Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह

केवळ विनोदासाठी

        अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे. 
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल. 

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 23:15. वाजता प्रकाशित केले.

  ह्या वर्षी पहिल्यांदाच असं झालंय की कोरोना मुळे माझी युरोप टुर रद्द झाली ....... Sad Sad Sad
  नाही तर दरवर्षी.......पैशांमुळे रद्द करावी लागायची... Smile Smile Smile

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:15. वाजता प्रकाशित केले.

  अपमान की प्रेम...?

  नवऱ्याने बायकोला विचारले: "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"

  बायको: "दोन्हीही नाही
  मला तुम्हीच आवडता

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:16. वाजता प्रकाशित केले.

  बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरुन उठल्याची बरीच उदाहरणे आहेत...

  पण

  तिने कितीही कटकट केली तरी भरल्या ग्लासावरून उठल्याची इतिहासात नोंद नाही

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 23:17. वाजता प्रकाशित केले.

  महिला :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
  .
  .
  डॉक्टर :- मॅडम, सिटी स्कॅन करावा लागेल.
  महिला :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??

  Lol Lol Lol Lol

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:18. वाजता प्रकाशित केले.

  वाचा व शेवटी गंमत बघा

  खरोखचर आपल्याला दररोज वर्तनामपत्र वाचाचयी खूप आवड असते. वर्तनामपत्रात येणाऱ्या वेगवेवळ्या सामाजिक, आर्थिक क्रीडावियषक बातम्या आणप मनापासून वाचतो तरीपण राजकीय बातम्या राजराकणातले हेवेदावे हे मात्र अधिचक मनापानूस चौकसणपे वाचत असतो.
  .
  .
  .
  .
  .

  परत वाचून किती शब्द चुकीचे वाचले ते मोजा Tongue Wink Smile Lol

 • Arvind's picture
  Arvind
  रवी, 11/10/2020 - 23:19. वाजता प्रकाशित केले.

  सुख म्हणजे नक्की काय असत.................

  ताप नाही
  खोकला नाही
  कसकस नाही.
  ९५ च्या वर ऑक्सिजन लेव्हल आहे.
  चव आणि वास येतोय.
  अजुन काय हवे??? Lol Lol

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 11/10/2020 - 23:20. वाजता प्रकाशित केले.

  चीन मध्ये ABP माझा वर बंदी
  .
  .
  .
  सारखं म्हणत्यात
  उघडा डोळे.... बघा नीट Lol Lol

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  बुध, 11/11/2020 - 22:34. वाजता प्रकाशित केले.

  या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे असे काही भाकित केलेले असल्यास .........

  उगीच स्वतःच्या कर्तृत्वावर खुष होऊ नका........

  तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळी काढण्याचा योग आहे!

  दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा

 • MAHAAN CHAVAN's picture
  MAHAAN CHAVAN
  शनी, 14/11/2020 - 10:00. वाजता प्रकाशित केले.

  Hurray Hurray Hurray

  BABA

  भक्त : - बाबा, मी चांगला शिकलेलो आहे. पण तरीही नोकरी नाही मिळत. लग्नासाठी छोकरी नाही मिळत. काय करू ?
  बाबा : - किती शिकलास ?
  भक्त : - बाबा, मी BA केलंय.
  बाबा : - आणखी एकदा BA कर. दोनदा BA केल्यावर BABA बनशील. भरपूर पैसे कमवशील. मग नको म्हणशील नोकऱ्या. तुझ्यासाठी रांगा लावतील छोकऱ्या.

  - महान चव्हाण

  Big-LOL Big-LOL Big-LOL Big-LOL

  Lol Lol Lol Lol Lol :))) Lol

  MAHAAN CHAVAN

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 15/11/2020 - 17:43. वाजता प्रकाशित केले.

  Lol Lol

  शेतकरी तितुका एक एक!

 • Arvind's picture
  Arvind
  सोम, 04/12/2023 - 21:11. वाजता प्रकाशित केले.
  पत्नी:- कोठे निघालात?
   
  पती:- हॉटेलमध्ये. फुटबॉलची मॅच टीव्ही वर बघायला.
   
  पत्नी:- माझ्याबरोबर का मॅच पहात नाही?
   
  पती:- मला मित्रांबरोबर मॅच बघायची आहे.
   
  पत्नी:- म्हणजे मी तुमच्यासाठी कोणीच नाही का?
   
  पती:- अरे देवा..! ओके, ओके, मी घरीच थांबतो.
   
  पत्नी:- तो गोलकीपर एकटाच का काळ्या ड्रेसमध्ये आहे?
   
  पती:- त्याच्या आईचे निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यासाठी.
   
  पत्नी:- त्या कॉमेंट्रेटरला सगळ्या खेळाडूंची नावे कशी लक्षात राहतात? 
   
  पती:- त्याचा तोच जॉब आहे. 
   
  पत्नी:- अरे व्वा, गोल..!मस्त... हे,हे,हे  .. गोल झाला.
   
  पती:- नाही, दिला नाही गोल. ती ऑफ साइड होती.
   
  पत्नी:- ऑफ साइड म्हणजे काय असते?
   
  पती:- नाही, तो गोलच आहे. मी विनोदाने बोललो.
   
  पत्नी :- ओके. पण ऑफसाइड काय असते?
   
  पती:- ऑफसाइड हे त्या टीमच्या कोचचे नाव आहे.
   
  पत्नी:- पण कोच कोठे आहे?
   
  पती:- तो मैदानाच्या बाहेर बसलेला आहे. 
   
  पत्नी:- मग तो का खेळत नाही?
   
  पती:- नाही, कोच कधी मॅचमध्ये खेळत नसतो. मैदानाबाहेरून तो खेळाडूंना सूचना करतो. त्यांच्यात चेंजेस करतो.
   
  पत्नी:- मला सांगा, मॅराडोना आहे का या मॅचमध्ये?
   
  पती:- नाही. त्याच निधन झालय.
   
  पत्नी:- ओ, माय गॉड. कशाने गेला तो ?
   
  पती:- त्याच्या बायकोबरोबर तो फुटबॉल मॅच बघत होता.

   

  Hurray Hurray
 • Arvind's picture
  Arvind
  बुध, 06/12/2023 - 18:59. वाजता प्रकाशित केले.

  ११९० मध्ये मुली घाबरायच्या की लग्नानंतर सासू कशी मिळेल.
  आणि 
  २०२३ मध्ये सासू घाबरते की सून कशी मिळेल.

  यावरून एक गोष्ट लक्षात येते की, १९९० मध्ये ज्या मुली घाबरत होत्या त्या आजही घाबरत आहे. 

  Wink Wink Wink Wink Wink  Dance Dance Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 08/12/2023 - 21:56. वाजता प्रकाशित केले.

  आज मी दोनशेकोटींचा मालक आहे.

  (एक अंगणात तर दुसरी गच्चीवर पेटवली आहे)

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 09/12/2023 - 02:40. वाजता प्रकाशित केले.

  मी काॅलेजला असताना ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढं काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल, आणि मग तू याला दे, त्याला दे करीत वाटत सुटशील. जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल. तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही.
  हे भविष्य ऐकून मला आनंद झाला.....

  अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी whatsapp बद्दल बोलत होता.

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 09/12/2023 - 18:59. वाजता प्रकाशित केले.

  अच्छा हुआ मरने के बाद कोई मोबाइल साथ लेकर नहीं ले जाते..

  नहीं तो ऊपर पहुंचते ही स्टेटस लगाते ...

  आज यमराज जी का सानिध्य प्राप्त हुआ और पृथ्वी के गहन मुद्दों पर चर्चा की।

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 09/12/2023 - 19:00. वाजता प्रकाशित केले.

  पत्नी:- कोठे निघालात?

  पती:- हॉटेलमध्ये. फुटबॉलची मॅच टीव्ही वर बघायला.

  पत्नी:- माझ्याबरोबर का मॅच पहात नाही?

  पती:- मला मित्रांबरोबर मॅच बघायची आहे.

  पत्नी:- म्हणजे मी तुमच्यासाठी कोणीच नाही का?

  पती:- अरे देवा..! ओके, ओके, मी घरीच थांबतो.

  पत्नी:- तो गोलकीपर एकटाच का काळ्या ड्रेसमध्ये आहे?

  पती:- त्याच्या आईचे निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यासाठी.

  पत्नी:- त्या कॉमेंट्रेटरला सगळ्या खेळाडूंची नावे कशी लक्षात राहतात?

  पती:- त्याचा तोच जॉब आहे.

  पत्नी:- अरे व्वा, गोल..!मस्त... हे,हे,हे .. गोल झाला.

  पती:- नाही, दिला नाही गोल. ती ऑफ साइड होती.

  पत्नी:- ऑफ साइड म्हणजे काय असते?

  पती:- नाही, तो गोलच आहे. मी विनोदाने बोललो.

  पत्नी :- ओके. पण ऑफसाइड काय असते?

  पती:- ऑफसाइड हे त्या टीमच्या कोचचे नाव आहे.

  पत्नी:- पण कोच कोठे आहे?

  पती:- तो मैदानाच्या बाहेर बसलेला आहे.

  पत्नी:- मग तो का खेळत नाही?

  पती:- नाही, कोच कधी मॅचमध्ये खेळत नसतो. मैदानाबाहेरून तो खेळाडूंना सूचना करतो. त्यांच्यात चेंजेस करतो.

  पत्नी:- मला सांगा, मॅराडोना आहे का या मॅचमध्ये?

  पती:- नाही. त्याच निधन झालय.

  पत्नी:- ओ, माय गॉड. कशाने गेला तो ?

  पती:- त्याच्या बायकोबरोबर तो फुटबॉल मॅच बघत होता.

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 20/12/2023 - 20:58. वाजता प्रकाशित केले.

  बीवी ने रोते हुए पति को उठाया

  इस वाक्य में रो कौन रहा है? Lol Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 20/12/2023 - 21:03. वाजता प्रकाशित केले.

  तुम्हाला हिंदी येत असेल तर खालील मराठी वाक्याचे हिंदीमध्ये भाषांतर करून दाखवा.

  माझ्याकडे पाठवलंच नाही. पाठवलं असतं तर चांगलं झालं असतं. Wink  Lol Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 22/12/2023 - 19:22. वाजता प्रकाशित केले.

  सरलाताई खूप हसतमुख होत्या. त्यांचा नवरा मात्र कायम गंभीर चेहऱ्यानं वावरायचा. मैत्रिणीनं विचारलं, 'काय गं कसं जमतं तुमचं?'
  .
  .
  .
  .
  .
  .
  सरलाताई म्हणाल्या, 'लग्नकार्य वास्तूशांतीसारख्या प्रसंगी मी जाते. कोणी आजारी किंवा गेलं असेल तर हे जातात.'

  Wink Wink Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 22/12/2023 - 19:35. वाजता प्रकाशित केले.

  *मुंबईकर* :
  मी अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय...

  *पुणेकर* :
  छान
  मग...?
  खाजवल्यावर वाजते का ?

  Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 23/12/2023 - 15:01. वाजता प्रकाशित केले.

  मी माझ्या स्वतःच्या 3 मोबाईल नंबरचा एक व्हॉट्सॲप गृप बनवलाय.

  कधी समविचारी लोकांशी चर्चा करावीशी वाटली तर तो गृप बरा पडतो. Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 23/12/2023 - 15:05. वाजता प्रकाशित केले.

  पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर राहून घराला हॉस्पिटल नका बनवू. आपल्याला असं वाटतं की, चिडल्याशिवाय, रागवल्याशिवाय आपलं कोणी ऐकणारच नाही. आपण जरी चिडलो तरी लोक मात्र हसायला हवेत आणि आपलं ऐकायलाही हवेत. ही किमया पु.ल. करतात. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा.

  "एकदा मी पुण्याहून कोल्हापूरला एस.टी. ने जायला निघालो. जवळपास एक तासाने थांब्यावर बस थांबली. एक ग्रामीण महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन बस मधे शिरली आणि नेमकी माझ्यासमोर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही सीट्स खिडकी जवळच होत्या. बस सुरू झाली. अर्धा तास झाल्यानंतर तिचं लहान मूल रडायला लागलं. लेकराला सू लागली असावी म्हणून तिने त्याला बाजूलाच सीट खाली उभ केलं आणि त्याला सू s s s सू ss सू ss असं म्हणू लागली. मी माझं पुस्तक वाचण्यात रमलो होतो. पण तिचा तो जप सुरू झाल्याने मी थोडा विचलित झालो. आता पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण त्या बाईचे पोराला सू ss म्हणणं थांबेना आणि ते पोर सू काही करेना. मी आता खूप डिस्टर्ब झालो आणि त्या बाईवर जवळ जवळ ओरडलोच आणि म्हणालो, *"अहो बाई आता हे बंद करा, आता परिणाम माझ्यावर व्हायची वेळ आली आहे."*

  हे ऐकल्याबरोबर कंडक्टर, ड्राइव्हर सह पूर्ण बस हास्य कल्लोळात न्हाऊन निघाली. ताबडतोब बस थांबली. बाई आपल्या बाळाला बाहेर नेऊन त्याला शांत करून पुन्हा माझ्यासमोर येऊन बसली. ते छोट बाळ आणि त्याची आई माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसले... आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा संपूर्ण बस मस्त हसत होती.

  Lol

  स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा आणि व्यस्त रहा...

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 29/12/2023 - 20:25. वाजता प्रकाशित केले.
  तिला ते स्थळ सांगून आलं, मुलाने पसंती कळवली आणि घरातील वातावरणच बदललं. मुलगा सरकारी नोकरीत आहे, हे स्थळ सोडू नकोस असे सल्ले चहूबाजूने तिच्यावर आदळू लागले. 
   
  तिची अवस्था मात्र विचित्र होती. तिचं प्रेम दुसऱ्यावर होतं. काय करावं, ते तिला सुचत नव्हते. अशात एके दिवशी तिला पाहून गेलेल्या सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाचा कॉल आला. त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं. या भेटीत त्याला खरं काय ते सांगून लग्नाला सरळ नकार द्यायचा असा तिने ठाम निश्चय केला. 
   
  दोघेही ठरल्याप्रमाणे एका बऱ्यापैकी रेस्टॉरंटमध्ये भेटली. औपचारिक बोलणी झाली. तो कमालीचा आत्मविश्वासाने बोलत होता.
  त्याच्या दडपणाखाली ती फार काही बोलू शकली नाही. निरोप घेतांना त्याने तिच्या हातात एक सुबक छोटी पेटी ठेवली. 
   
  पण...हे मला काही सांगायचं होतं ! ती चाचरत म्हणाली.
  तो हसला. राहू दे, घरी जाऊन हे बघ आणि सावकाश कळव... 
   
  ती घरी परतली. स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आणि धडधडत्या हृदयाने ती पेटी उघडली.. 
  आत एक नक्षीदार सोन्याची अंगठी आणि एका ओळीची चिठ्ठी होती. 
  चिठ्ठी वाचून ती धाडकन दरवाजा उघडून बाहेर आली आणि ओरडली... 
  आई, बाबा.. मी लग्नाला तयार आहे ! 
  चिठ्ठीत काय लिहिलं होतं, असा प्रश्न पडला असेल ना ? 
   
  तिथे लिहिलं होतं....
   
  मला जुनी पेन्शन योजना लागू आहे !!!!   Lol
 • Andi2702's picture
  Andi2702
  मंगळ, 02/01/2024 - 07:50. वाजता प्रकाशित केले.

  नवरा आणि बायको दोघेही अपघातात वारले…

  नवरा भूत बनला आणि बायको चेटकीण

  काही दिवसांनंतर दोघे पुन्हा भेटले

  बायको - किती वेगळे वाटता भूत बनल्यानंतर…

  नवरा - पण तू अजिबात बदलली नाहीस…
  Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  मंगळ, 02/01/2024 - 12:26. वाजता प्रकाशित केले.

  जत्रेत पाळण्यामधे बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा ऊपाय...
  जाताना दोन-तीन नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे.
  राऊंड सुरु होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं

  तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले…?
  तिकडूनच उडून आले…

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 05/01/2024 - 22:14. वाजता प्रकाशित केले.

  माझ्या नावाने फेक खाते कोणी बनवत नाही. त्यांना माहित्येय की माझे FB फ्रेंडस नवा पैसाही कुणाला देत नाहीत. Lol Lol

  #शुभरात्री_लोक्सहो © गंगाधर मुटे

  शेतकरी तितुका एक एक!

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 12/01/2024 - 19:39. वाजता प्रकाशित केले.
  देवाला माणसाच्या भावनेची कदर आहे,
   
  हे तेंव्हा कळलं....
   
   
   
  जेंव्हा संकष्टी 31 डिसेंबरला न येता 30 ला आली.... 
 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  शुक्र, 12/01/2024 - 19:40. वाजता प्रकाशित केले.
  तिला ते स्थळ सांगून आलं, मुलाने पसंती कळवली आणि घरातील वातावरणच बदललं. मुलगा सरकारी नोकरीत आहे, हे स्थळ सोडू नकोस असे सल्ले चहूबाजूने तिच्यावर आदळू लागले. 
   
  तिची अवस्था मात्र विचित्र होती. तिचं प्रेम दुसऱ्यावर होतं. काय करावं, ते तिला सुचत नव्हते. अशात एके दिवशी तिला पाहून गेलेल्या सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाचा कॉल आला. त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं. या भेटीत त्याला खरं काय ते सांगून लग्नाला सरळ नकार द्यायचा असा तिने ठाम निश्चय केला. 
   
  दोघेही ठरल्याप्रमाणे एका बऱ्यापैकी रेस्टॉरंटमध्ये भेटली. औपचारिक बोलणी झाली. तो कमालीचा आत्मविश्वासाने बोलत होता.
  त्याच्या दडपणाखाली ती फार काही बोलू शकली नाही. निरोप घेतांना त्याने तिच्या हातात एक सुबक छोटी पेटी ठेवली. 
   
  पण...हे मला काही सांगायचं होतं ! ती चाचरत म्हणाली.
  तो हसला. राहू दे, घरी जाऊन हे बघ आणि सावकाश कळव... 
   
  ती घरी परतली. स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आणि धडधडत्या हृदयाने ती पेटी उघडली.. 
  आत एक नक्षीदार सोन्याची अंगठी आणि एका ओळीची चिठ्ठी होती. 
  चिठ्ठी वाचून ती धाडकन दरवाजा उघडून बाहेर आली आणि ओरडली... 
  आई, बाबा.. मी लग्नाला तयार आहे ! 
  चिठ्ठीत काय लिहिलं होतं, असा प्रश्न पडला असेल ना ? 
   
  तिथे लिहिलं होतं....
   
  मला जुनी पेन्शन योजना लागू आहे !!!! Lol Lol 
 • Andi2702's picture
  Andi2702
  सोम, 15/01/2024 - 18:10. वाजता प्रकाशित केले.
  वर्गात भुगोलाचा तास चालू होता, गुरूजी वातावरणा बद्दल माहिती देत होते.
   गुरूजी - आता बघा आपली मुंबई ही समुद्र सपाटीच्या जवळ आहे. पुणे तेवढेच लांब असून ते उंची वर वसले आहे. आता सांगा बघू तुम्ही मुंबईहून पुण्याला जात असाल तर काय काय बदल होतात ?
   
   गण्या - "सर तपमानात घट होते आणि अपमानात वाढ होते.
   
  गुरूजींनी गण्याला जवळ बोलावून पोटाशी धरले!!!!!
   
  गुरुजींची सासुरवाडी पुण्याची!    Lol Lol
 • Andi2702's picture
  Andi2702
  सोम, 15/01/2024 - 18:13. वाजता प्रकाशित केले.
  जत्रेत पाळण्यामधे बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा ऊपाय...
  जाताना दोन-तीन नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे.
  राऊंड सुरु होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं
   
  तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले… तिकडूनच उडून आले…
 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 17/01/2024 - 08:44. वाजता प्रकाशित केले.

  कर्मचारी - सर, मला सुट्टी हवीय.
  मॅनेजर - (रागानं) सुट्टी? कशाला हवीय?
  कर्मचारी - काही नाही सर, एकदा घेऊन तर बघतो कशी असते ती.

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 17/01/2024 - 08:47. वाजता प्रकाशित केले.

  पु. ल. म्हणायचे, घरात गंभीर राहून घराला हॉस्पिटल नका बनवू. आपल्याला असं वाटतं की, चिडल्याशिवाय, रागवल्याशिवाय आपलं कोणी ऐकणारच नाही. आपण जरी चिडलो तरी लोक मात्र हसायला हवेत आणि आपलं ऐकायलाही हवेत. ही किमया पु.ल. करतात. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा.*

  "एकदा मी पुण्याहून कोल्हापूरला एस.टी. ने जायला निघालो. जवळपास एक तासाने थांब्यावर बस थांबली. एक ग्रामीण महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन बस मधे शिरली आणि नेमकी माझ्यासमोर येऊन बसली. आमच्या दोघांच्याही सीट्स खिडकी जवळच होत्या. बस सुरू झाली. अर्धा तास झाल्यानंतर तिचं लहान मूल रडायला लागलं. लेकराला सू लागली असावी म्हणून तिने त्याला बाजूलाच सीट खाली उभ केलं आणि त्याला सू s s s सू ss सू ss असं म्हणू लागली. मी माझं पुस्तक वाचण्यात रमलो होतो. पण तिचा तो जप सुरू झाल्याने मी थोडा विचलित झालो. आता पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली पण त्या बाईचे पोराला सू ss म्हणणं थांबेना आणि ते पोर सू काही करेना. मी आता खूप डिस्टर्ब झालो आणि त्या बाईवर जवळ जवळ ओरडलोच आणि म्हणालो, *"अहो बाई आता हे बंद करा, आता परिणाम माझ्यावर व्हायची वेळ आली आहे."*

  हे ऐकल्याबरोबर कंडक्टर, ड्राइव्हर सह पूर्ण बस हास्य कल्लोळात न्हाऊन निघाली. ताबडतोब बस थांबली. बाई आपल्या बाळाला बाहेर नेऊन त्याला शांत करून पुन्हा माझ्यासमोर येऊन बसली. ते छोट बाळ आणि त्याची आई माझ्याकडे पाहून मिश्कीलपणे हसले... आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला तेव्हा संपूर्ण बस मस्त हसत होती.

  *स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा आणि व्यस्त रहा...*

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 24/01/2024 - 08:39. वाजता प्रकाशित केले.

  एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,

  "अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"

  -

  -

  -

  थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!!

  पत्नी :-

  "अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!l

  मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक उटण्याची व दुसरी हिंगाची...!!

  तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन् तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!

  एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"

  "काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..???

  अरे देवा...!!

  कसं होईल या संसाराचं...???

  काय म्हणावं या माणसाला....??

  बाई बाई बाई ...!!!!

  मी म्हणून संसार करत राहिले...!!

  मुस्कटदाबी सहन करून..!!!

  जळला मेला बायकांचा जन्म...!!

  देवाला रोज सांगते - देवा ! पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!

  देवा पांडुरंगा...!!"

  पती - "अग अग किती किंचाळतेस...??

  तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!

  तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"

  पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!

  तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"

  तात्पर्य .... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!

  बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 27/01/2024 - 12:04. वाजता प्रकाशित केले.

  एका कार्यक्रमात नवऱ्याला एक प्रश्न विचारला,

  तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण झालं...
  आणि तिने तुमच्याशी बोलणं बंद केले तर तुम्ही काय करता????

  मी सरळ किचन मध्ये जातो...
  आणि सर्व बरण्यांची झाकणं घट्ट बंद करून येतो...

  थोड्या वेळाने आवाज येतो..
  अहो, त्या बिछान्यावर लोळत काय पडलात...
  इकडे या हे बघा,

  ह्या बरणीचे झाकणं उघडत नाही ......

  Lol

 • Andi2702's picture
  Andi2702
  शनी, 27/01/2024 - 12:11. वाजता प्रकाशित केले.

  नवऱ्याला तिळगुळ देणे ही *श्रद्धा* आहे! अन तो गोड बोलेल ही *अंधश्रद्धा* आहे. Lol  Lol ही झाली विनोद निर्मिती. पण वरील वाक्यात नवऱ्या ऐवजी बायको शब्द लिहिला की वाक्यातला विनोद झोपी जातो आणि एक धीरगंभीर भयाण वास्तविक वाक्य तयार होते.  

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शनी, 27/01/2024 - 16:01. वाजता प्रकाशित केले.
  मोदींचे कौतुक किंवा विरोध केल्यानंतर वेळ वाचला तर जेवण वगैरे करत जा लोक्सहो!  
  देशाला तुमची भयानक गरज आहे.   Lol
   
  #शुभरात्री_लोक्सहो
   

  शेतकरी तितुका एक एक!

 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  रवी, 28/01/2024 - 11:13. वाजता प्रकाशित केले.
  शाळेत असताना  टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी  नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे....कारण मी हातावरील छडीची घाण पुसत होतो. मी  साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो Wink
   
   
   
   
   
   
   
  माझ्या शालेय दिवसांमध्ये,  माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही  direct सांगायला मला घाबरत असत... Lol
   
   
   
   
   
   
   
  मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे,  माझ हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव  बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत...:))
   
   
   
   
   
   
  कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत...
  उद्देश एकच होता की मी  चांगला fielder बनावा. Smile
   
   
   
   
   
   
   
  परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत. Wink
   
   
   
   
   
   
  कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
   
  कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी  आणि मला  वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.
   
   
   
   
   
   
  शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 
  माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली  मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत  व मैदानाला 5 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.
   
   
  जेंव्हा की बाकी मुलं वर्गात घाम पुसत असत  व कोंडलेल्या वर्गात  गुदमरून शिकत असत. Lol
   
   
   
   
   
   
  मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत.... 
  तू शाळेत का येतोस? ...तुला ह्याची गरज नाहिये...
   
   
   
   
   
   
   
  वाह !!! काय ते सोनेरी दिवस होते.... अजूनही आठवतात मला 
 • A.B.Patil's picture
  A.B.Patil
  रवी, 28/01/2024 - 11:22. वाजता प्रकाशित केले.
  एका ऑफिसमध्ये इंटरव्यू सुरू होता  नोकरी अगोदरच बॉसच्या नातेवाईकाला देण्यात आली होती..,
   
  ..
   
  पण दाखवण्यासाठी तर    इंटरव्यू घेणं भाग होतं
  ...
   
  त्यामुळे असे प्रश्न  विचारले जात होते,   ज्यांची  कहीच उत्तरं  नसतील...
   
   एक एक उमेदवार येत होते, जात होते....!
   
  ...
   
  शेवटी एका पुणेकराचा नंबर आला....!!
   
  ...
   
  इंटरव्यू घेणारा:--- "आप नदी के बीच एक नाव पर हैं, और आपके पास दो सिगरेट के अलावा कुछ भी नही है....!!!
   
  आपको एक सिगरेट जलानी है, कैसे जलाओगे...??"
   
  ☺पुणेकर बराच वेळ सीरियसली विचार करून बोलला,
   
  ...
   
  "सर इस प्रॉब्लेमके तीन-चार सोल्यूशन्स हो सकते हैं......!!"
   
  .... ..
   
  इंटरव्यू घेणारा  आश्चर्यचकित झाला , की  ज्या प्रश्नाचं एकही  उत्तर असू शकत नाही, त्याची तीन-चार उत्तरं कुठून येतील म्हणून...... तो बोलला, "बताओ....!!"
   
  ...
   
  ☺पुणेकराचं पहिलं  अनोखं उत्तर:---
   
  "एक सिगरेट पानी में फेंक दो, then boat will become lighter (हलकी),
   
  और "lighter" से आप सिगरेट जला सकते हैं.....!"
   
  ...
   
  इंटरव्यू घेणारा Shocked.......?
   
  ...
   
  पुणेकराचं  दुसरं भन्नाट उत्तर:---
   
  "Throw a cigaratte up and catch it,
   
  "Catches win the Matches",
   
  using the matches that you win, you can light the cigarette.....!!"
   
  ...
   
  Interviewer was stunned.....??
   
  ...
   
  "सर अभी तो एक उपाय और है......!
   
  Take some water in your hand and drop it,
   
  drop-by-drop.
   
  It will sound like .. Tip..Tip..Tip..Tip..!!"
   
  ...
   
  Interviewer:--- "उससे क्या होगा.....???"
   
  ..
   
  "सर आपने वो गाना नही सुना "टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई....."!!!
   
  ...
   
  इस आग से आप अपनी सिगारेट जला सकते हैं.....!"
   
  "सर अगर ये काफी नही हैं तो अभी भी मेरे पास एक और उपाय है, वह भी सुन लीजिए:---
   
  ...
   
  आप एक सिगरेट से प्यार करने लगिए, दूसरी अपने आप जलने लगेगी.....!!"
   
  ...
   
  इंटरव्यू घेणाऱ्याने उठून पुणेकराच्या पायाला हात लावलाआणि मोठ्ठयाने ओरडला:---
   
  ...
   
  ""रिश्तेदार".......को मारो गोली, नौकरी तो इस पुणेकर को ही मिलेगी.... ये साला कुछ भी कर सकता है"
 • Andi2702's picture
  Andi2702
  सोम, 29/01/2024 - 22:13. वाजता प्रकाशित केले.

  ग्राहक – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?
  विक्रेता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे
  की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 31/01/2024 - 10:32. वाजता प्रकाशित केले.

  जेंव्हा कधी मला आयुष्यात डिप्रेस्ड वाटतं...
  मी माझं Gmail Inbox ओपन करून बसतो.

  मग मला कळतं -

  १) ६ बँका मला इजी लोन द्यायला तयार आहेत.
  .

  २) १०/१५ बँका मला प्री अप्रुव्हड क्रेडिट कार्ड देण्यास उत्सुक आहेत
  .

  ३) मी $१०००००० जिंकलोय, कारण माहित नाही.
  .

  ४) ८-१० कंपन्यांकडे माझ्यासाठी बेस्ट जॉब आहे.
  .

  ५) डॉ.बत्रा माझं हेअर फॉल थांबवण्याचा दावा करतात.
  .

  ६) ५-६ युनिव्हर्सिटी मला कुठल्यातरी सब्जेक्ट मध्ये डिग्री द्यायला रेडी आहेत.
  .

  ७) रिया, नेहा आणि पायल यांना एकाकी वाटतय आणि त्यांना मला भेटायची तीव्र इच्छा आहे,
  .

  अशा साधारण २०-२५ मेल्स आहेत.
  .

  साला... आयुष्यात अजून काय पाहिजे?

 • Andi2702's picture
  Andi2702
  बुध, 31/01/2024 - 18:10. वाजता प्रकाशित केले.

  *लग्न म्हणजे नेमकं काय ?*

  *'लग्न' हे सुंदर जंगल आहे*
  *जिथे 'बहादुर वाघांची' शिकार*
  *"मोहक हरिणी" करतात,...*

  *लग्न म्हणजे -*
  *'अहो ऐकलंत का ?' पासुन ते*
  *'बहिरे झालात की काय ?'*
  *पर्यंतचा प्रवास.*

  *लग्न म्हणजेच -*
  *'तुझ्यासारखे या जगात*
  *कुणीच नाही' पासून ते,*
  *'तुझ्या सारखे छप्पन बघितलेत'*
  *पर्यंतचा प्रवास...*

  *लग्न म्हणजे -*
  *'तुम्ही राहू द्या' पासुन ते*
  *"तुम्ही तर राहुच द्य"'*
  *पर्यंतचा प्रवास ...*

  *लग्न म्हणजे -*
  *'कुठे होती ग माझी राणी' पासून ते*
  *"कुठे मेली होतीस"*
  *पर्यंतचा प्रवास...*

  *लग्न म्हणजेच-*
  *'तुमचे नशीब, मी भेटले तुम्हाला"* *पासुन ते*
  *'मेलं माझंच नशीब फुटकं,*
  *तुम्ही मला भेटलात"*
  *पर्यंतचा प्रवास ...*

  थोडक्यात काय तर -

  *"वैवाहिक जीवन हे काश्मीर सारखे आहे,*

  जे...
  *सुंदर तर नक्कीच आहेच*

  परंतु

  *"दहशत पण जबरदस्त आहे" ...*

  *ही कविता लिहून कवी फरार आहे....*

 • Andi2702's picture
  Andi2702
  गुरू, 01/02/2024 - 08:23. वाजता प्रकाशित केले.

  आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे. Wink

  १. मारल्यावर रडल्या बद्दल,

  २. मारल्यावर न रडल्या बद्दल,

  ३. न मारता रडल्या बद्दल,

  ४. मित्रांबरोबर खेळल्या बद्दल,

  ५. मित्रांबरोबर न खेळल्या बद्दल,

  ६. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्या बद्दल,

  ७. मोठ्यांना उत्तर दिल्या बद्दल,

  ८. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल,

  ९. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर,

  १०. उपदेश पर गाणे गायल्या बद्दल,

  ११. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल,

  १२. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्या बद्दल,

  १३. पाहुणे जायला निघाल्या वर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्या बद्दल,

  १४. खायला नाही म्हंटल्या वर,

  १५. सूर्यास्तानंतर घरी आल्या वर,

  १६. शेजाऱ्यांकडे खाल्ल्या बद्दल,

  १७. हट्टी असल्या बद्दल,

  १८. खूप उत्साही असल्या बद्दल,

  १९. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्या बद्दल,

  २०. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्या बद्दल,

  २१. खूप सावकाश खाल्या बद्दल,

  २२. भराभर खाल्या बद्दल,

  २३. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्या बद्दल,

  २४. पाहुणे खात असताना त्यांच्या कडे बघत राहिल्या बद्दल,

  २५. चालताना घसरून पडल्याबद्दल,

  २६. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्या बद्दल,
  २७. मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्या बद्दल,

  २८. मोठ्यांशी बोलताना त्यांच्या कडे न पाहिल्या बद्दल,

  २९. मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्या बद्दल,

  ३०. रडणार्‍या मुलांकडे पाहून हसल्या बद्दल,

  ३१. चपल्ल हरवली म्हणून,

  ३२. परीक्षेत नापास झाल्या वर,

  ३३. शिक्षकांनी तक्रार केल्यावर,

  ३४.पुस्तकाला पाय लागल्या बद्दल,

  ३५.जेवणापूर्वी प्रार्थना न केल्याबद्दल,

  ३६.सायंकाळी शुभ करोती ही संध्या आरती न म्हटल्या बद्दल,

  ३७.वाढले तेवढे न खाऊन तसेच ठेवल्याबद्दल,

  ३८.खरकट्या हाताने वाढून घेतल्याबद्दल,

  ३९.वेळेवर उठत नसल्या बद्दल,

  ४०.सकाळी वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे विसरल्या बद्दल,

  ४१. घरातील किरकोळ कामे करायला सांगितली तर न ऐकल्या बद्दल,

  ४२.आई बाबा च्या भांडण नंतर कधीकधी वड्याचे तेल वांग्यावर निघावे काहीतरी कारणाने त्या बद्दल,

  ४३.दिवाळीचे फटाके लवकर संपवल्या बद्दल,

  ४४.जास्तवेळ रुसून बसल्या बद्दल,

  ४५.घरात खेळणीचा पसारा केल्याबद्दल,

  ४६.बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ मध्ये भांडण झाल्यानंतर,

  ४७.कधीतरी घरातील एखादा रुपया गुपचूप घेतल्याबद्दल,

  ४८.पाहुण्यांनी जाताना देऊ केलेले पैसे नको नको असं न म्हणता पटकन घेतल्या बद्दल(पाहुणे गेल्यावर),

  ४९.पाहुण्यांच्या किंवा ओळखीच्या घरी गेल्यावर बेशिस्त वागल्याबद्दल,

  ५०.अंघोळ व्यवस्थित करीत नसल्याबद्दल,

  ५१.केस डोळ्यावर येईल एवढे हट्टाने वाढवल्याबद्दल,

  ५२.बाहेरून खेळून आल्यावर पाय न धुतल्या बद्दल,

  ५३.हात न धुता खाण्याची, जेवणाची घाई केल्याबद्दल,

  ५४.जास्त हलत डुलत खात असल्याबद्दल,

  ५५.सायकल वरून पडून लागून घेतल्याबद्दल,

  ५६.खेळताना लागल्याबद्दल,

  ५७.दूध किंवा औषध दिले तेवढे न पिल्या बद्दल,

  ५८.दूध किंवा औषध नको असताना बळेच प्यायला लावले व नंतर उलटी झाल्या बद्दल,

  ५९.चहा प्यायला मागितल्या बद्दल,

  ६०. बाबा सायंकाळी घरी यायच्या आत खेळून घरी लवकर न आल्याबद्दल,

  ६१.आई जवळ मी झोपणार, नाही मी झोपणार अश्या बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ यातील वाद किंवा मीच आई बाबा च्या मध्ये झोपणार अश्या हट्टी वागण्याबद्दल.

