नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमस्कार मंडळी,
२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले. आता दुसर्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात. आणि कामाला लागुयात.
पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
प्रतिक्रिया
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून नुकतीच विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ लेखनस्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचा विषय आव्हानात्मक असल्याने फ़ारशा प्रवेशिका येणार नाहीत, असा अंदाज होता पण समाधानकारक प्रवेशिका आल्यात.
प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2015 येथे उपलब्ध आहे.
सर्वांना सहभागी होता यावे म्हणून संचालक मंडळ आणि परिक्षक मंडळाची स्थापना करणे थांबवले होते. आता प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असल्याने पुढचे काम सुरू करायचे आहे.
शेतकरी तितुका एक एक!
शुभेच्छा
शुभेच्छा :hurray:
संभाव्य तारीख
दुसर्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे.
काही कच्चे प्रारुप खालील प्रमाणे :
१) संभाव्य तारीख : २० व २१ फेब्रुवारी २०१६
२) संभाव्य स्थळ : नागपूर
३) संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे.
त्यांचेकडून स्विकृती आल्यानंतर अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल.
शेतकरी तितुका एक एक!
छान
छान
ABSSS2
पहिल्या साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता सर्वप्रथम आपले अभिनंदन
एक नियोजनबद्ध दर्जेदार संमेलन चोख पार पडले.
दुस-या साहित्य संमेलनासाठी काही मुद्दे . . .
1. मा. शरदराव जोशी यांच्या जीवनावर आधारीत शेतकरी चळवळी च्या इतिहासाची चित्र प्रदर्शणी यंदा आयोजित करता येऊ शकते.
2. शेती शेतकरी शेतीमातीच्या कथा या विषयावर एखाद्या कथाकथनाचा समावेश करता येऊ शकतो ग्रामीण कथाकाराचा एक छोटा कार्यक्रम ठेवता येऊ शकतो
3. पहिल्या संमेलनातील परिसंवादाच्या विषयात विविधता होती दुस-या संमेलनातील परिसंवादांसाठी काही विषय सुचवावे वाटतात
* शेती अर्थसंकल्प आणि सरकारी शेतकरी धोरण
* आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यात कृषी विद्यापीठे कुठे कमी पडली?
* शेतकरी आत्महत्या कारणे, उपाय
* शेती विषयक साहित्याचे बदलते संदर्भ
* शेती शेतक-यांच्या दृष्टीकोनातून मिश्र/खुल्या अर्थव्यवस्थेचे यशापयश
(दुस-या शेतकरी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा!)
धन्यवाद
निलेशजी,
प्रतिसादाबद्दल आणि सुचनांबद्दल धन्यवाद.
आपल्यासुचना महत्वाच्या आहेत. कार्यक्रमपत्रिका तयार करताना यावर आपण सविस्तर चर्चा करूच.
शेतकरी तितुका एक एक!
प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह
नमस्कार,
दुसर्या अ.भा.शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह" प्रकाशित करायचा मानस आहे.
सहभागी कविंनी मुद्रणखर्च सामुहिकपणे शेअर केला तर ते सहज शक्य होऊ शकते.
इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.
- गंगाधर मुटे
--------------------------------------------
शेतकरी तितुका एक एक!
(विषय दिलेला नाही)
मुटे सर, तुम्ही भरपूर मेहनत
मुटे सर,
तुम्ही भरपूर मेहनत घेताय हे दिसतेय.
आम्ही पण आपला खारीचा वाटा उचलू शकतो.
प्रत्येकाला अंदाजे किती रक्कम द्यावी लागेल ते सांगावे. म्हणजे पुढचे नियोजन करता येईल.
मेल केला आहे.
मेल केला आहे.
शेतकरी तितुका एक एक!
प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह
प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह
नमस्कार,
दुसर्या अ.भा.शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह" प्रकाशित करायचा मानस आहे.
सहभागी कविंनी मुद्रणखर्च सामुहिकपणे शेअर करून हे कार्य तडीस न्यायचे आहे. आतापर्यंत १६ कवी/गझलकारांनी आपला सहभाग नोंदवायची तयारी दर्शविली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी "प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह" काढण्याचा प्रयोग कधीही झाला नाही. त्यामुळे हा काव्यसंग्रह दर्जेदार व्हावा आणि शेतीविषय हाताळणार्या जास्तीत जास्त कवी/गझलकारांच्या रचनांचा या संग्रहात सहभाग असावा, अशी अपेक्षा आहे.
आपण अजून सहभाग नोंदविला नसेल तर कृपया abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा तसेच आपल्या परिचयातील शेतकरी कवी/गझलकारांपर्यंत कृपया ही माहीती पोचवावी.
सहभाग नोंदणीची वाढीव अंतिम तिथी : ०५/११/२०१५
आपल्या सुचनांच्या प्रतिक्षेत!
आपला स्नेहांकित
- गंगाधर मुटे
--------------------------------------------
शेतकरी तितुका एक एक!
सर, हा संदेश व्हॉट्स अॅप वर
सर, हा संदेश व्हॉट्स अॅप वर टाका.
पुढे पाठवता येईल
स्वयंसेवक
२ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन
१) २० व २१ फेब्रुवारी २०१६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन व नियोजनाच्या मदतीसाठी स्वयंसेवक हवे आहेत.
नागपूर येथे निवासी असणार्यांनी व या उपक्रमास सहाकार्य करू इच्छिणारांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.
२) संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पुढील आठवड्यात अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल.
३) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून नुकतीच विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ संपन्न झाली. लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील.
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
अध्यक्ष
शेतकरी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
प्रातिनिधिक शेतकरी कवितासंग्रह
रामराम मंडळी,
“प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहाला” बरा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. किमान १५० कविता तरी यायला हव्या होत्या. असो.
सहभागी होण्यासाठी खालील कवींनी स्विकार कळवला आहे.
कवीचे नाव आणि पुढे कवितांची संख्या :
1 Gangadhar Mute - 6
2 Badiujjama Birajdar - 2
3 deepak chatap - 2
4 raosaheb jadhav - 5
5 sandip mokle - 2
6 Kishor Bali - 1
7 Ravindra Kamthe - 6
8 vinita pisal - 2
9 Sharad Thakar - 1
10 shrikant dhote - 2
11 Dr. Bharshankar - 1
12 ram m roge - 1
13 Raj Pathan - 5
14 nilesh kawade - 1
15 Jawale Rajiv - 2
16 ashok kamble - 1
17 राजीव मासरूळकर - 1
18 विनिता पाटील - 1
19 प्रकाश मोरे - 2
20 ज्योती कदम - 1
21 रवी धारणे - २
22 संघमित्रा खांडरे - २
23 मोरांडे विनोद - 1
24 नजीमखान - 1
२५ Rithe Manisha - 1
२६ Chalke Shivaji -3
२७ Hadwale Vilas - १
एकूण कवितांची संख्या – ५६
*******************************
काव्यसंग्रहाचा दर्जा उंचावण्यासाठी संग्रहात वरिल नवोदित कवी व्यतिरिक्त नामांकित व जेष्ट ५ कवींच्या प्रत्येकी १ याप्रमाणे ५ रचनांचा “निमंत्रीत कवी” म्हणून विनाशुल्क समावेश करावा, असे ठरवले आहे. त्यानुसार श्री ना.धो.महानोर, प्रा. विट्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, डॉ. श्रीकृष्ण राऊत, ज्ञानेश वाकुडकर, शेषराव मोहिते यांचेकडून कविता मागवल्या आहेत.
म्हणजे एकूण ५६ कविता, प्रस्तावना वगैरे धरून ६६ ते ७२ पेजेसचा काव्यसंग्रह तयार होऊ शकेल.
*********************************
शेतकरी तितुका एक एक!
कवीसंमेलन/गझल मुशायरा
कवीसंमेलन/गझल मुशायरा
नमस्कार,
दुसर्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे.या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्यात सहभागी होऊ इच्छीणार्या कवी आणि गझलकारांनी सादर करावयाची रचना आपल्या संपूर्ण माहितीसह abmsss2015@gmail.com या ईमेलवर मेल करावी.
ईमेलवर मेल करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०१५
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : २० व २१ फेब्रुवारी २०१६
स्थळ : वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
नियम, अटी आणि सूचना :
१) शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणार्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने व यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
२) ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी संपर्क साधू नये.
३) वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असणे अनिवार्य आहे. स्टेजवर संधी मिळणार असेल तरच मी येणार, रसिक म्हणून येणे माझे काम नव्हे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी सुद्धा संपर्क साधू नये.
४) कॉमन स्वरूपाची निवास व्यवस्था करण्यात येईल. जेवण, फराळ, चहाची व्यवस्था निशु:ल्क असेल.
५) सहभागींना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाईल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
शुभेच्छा
संमेलनाचे शिंग फुंकले गेले आहे.
एक सुचना - जानेवारीत होणार्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वांनी अवश्य यावे. माझ्या घरी सोय होवू शकेल.
कवीसंमेलनात माझे नांव घ्यावे हि विनंती!
१) शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणार्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने व यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.>> असूदे, आम्ही समजू शकतो.
२) ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी संपर्क साधू नये.>> अगदी अगदी
३) वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असणे अनिवार्य आहे. स्टेजवर संधी मिळणार असेल तरच मी येणार, रसिक म्हणून येणे माझे काम नव्हे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी सुद्धा संपर्क साधू नये.>> तसेच एका कवीने एकच कविता वाचावी. सुरुवात, मध्य आणि शेवट अशा ३/३ कविता वाचून वेळेचा ताळा बिघडवू नये. सुत्रसंचालकाने ह्या गोष्टीकडे लक्ष देवून आळा बसवावा. आधीचे कार्यक्रम लांबल्याने मागच्या वर्षी समारोपाचे भाषण मला अर्धवट टाकून यावे लागले. त्याचे अजून ही वाईट वाटते आहे.
४) कॉमन स्वरूपाची निवास व्यवस्था करण्यात येईल. जेवण, फराळ, चहाची व्यवस्था निशु:ल्क असेल.>> धन्यवाद सर.
सुचनेबद्दल धन्यवाद!
<<<<< एका कवीने एकच कविता वाचावी. सुरुवात, मध्य आणि शेवट अशा ३/३ कविता वाचून वेळेचा ताळा बिघडवू नये. सुत्रसंचालकाने ह्या गोष्टीकडे लक्ष देवून आळा बसवावा. >>>>
नक्की. यावर्षी अधिक काळजी घेतली जाईल. सुचनेबद्दल धन्यवाद!
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप