

फक्त काटा नशीबात आहे तुला
रंग उधळू नको बाभळीच्या फुला
पेरलेले उगवते कधी ना कधी
गाड मातीमधे जन्म तू आपला
मुक्त आकाश अन् पंख माझे दिले
आणखी मागतो काय माझ्या मुला ?
चित्त साकारते श्रावणाच्या कळा
श्वास देहातल्या पंचमीचा झुला
वाट अवघड जरा ठेव देवा तुझी
शेवटी कोणता मार्ग असतो खुला ?
दिवाकर जोशी
परळी वैजनाथ जि.बीड
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
आपला
कोणता मार्ग असतो "खुला"
सुनिल बावणे
Pages