नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे.
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल.
प्रतिक्रिया
वडिलांनी मुलाला वीज बिल जमा
वडिलांनी मुलाला वीज बिल जमा करण्यासाठी पैसे दिले...मुलाला काय वाटलं काय माहीत त्याने त्या पैश्याचे लॉटरीचं तिकीट घेतले.बापाने विचारले.. " वीज बिल भरलं का ?कारण उद्या बिल जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. लेकराने घाबरून सांगितले...नाही त्या पैशाने घेतली लॉटरीची तिकिटे, कारण "आपण जिंकू शकतो लॉटरीमध्ये नवीन चमकदार बोलेरो कार" बापाने लय मारला ! दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी घराचे दरवाजे उघडले तेव्हा समोर नवीन चमकत बोलेरो गाडी उभी होती! संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्य आणि उत्सुकतेने पाहत होते. मुलाच्या डोळ्यात सर्वात जास्त अश्रू आले आणि तो खूपच अस्वस्थ दिसत होता..... कारण ती बोलेरो गाडी वीज खात्याची होती.... आणि ते विजेची लाईन कापायला आले होते. बापाने पुन्हा लय मारला! म्हणून गरजेच्या कामांसाठी बिनकामाच्या पोरांच्या भरोशावर राहू नका आणि वेळेवर वीज बिल जमा करा.
रात्री दोन वाजता तावडे हॉटेल
रात्री दोन वाजता तावडे हॉटेल चौकात लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला कोल्हापूरला जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी.. तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा गांधीनगर कडून हळूहळू कोल्हापूर कडे येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. कोल्हापूर जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आलं. आपण मनुष्य वस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. त्याच वेळी समोरून, हायवेच्या दिशेने एक वेगात कार आली. कारच्या प्रखर प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा तर चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि मार्केट यार्ड च्या कमानी जवळ जाऊन बसला. पाऊस संपला. पहाटेचे पाच वाजले तरी तो कमानी जवळच बसून राहीला. तर समोर एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग बोलता बोलता रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला नी ब ब बडवायला सुरुवात केली . अस्सल कोल्हापूरी शिव्यांचा पाऊस पण सुरु होताच.. याला कळेना आपल्याला हा का मारतोय.. त्याने कसं तरी विचारलं ... मी काय केलं..? तर रिक्षावाला म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू रांडच्या त्यात बसला होतास व्हय.. तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली... : DD
.
.
.
.
हसलात ना हसायलाच पाहिजे.
भावानो जीवन सुंदर आहे .
गुरुजी : बंड्या आज डब्याला
गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
बंड्या : हो देईल…
गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून
मी बोट दाखवत Bus Bay (बस बे)
मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?
म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत.
Facebook Link
शेतकरी तितुका एक एक!
एक पोरगी वावरामधी दिसली होती,
शेतकरी तितुका एक एक!
एक बेवडा गच्चीतून खाली पडला.
एक बेवडा गच्चीतून खाली पडला.
आजुबाजुचे धावत आले आणि
विचारले...
“काय रे काय झाले”?
बेवडा : काही माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय…
शेतकरी तितुका एक एक!
पुणेरी नवरा :- अगं, ऐकलस का?
पुणेरी नवरा :- अगं, ऐकलस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा…
पुणेरी बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार??
कोल्हापुरी पाहुणा : न्हाई मी हितचं जेवणार
पुणेरी बायको : डबा घेऊनच आलाय काय?
कोल्हापुरी पाहुणा : व्हय… भरून पण न्हेणार हाय….
प्रत्येक वेळी पुणेच जिंकते, असे नाही. कधी कधी कोल्हापूर सुद्धा जिंकत्येय.
चोर चोरी करायला येतो तेव्हा
चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं - “फोडण्याचा प्रयत्न करू नका... फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पोलिस त्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो,
"आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे."
एक दिवस मास्तर पैसे काढायला
एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले… तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले.
मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला. आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता.
मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता, सांगा त्यांना गुरुजी आले होते..!!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण