

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
कविता/गझल वृत्त - सुमंदारमाला
लगावली - लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
अतिशय उत्तम
अतिशय उत्तम कविता आहे.
मनःपूर्वक अभिनंदन. कविता आहेच
मनःपूर्वक अभिनंदन. कविता आहेच अप्रतिम. :)
विश्वजितजी, बिरबलजी धन्यवाद.
विश्वजितजी, बिरबलजी
धन्यवाद. :)
शेतकरी तितुका एक एक!
अभिनन्दन
नमस्ते सर,
कविता खुप छान आहे.
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
ह्या ओळि खुप आवड्ल्या.
अभिनंदन मुटेसाहेब
मुटेसाहेब,
पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन :)
सुंदरच लिहिता तुम्ही , पण कवितेत गावाला एवढ्या प्रभावीपणे प्रकट केल्याबद्दलही आपले मनापासून अभिनंदन :)
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मुटेसाहेब, पहिल्या क्रमांकाचे
मुटेसाहेब,
पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
फारच सुंदर गझल लिहिलि तुम्ही.
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
ह्या ओळि खुप आवड्ल्या.
मालुताई, सागरजी मनःपूर्वक
मालुताई, सागरजी, सुरेशजी
मनःपूर्वक धन्यवाद.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन
खूपच छान गझल आहे सर !
मनापासून अभिनंदन करतो.
मुक्तविहारी
धन्यवाद सर
मनपूर्वक आभारी आहे. :R:
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1984188664939145
शेतकरी तितुका एक एक!
अप्रतिम आहे सर.....
क्या बात है......लाजवाब
R.A.Burbure
आभारी आहे
मनपूर्वक आभारी आहे. *Ramram*
शेतकरी तितुका एक एक!
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings