(लोकमत न्यूज नेटवर्क : दि. ३१/१०/२०१८)
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवशीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तसेच पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पैठण येथील नियोजित संमेलनाचे अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा लोकप्रिय शेतकरी कवी इंद्रजीत भालेराव भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री ऍड सतीश बोरुळकर, पैठण यांनी तर अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री गंगाधर मुटे यांनी ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून खासदार रावसाहेब दानवे, गीताताई खांडेभराड व कैलास तवार उपस्थित राहणार आहेत.
संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून आयोजन समिती अध्यक्षपदी डॉ. अप्पासाहेब कदम, नियोजन समिती अध्यक्षपदी श्री. बाबुराव गोल्डे, व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री. राजीव जावळे, स्वागत समिती अध्यक्षपदी ऍड्. प्रकाशसिंह पाटील आणि सल्लागार समिती अध्यक्षपदी श्री. कडूअप्पा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे, “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे बघितले जात आहे. राज्यातील गेल्या काही वर्षापासून सततच्या नापिकीने शेतीव्यवसाय डबघाईस आला आहे, बिगरशेती उत्पादनाचे बाजारभाव आकाशाला भिडत असताना शेतीमालाचे भाव एकतर स्थिर आहेत किंवा नीचांक गाठत आहे. परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर उपाययोजना शोधण्याच्या संदर्भात तर सारा शुकशुकाट जाणवत आहे.
समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे का उमटत नाही? याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे तर २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे आयोजित करून यशस्वीपणे पार पाडण्यात आले होते.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “मुक्त बाजारव्यवस्थेत शेतीचे भवितव्य’’ “ग्रामीण स्त्री गुलामांची गुलाम” “सनातन शेतीचा चक्रव्यूह” “शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक” “शेतीचे भवितव्य पत्रकारितेच्या नजरेतून” “कर्जमुक्ती शेतीची कि शेतकऱ्याची?” “जनुकीय तंत्रज्ञान : शोध आणि बोध” आणि “लावू पणाला प्राण!” अशा विविध विषयावरील एकूण ८ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, ज्येष्ठ पत्रकार, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया
logo
शेतकरी तितुका एक एक!
आदर्श गावकरी - ३०/१०/२०१८
आदर्श गावकरी - ३०/१०/२०१८
शेतकरी तितुका एक एक!
लोकमत - ३०/१०/२०१८
लोकमत - ३०/१०/२०१८
शेतकरी तितुका एक एक!
फ्लॅक्स
शेतकरी तितुका एक एक!
देशोन्नती - १६/११/२०१८
शेतकरी तितुका एक एक!
भास्कर - १५/११/२०१८
शेतकरी तितुका एक एक!
लोकमत औरंगाबाद
शेतकरी तितुका एक एक!
सह्याद्री टाइम्स -१६/११/२०१८
शेतकरी तितुका एक एक!
MCN News
५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये
https://youtu.be/H_3IVS6cKOo
शेतकरी तितुका एक एक!
Shalini Plus
पैठण येथे भरणार 5 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन
https://youtu.be/OrbkStq7ehY
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप