या, एक वेळ अवश्य भेट द्या.
नमस्कार मंडळी,
आज मिती वैशाख कृ.६ रोज सोमवार दिनांक २३ मे २०११. आकाशात ढग गर्दी करायला लागलेले. रोहिनी नक्षत्राचे आगमन अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपलेले. अशा या मंगलदायी शुभपर्वावर "बळीराजा डॉट कॉम" या संकेतस्थळाचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद होत आहे.
शेती विषय केंद्रस्थानी ठेऊन एखाद्या शेतकर्याने एखादे मराठी संकेतस्थळ निर्माण करून ते चालविणे तसे फ़ारच जिकिरीचे काम आहे. मुद्रीत माध्यमातील लेखन वाचण्याशी सुद्धा जेथे हाडाच्या शेतकर्याचे हाडवैर आहे तेथे संगणकिय तंत्रमाध्यमात शेतकर्यांना सामील करून पुढील वाटचाल करणे किती महाकठीण काम आहे, याची आम्हांस जाणिव आहे. मात्र परिश्रम आणि चिकाटीने हे कार्य सुरू ठेवल्यास, त्यासाठी तंत्रज्ञान विषयक शिबीर आयोजित करून शेतकरीपुत्रांना प्रशिक्षण दिल्यास, प्रचार आणि प्रसार केल्यास जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना या उपक्रमात सामिल करून घेता येईल, असा विश्वास आहे.
अनादीकाळापासून ज्या समाजाच्या पिढोन्-पिढ्या स्वत: अबोल राहून इतरांचे ऐकण्यातच गेल्या, त्या समाजाला बोलते करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करायचा "बळीराजा डॉट कॉम" या संकेतस्थळाचा मानस आहे. या कामात आपणासर्वांनी आशिर्वाद आणि सक्रिय सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आहे.
या संकेतस्थळाच्या निर्मीतीत श्री राज जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल "बळीराजा डॉट कॉम" च्या वतिने मी व्यक्तिश: आभार मानतो. यापुढेही तांत्रीक सहाय्य त्यांचेकडून वेळोवेळी उपलब्ध होत राहिन अशी आशा बाळगतो.
या संकेतस्थळाच्या व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी श्री. प्रमोद देव(मुंबई) आणि श्री. नवनाथ पवार (औरंगाबाद) यांनी स्विकारली असून त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यात "बळीराजा डॉट कॉम" उत्तरोत्तर प्रगती आणि निहित उद्दिष्टप्राप्तीकडे वाटचाल करेल, याची खात्री आहे.
या मित्रांनो,
काळ्याआईच्या कष्टकर्यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्यांनो,
हक्कासाठी लढणार्यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.
* * * * * *
प्रतिक्रिया
अभिनंदन!
अभिनंदन मुटेसाहेब! तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलात की ते कार्य तडीस नेईपर्यंत स्वस्थ बसू शकत नाही..हे,ह्या संकेतस्थळाच्या निर्मितीने तुम्ही प्रत्यक्षपणे दाखवून दिलंय. हे संकेतस्थळ ज्या मूळ उद्देशाने तुम्ही सुरु केले आहे तो पूर्ण होण्यासाठी, आपले सुशिक्षित शेतकरी बांधव इथे येऊन आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण लवकरात लवकर सुरु करोत हीच सदिच्छा!
संकेतस्थळ सुरळित सुरु राहावे ह्यासाठी माझ्याकडून शक्य असेल ती सर्व मदत मी आपणाला देईन अशी हमी देतो.
धन्यवाद!
धन्यवाद देवसाहेब. खरे तर
धन्यवाद देवसाहेब.
खरे तर संकेतस्थळनिर्माण वगैरे विषय माझ्यासाठी फारच नविन आहे, पण तुमच्यासारखी काही मंडळींची भरीव मदत होणारच, याच खात्रीने मी सुरूवात केली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
सुरुवात खुप छाण केलिय मुटे
सुरुवात खुप छाण केलिय मुटे साहेब.
माझ्या सारख्या नवख्या आणी मनात आलेल्या शब्दांना येथे वाट तरि मोकळी करता येईल.
नक्कीच मनातील भावना व्यक्त
नक्कीच मनातील भावना व्यक्त करा. स्वागत आहे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण