![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय - आंतरजाल लेखन स्पर्धा २०१६
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६ विभाग : अ) पद्यकविता
|| चल आता ||
वेगळा संसार मांडू, चल आता
दुष्काळात तेरावा हा, चल आता ||
नाही घरामंदी दाणा पाणी भाकरी
करू रोजंदारीवर नोकरी, चल आता ||
ते देणार आपल्याला वेगळा विदर्भ
मराठवाडा पण घेऊ मागून, चल आता ||
जमिनीत पेराया बियाण नाही पाऊस नाही
उगाचच ग मारायच्या फुशारक्या, चल आता ||
सरकारबी आहे तसं लई ग शहाण बरका
पाचवारी वाटत्यात फुकट तिकड, चल आता ||
झाकू पाचवारीत लाज विदर्भ मराठवाड्याची
दिस न का थोडी पाठ न पोटरी, चल आता ||
मागितल्यावर मिळतंय का व्ह्य हे समद
उगाच आपल्या तोंडाला पाने पुसती, चल आता ||
थांबवायच्या आहेत आपल्यास्नी आत्महत्या
वाडीवाडी वर जावून देवू शहाणपणा, चल आता ||
महाराष्ट्र काय विदर्भ काय मराठवाडा काय
वेगळे जरी झाले तरी आपलेच ना, चल आता ||
शेतकरी तो शेतकरीच राहणार आहे बरका
काळ्या आईचं पांग फेडावयाचेत, चल आता ||
येतील मागे आपल्याही ही पांढरी भुते कशी
लाव फाळास तू लेखणी वावरात, चल आता ||
मनगटात बळीच्या आहे अजून बळ हत्तीच
घेऊन ये नांगर करू मशागत पिकांची, चल आता ||
आहे माझा पूर्ण विश्वास ह्या निसर्ग राजावर
ठरवू देत त्याला विभाजन हे तू, चल आता ||
रविंद्र कामठे
रविंद्र किसनराव कामठे
पत्ता: प्लॉट नं. ६, स्वाती सोसायटी
“गुरुसद्न”, धनकवडी, पुणे – ४११०४३.
संपर्क क्र - भ्रमणध्वनी : +९१ ९८२२४ ०४३३०
विरोप पत्ता (ई-मेल) – ravindrakamthe@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
चल आता!
सुंदर! सुरेख!!
धन्यवाद
छान
छान
पाने