दोन मजूर बायका

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 03/11/2017 - 14:43. वाजता प्रकाशित केले.

  बायकोलॉजी.

  एक सोपी उपाय

  बायकोची कटकट सुरु झाली की एक काम करायचं...

  बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक missed call ठोकायचा..

  एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...

  " नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते...

  तास दीड तास चिंता नसते आपल्याला !
  कटकट थांबलेली असते ...

  आणि आपण निर्धास्त होतो.

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शनी, 04/11/2017 - 16:02. वाजता प्रकाशित केले.

  परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात...........

  बाकी नवरा बायको वगेरे सर्व अंधश्रद्धा आहेत.

  (संकलित)


 • विनिता's picture
  विनिता
  सोम, 06/11/2017 - 16:10. वाजता प्रकाशित केले.

  भारीच सर्व विनोद


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 06/11/2017 - 16:16. वाजता प्रकाशित केले.

  तुम्ही पण विनोद टाकत चला, स्वागत आहे. Thumbsup

  शेतकरी तितुका एक एक!


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 10/11/2017 - 21:14. वाजता प्रकाशित केले.

  IN A BANK

  CUSTOMER: मॅडम,
  मला चेक डिपॉझिट करायचा
  आहे कधीपर्यंत क्लिअर होईल?

  BANK कर्मचारी : सर 2 ते 3 दिवस लागतील .

  CUSTOMER: दोन्ही बँक समोरासमोरच आहेत ना ?
  मग एवढा उशीर का ??

  Bank कर्मचारी : सर procedure follow
  कराव्या लागतात ....
  For example .....
  जर समजा तुमचा ऍक्सिडेंट स्मशानभूमी समोर झाला आणि तुम्ही मेला तर ..तुम्हाला घरी नेऊन ,पाहुणे रावळे बोलावून,अंत्यसंस्कार ची विधी करून ,अंघोळ घालून आणतील का लगेच स्मशानभूमीत नेतील जाळायला ?

  CUSTOMER : असलं खतरनाक उदाहरण देऊ नका.
  ,जेव्हा क्लिअर व्हायचंय,
  तेव्हा होऊ द्या मी समजलो.

  (संकलित)


 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  गुरू, 15/02/2018 - 16:33. वाजता प्रकाशित केले.

  घरी जाताना व्हाट्सप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही।
  आणि
  आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला, सिरीयलच्या नादात त्यांना पण कळले नाही।

  पुढे... कथा....
  मी चहा पीत असताना तीचा नवरा आला घरात आणि मी दीसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला .. Facebook च्या नादात त्याला कळलच नाही.

  (संकलित)


 • Arvind's picture
  Arvind
  गुरू, 15/02/2018 - 18:37. वाजता प्रकाशित केले.

  शेवटी मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षे अभ्यास करून शेतकरी आत्महत्या वर तोडगा काढलाच....

  मंत्रालयाला लावल्या जाळ्या. Lol


 • Arvind's picture
  Arvind
  शनी, 17/02/2018 - 15:39. वाजता प्रकाशित केले.

  आज पहाटेच नारदमुनी सर्व बायकांच्या स्वप्नात येऊन गेले…

  ते म्हणाले, "आज 'व्हॅलेंटाईन डे' आहे. तुमचा पती तुम्हाला खूप सारे रोमँटिक मेसेजेस पाठवेल… पण त्यामुळे हुरळून जाऊ नका. याचा विचार करा, की हे जे मेसेजेस तो आपल्याला फॉरवर्ड करतोय; ते त्याला कोण पाठवतंय?"

  नाऽरायण नाऽरायण!!
  Smile Smile Smile Smile


 • Arvind's picture
  Arvind
  शनी, 17/02/2018 - 15:22. वाजता प्रकाशित केले.

  This is ultimate..

  Wife (asking in a loving tone): "Honey, Will you build 'Taj Mahal' for me."?

  Husband: "I have already purchased the land. The delay is from your side only...!!!"

  Big-tonge
  Rofl


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 19/02/2018 - 22:08. वाजता प्रकाशित केले.

  नवरा आणि बायको जेवण करत असतात

  …. नवरा : ए ऐक ना ….

  बायको ; जेवताना बोलू नये ….

  थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर

  बायको : हं …. आता बोल.

  नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
  तू झुरळ खाल्लंस
  लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!

  (संकलित)

  शेतकरी तितुका एक एक!