नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धरोनीया आस,
खाऊ दोन घास,
मग गळ्या फास,
कशासाठी......१
राबु रात्रंदिन,
नाही करु सण,
मारोनीया मन,
तसाच जगु.......२
करु काही काम,
गाळु खुप घाम,
घामाचे रे दाम,
मिळवुया.........3
येऊ दे संकट,
लढायचे थेट,
भरायचे पोट,
स्वाभिमाने........४
संकटाची वाट,
आहे घनदाट,
होईल रे भेट,
सुदिनाची........५
मन होते छिन्न,
न व्हायाचे खिन्न,
उपाय रे भिन्न ,
शोधायाचे.........६
लाथाडतो देव,
त्याले आणु खेव,
मरणाचे भेव,
विसरुया......७
इवलीशी पोरं,
का लावावा घोर,
मग गळा दोर,
कशासाठी........८
समजुनी वागु,
हक्कासाठी जागु,
सन्मानाने जगु,
सकळांसाठी......९
असे हे विचार,
सारु आता दुर,
पालटवु नुर,
जगण्याचा........१०
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने