Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

Share

प्रतिक्रिया

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 12/02/2024 - 21:12. वाजता प्रकाशित केले.

    वडिलांनी मुलाला वीज बिल जमा करण्यासाठी पैसे दिले...मुलाला काय वाटलं काय माहीत त्याने त्या पैश्याचे लॉटरीचं तिकीट घेतले.बापाने विचारले.. " वीज बिल भरलं का ?कारण उद्या बिल जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. लेकराने घाबरून सांगितले...नाही त्या पैशाने घेतली लॉटरीची तिकिटे, कारण "आपण जिंकू शकतो लॉटरीमध्ये नवीन चमकदार बोलेरो कार" बापाने लय मारला ! दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी घराचे दरवाजे उघडले तेव्हा समोर नवीन चमकत बोलेरो गाडी उभी होती! संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्य आणि उत्सुकतेने पाहत होते. मुलाच्या डोळ्यात सर्वात जास्त अश्रू आले आणि तो खूपच अस्वस्थ दिसत होता..... कारण ती बोलेरो गाडी वीज खात्याची होती.... आणि ते विजेची लाईन कापायला आले होते. बापाने पुन्हा लय मारला! म्हणून गरजेच्या कामांसाठी बिनकामाच्या पोरांच्या भरोशावर राहू नका आणि वेळेवर वीज बिल जमा करा. Wink

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 12/02/2024 - 21:16. वाजता प्रकाशित केले.

    रात्री दोन वाजता तावडे हॉटेल चौकात लक्झरी बसमधून तो उतरला. त्याला कोल्हापूरला जायचं होत. पण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. सुनसान रस्त्यावर चिटपाखरू दिसत नव्हतं. रिक्षा मिळणार कशी.. तो चालत राहिला. दुर्दैव असं की त्याच वेळी पाऊस सुरु झाला रस्त्यावरचे लाईट गेले पण सुदैवाने एक रिक्षा गांधीनगर कडून हळूहळू कोल्हापूर कडे येताना दिसली. तिला हात केला रिक्षा थांबायच्या आत तो पटकन रिक्षात बसला. पाऊस जोरात पडायला लागला रिक्षा हळू हळू चालत होती. रिक्षा प्रवासात तो नशिबावर खुश झाला. कोल्हापूर जवळ आल्याचं त्याच्या काळोखातही लक्षात आलं. आपण मनुष्य वस्तीत आलो या विचाराने त्याला सुरक्षित वाटू लागल. त्याच वेळी समोरून, हायवेच्या दिशेने एक वेगात कार आली. कारच्या प्रखर प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून त्याला थंडीतही घाम फुटला रिक्षा तर चालत होती पण ड्रायव्हर सिटवर कोणी नव्हतं. त्याने उसने अवसान आणून रिक्षातून उडी मारली आणि मार्केट यार्ड च्या कमानी जवळ जाऊन बसला. पाऊस संपला. पहाटेचे पाच वाजले तरी तो कमानी जवळच बसून राहीला. तर समोर एक रिक्षा त्याला दिसली त्यात तो बसला पत्ता सांगितला. मग बोलता बोलता रात्रीचा प्रसंग त्याने रिक्षा वाल्याला वर्णन करून संगीतला तर रिक्षा वाल्याने कचकन ब्रेक दाबला त्याला बाहेर ओढला नी ब ब बडवायला सुरुवात केली . अस्सल कोल्हापूरी शिव्यांचा पाऊस पण सुरु होताच.. याला कळेना आपल्याला हा का मारतोय.. त्याने कसं तरी विचारलं ... मी काय केलं..? तर रिक्षावाला म्हणाला माझी रिक्षा काल रात्री भर पावसात बंद पडली म्हणून मी ढकलत आणत होतो. तू रांडच्या त्यात बसला होतास व्हय.. तरीच म्हटलं रिक्षा ढकलताना इतकी ताकद का लावावी लागली... Lol : DD
    .

    .

    Lol
    .

    .

    हसलात ना हसायलाच पाहिजे.

    भावानो जीवन सुंदर आहे . Lol

  • Arvind's picture
    Arvind
    बुध, 21/02/2024 - 16:17. वाजता प्रकाशित केले.

    गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
    गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
    बंड्या : हो देईल…
    गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
    बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:13. वाजता प्रकाशित केले.
    मी बोट दाखवत Bus Bay (बस बे) म्हणालो तर तो म्हणाला... का बसू?