  ६२.रामायण व महाभारत पाहून मग जमेल तसा धनुष्य बाण बनवून तो कुत्रे किंवा इतर मित्र यांच्याकडे रोखून मारल्याबद्दल, यादी तशी मोठी आहे, मार आठवतो तशी वाढत जाईलच.

  तरी तूर्तास थांबतो. Wink काही विसरले…असेल तर सांगा... Wink

 • Andi2702's picture
  Andi2702
  गुरू, 01/02/2024 - 08:26. वाजता प्रकाशित केले.

  *"संपत्ती".....*
  ज्याचाकडे नाही त्याला त्याची काहीच किंमत नसते . आणि , ज्याच्याकडे आहे त्याला इतरांची किंमत नसते . Ramram @JDU

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 02/02/2024 - 08:02. वाजता प्रकाशित केले.

  पत्नी -
  *“बचपन” में मेरा एक ही “शौक” था !,*
  *“पति” की खूब “सेवा” करूंगी*

  पति- फिर करती क्यों नहीं हो !?

  पत्नी -
  *“बचपन” खत्म,*
  *शौक “खत्म !!!”*

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 02/02/2024 - 08:07. वाजता प्रकाशित केले.

  नवरा : लग्नात सात फेरे घेताना तू वचन दिलं होतंस…
  माझा मान राखशील, माझं सगळं ऐकशील.

  बायको : कमाल झाली बाई ह्या माणसाची...
  सगळ्यांसमोर तिथं तुमच्याशी वाद घालत बसायचं होतं का मग ?
  Smile Smile Wink Wink Lol Lol

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  शुक्र, 02/02/2024 - 08:11. वाजता प्रकाशित केले.

  व्हॉट्सॲपवर लोक एकमेकांना "हाय" मागतात आणि बुजुर्ग म्हणतात "हाय लागली तर जीवन उद्ध्वस्त होते"

  #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो

  शेतकरी तितुका एक एक!

 • Andi2702's picture
  Andi2702
  सोम, 05/02/2024 - 06:35. वाजता प्रकाशित केले.

  पुरुषांना कोणी विचारतच नाही!

  आज मी पेस्ट्री घेण्यासाठी एका बेकरीमध्ये गेलो होतो.

  माझ्या पुढे एक अतिशय सुंदर आणि फॅशनेबल स्त्री होती.

  तिने दुकानदाराला शोकेसमधील पेस्ट्रीबद्दल विचारले.

  तो असे काहीतरी सांगू लागला…

  मॅडम, हे ब्लॅक फॉरेस्ट आहे
  हे हनी आल्मंड आहे,
  हे रेड वेल्वेट आहे
  ही चॉकलेट पेस्ट्री आहे,
  ही स्ट्रॉबेरी पेस्ट्री आहे,
  ही बटरस्कॉच पेस्ट्री आहे
  आणि हे....आणि हे......!!

  ती बाई काहीतरी घेऊन निघून गेली.

  माझा नंबर आल्यावर मी त्याच शोकेसकडे बोट दाखवून त्याला विचारले..

  त्या शोकेसमध्ये कोणत्या पेस्ट्री आहेत?

  मला उत्तर मिळाले:-

  ही वीसची आहे
  ती पन्नासची आहे
  ही एकशे पन्नासची आहे,
  आणि ही शंभर….

  असं कुठं असतं का???

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 06/02/2024 - 10:28. वाजता प्रकाशित केले.
  "सूर्य मावळतीला आला होता" हा कोणता काळ आहे? सांगा बघू.
  उत्तर : सायंकाळ   Wink    Lol

  शेतकरी तितुका एक एक!

 • Andi2702's picture
  Andi2702
  शुक्र, 09/02/2024 - 08:37. वाजता प्रकाशित केले.

  काही नवरे कामंच असं करतात की त्यांना बायकोच्या शिव्या खाव्या लागतात…

  एकदा जर तिने सांगितलंय कि “ती ५ मिनिटांत तयार होईल” तर ….
  “दर १५-२० मिनिटांनी” विचारण्याची काय गरज आहे की तू तयार झालीस कि नाही अजून??

 • Arvind's picture
  Arvind
  सोम, 12/02/2024 - 21:10. वाजता प्रकाशित केले.

  *महिला (ऑटो वाले से) : भैया, चाँद तक चलोगे ?*

  *ऑटो ड्राइवर : हाँ, बैठिये पर 1200 करोड़ रुपये लगेगें।*

  *महिला : 1200 करोड़ क्यों, चंद्रयान तो 600 करोड़ में पहुंच गया।*

  *ऑटो ड्राइवर : मैडम, लौटने में सवारी नहीं मिलती। खाली आना पड़ता है।* Lol

 • पाने