    मी कुणाच्या बापाच्या जागेवर उभा आहे का?

    म्हणून मराठीत "बस स्टॅन्ड" असेच म्हणत चला रे ब्वॉ. नसत्या आफती नकोत. Lol 

     

    #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे

    Facebook Link

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/02/2024 - 11:16. वाजता प्रकाशित केले.
    एक पोरगी वावरामधी दिसली होती, पाह्यली होती
    चिखलामधी पडली होती..... शेणामध्ये भरली होती
    ए...... लाव रे थो व्हिडीओ SSSS

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 25/02/2024 - 05:43. वाजता प्रकाशित केले.

    एक बेवडा गच्चीतून खाली पडला.
    आजुबाजुचे धावत आले आणि
    विचारले...
    “काय रे काय झाले”?
    बेवडा : काही माहीत नाय बुवा,
    मी पण आत्ताच खाली आलोय… Lol Lol

    शेतकरी तितुका एक एक!

  • Arvind's picture
    Arvind
    रवी, 25/02/2024 - 06:08. वाजता प्रकाशित केले.

    पुणेरी नवरा :- अगं, ऐकलस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा…
    पुणेरी बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार??
    कोल्हापुरी पाहुणा : न्हाई मी हितचं जेवणार
    पुणेरी बायको : डबा घेऊनच आलाय काय?
    कोल्हापुरी पाहुणा : व्हय… भरून पण न्हेणार हाय….

    प्रत्येक वेळी पुणेच जिंकते, असे नाही. कधी कधी कोल्हापूर सुद्धा जिंकत्येय. Lol

  • Arvind's picture
    Arvind
    मंगळ, 12/03/2024 - 14:46. वाजता प्रकाशित केले.

    चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं - “फोडण्याचा प्रयत्न करू नका... फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
    ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
    त्यानंतर लगेचच पोलिस त्याला पकडायला येतात.
    तेव्हा चोर म्हणतो,
    "आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे."

  • Arvind's picture
    Arvind
    बुध, 03/04/2024 - 17:51. वाजता प्रकाशित केले.

    एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले… तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
    कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले.
    मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला. आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता.
    मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता, सांगा त्यांना गुरुजी आले होते..!!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 23/10/2024 - 15:21. वाजता प्रकाशित केले.

    मला माझ्या चुकांमधून खूप काही शिकायला मिळालं...

    म्हणुन मी ठरवलंय...
    खूप चुका करायच्या आणि खूप शिकायचं!

    Lol Lol

    शेतकरी तितुका एक एक!

  • Andi2702's picture
    Andi2702
    शनी, 26/10/2024 - 19:58. वाजता प्रकाशित केले.

    नर्स - सर,आपण इतके चिंतेत का ?
    डॉक्टर - काय सांगू ? दुपारी ज्या रुग्णाची शस्त्रक्रिया केली होती,त्याचा मृत्यू झालाय.कारण कळत नाही...
    नर्स - अहो सर, ते तर पोष्टमार्टेम होतं.
    डॉक्टर - खरंच !
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    मग मी सकाळी पोष्टमार्टेम कुणाचं केलं ? Lol Lol

  • Arvind's picture
    Arvind
    शुक्र, 08/11/2024 - 15:42. वाजता प्रकाशित केले.

    बायको म्हणजे पेपरवेट सारखी असते. ती नवऱ्याला फडफडू तर देते पण उडू देत नाही.

    Smile Lol Lol

  • Andi2702's picture
    Andi2702
    रवी, 10/11/2024 - 12:41. वाजता प्रकाशित केले.

    एकदा एस टी त बसलेल्या कॉलेजच्या मुलाला कंडक्टर म्हणाले,
    "हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यात फार पुढे नेईल"

    आनंदाने कॉलेजकुमार म्हणाला,
    " अरे वा! कसे?

    कंडक्टर म्हणाले,
    "तुझा स्टॅाप मागे जाऊन दोन तास झालेत... तू फारच पुढे आला आहेस"

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 06/12/2024 - 21:10. वाजता प्रकाशित केले.

    जर तुम्ही 5 रुपयाच्या पारले ला पार्लेजी म्हणता तर चारशे रुपये किलोच्या लसूनला लसुनजी का नाही म्हणत? कुठे गेले तुमचे संस्कार? Lol Lol

    शेतकरी तितुका एक एक!

  • Andi2702's picture
    Andi2702
    सोम, 09/12/2024 - 15:09. वाजता प्रकाशित केले.

    वर्गशिक्षक :(गणपतरावांना) अहो, तुमचं मुलाकडे काही लक्ष आहे की नाही? तुमचा मुलगा नापास झालाय.
    हे बघा त्याचं प्रगतीपुस्तक.

    इंग्लिश - २०,
    मॅथ्स - १७,
    हिंदी - १४,
    सायन्स - २१,
    इतिहास-भूगोल - २३.
    टोटल - ९५

    गणपतराव :- अरे वा !!
    टोटलमध्ये तर कमालच केलीय की ! कोण शिकवतं हा विषय?

  • Andi2702's picture
    Andi2702
    शुक्र, 13/12/2024 - 18:57. वाजता प्रकाशित केले.

    *बायको* : - *३ किलो वटाणा घेऊ का ?*

    *नवरा*:- *हो* *घेऊन टाक...*
    *त्यात मला काय विचारायाच??*

    *बायको: -*
    *मी तुम्हाला सल्ला नाही विचारला*

    *सोलणार ना इतका वटाणा ?*

    *का कमी घेऊ ?*

  • Andi2702's picture
    Andi2702
    बुध, 18/12/2024 - 20:59. वाजता प्रकाशित केले.
    आधी आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचो..
     
     
     
     
    आता थंड हवा च आपल्याकडे फिरायला येते 
     
     
     
     
     
    अजून किती विकास पाहिजे 
  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 18/12/2024 - 21:26. वाजता प्रकाशित केले.
    यंदा माथेरानला जायचं होतं. कामाच्या व्यापामुळे नाही गेलो. शेवटी माथेरानच माझ्याकडे मुक्कामी आलं.
     
    #अपुन_मानुसच_लैभारी #गंगाधर_मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • Andi2702's picture
    Andi2702
    बुध, 09/07/2025 - 13:40. वाजता प्रकाशित केले.

    एक डॉक्टर के पड़ोसी को नशे की बुरी आदत थी और जम के शराब पीता था।

    डॉक्टर ने एक दिन उसको समझते हुए कहा शराब का नशा आहिस्ता आहिस्ता इंसान को मार देता है।

    नशेड़ी ने मुस्कुराते हुए जवाब दिया तो डॉक्टर साहब मुझे कौन सी करने की जल्दी है?

  • Andi2702's picture
    Andi2702
    बुध, 16/07/2025 - 21:19. वाजता प्रकाशित केले.

    तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?

    ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

    ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

    गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रककलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.
    इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही - सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

    संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळी अवेळी पेटी बडवणा-या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

    नाटकात पहिली भूमीका मिळाली, ती 'नरवीर तानाजी मालुसरे' ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी 'डायरेक्शन' केलेल्या प्रयोगात! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.
    -"मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे,"
    हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत 'डायरेक्शण'केलेले स्मरते.

    सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

    असो; हे विषयांतर झाले.

    विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही.

  • Andi2702's picture
    Andi2702
    रवी, 03/08/2025 - 19:38. वाजता प्रकाशित केले.

    एक सर्वे के अनुसार

    देश की 90 % लड़कियां

    बिना अपने बाप से पूछे ही

    बोल देती हैं कि

    मेरे पापा नही मानेंगे

  • Andi2702's picture
    Andi2702
    रवी, 03/08/2025 - 19:44. वाजता प्रकाशित केले.

    प्रत्येक मानसायाले सिरीयसली घेत जाऊ नोका, काही लोकायच्या इकडे रक्तगटा शिवाय काहीच पॉझिटिव्ह नसते!
    मंग म्हणसाल सांगतलं नाही.....!!

    श्याम ठक
    बार्शिटाकळी (अकोला)

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 03/08/2025 - 19:48. वाजता प्रकाशित केले.

    डास चावतात म्हणून सरसकट गुड नाईट लावण्यापेक्षा कुठले डास चावतात ते शोधून त्यांना मारायला पाहिजे

    शेतकरी तितुका एक एक!

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:25. वाजता प्रकाशित केले.

    कंस, व्यास आणि कर्ण
    हे तिघेजण महाभारतातून
    भूमितीत गेले
    की,
    भूमितीतून महाभारतात आले.

    ....हे माहित नाही, पण
    एक मात्र खरं की
    भूमितीतले मार्क कळले
    की घरी महाभारत घडायचं.

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:26. वाजता प्रकाशित केले.

    माझी बायको
    हॉस्पिटलमध्ये आहे
    असे सांगून एकजण
    गेले ३ महिने माझ्याकडून
    पैसे घेतोय.

    काय आजार आहे म्हणुन,
    काल हॉस्पिटलला गेलो
    तर समजले,

    त्याची बायको "नर्स" आहे

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:26. वाजता प्रकाशित केले.

    रोज "अडानी"च्या
    वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...

    बघ जरा नालायका
    अडाणी असून पैसे कमवतोय,

    तुझा तर एवढे शिकुन पन
    काही उपयोग नाही...मुडद्या...!

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:27. वाजता प्रकाशित केले.

    मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय
    फोन का उचलत नाहीस?

    मी : ( हलक्या आवाजात) लेक्चरमध्ये आहे

    मित्र - कुठे आहे लेक्चर?
    विषय काय आहे?

    मी - लेक्चर घरीच आहे
    मीच विषय आहे

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:28. वाजता प्रकाशित केले.

    एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - तुम्ही मला देव दाखवा

    पुणेकर - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा

    शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल

    पुणेकर - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:29. वाजता प्रकाशित केले.

    कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी
    एका तरुणाकडे आली
    आणि म्हणाली

    "Hi I'm Anushka ,
    1st Year Arts, & you!!"

    युवक ( गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"

    Moral....

    नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला साबण वापरतो।

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:30. वाजता प्रकाशित केले.

    पितळीच्या वाटीला
    कितीही घासा
    ती सोन्याची होत नाही.

    हे वाक्य कुणीतरी

    ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून

    पळून गेलं राव!

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:31. वाजता प्रकाशित केले.

    गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...

    मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
    तर काहीच नाही...

    गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:31. वाजता प्रकाशित केले.

    सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.

    सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत..

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:32. वाजता प्रकाशित केले.

    बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले

    नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

    बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:33. वाजता प्रकाशित केले.

    एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला,...

    Ata tula udya marayala harakat nahi.

    बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.

    कारण तिनं वाचलं..
    आता तुला उद्या मरायला हरकत नाही.

    परंतु मूळ मेसेज होता..
    आता तुला " उड्या मारायला " हरकत नाही

    म्हणून मराठी नेहमी मराठीतूनच लिहावे
    अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 12:33. वाजता प्रकाशित केले.

    यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

    पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .

    किमान शब्दात कमाल अपमान

  • Arvind's picture
    Arvind
    सोम, 11/08/2025 - 20:39. वाजता प्रकाशित केले.

    ओशो यांची कथा आहे. एकदा मुल्ला नसरुद्दीन एक किलो मटण घेऊन येतो. आणि बायकोला तयार करायला सांगून बाहेर जातो.

    बायको सांगितल्याप्रमाणे तयार करते खूपच खमंग छान होते. मुल्लाच्या बायकोच्या तोंडाला पाणी सुटते थोडे थोडे करत ती सगळे खाऊन टाकते.

    मुल्ला घरी येतो आणि बायकोला सांगतो की आता वाढ जेवायला. पाहतो तर जेवणात मटन नाही. मुल्ला विचारतो मटण कुठे गेले?

    तेवढ्यात तिकडून एक मांजर म्याऊ म्याऊ करत येते. मुल्लाची बायको शोहर बदडून काढणार म्हणून घाबरलेली असते. ती म्हणते मांजराने खाल्ले. मुल्ला लगेच उठतो आणि मांजराला पकडून त्याचे वजन करतो, ते बरोबर एक किलो भरते.

    मुल्ला विचारतो हे मांजर असेल तर मटण कुठाय आणि हे मटण असेल तर मांजर कुठाय?

  • Andi2702's picture
    Andi2702
    मंगळ, 12/08/2025 - 19:03. वाजता प्रकाशित केले.

    गुरुजी : काय रे मुन्ना, शाळा ७ वाजता सुरू होते आणि तू ८ वाजता उशिरा का येतोस?

    मुन्ना : काही फरक पडत नाही गुरुजी. तुम्ही माझी वाट पहात नका बसत जाऊ. सुरू करून देत जा.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शुक्र, 15/08/2025 - 10:03. वाजता प्रकाशित केले.

    पालक - झेंडावंदनसाठी किती वाजता यायचंय ?
    शिक्षक - सात वाजता
    पालक - सकाळी ?

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने