नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची व्यथा
~~~
आम्हा शेतकऱ्यांवरी
सदा रुसला पाऊस
कसा पिकवू कापूस
पाण्याविना ||१||
कष्ट करून करून
झाली या हाडांची झीज
कधी होईल हो चीज
प्रयत्नांचे ||२||
वावरात गाळतो मी
माझ्या रक्ताचाही घाम
कधी मिळणार दाम
श्रमांना या ||३||
लेक शिकावी म्हणून
घर ठेवलं गहाण
नाही पायात वहाण
कधी माझ्या ||४||
आम्हासाठीच्या योजना
नेत्यांच्या पोटात जाई
माझे पोट मात्र राही
उपाशीच ||५||
कधी होईल माझी या
दुःखांपासून सुटका
मिळेल दोन घटका
सुख थोडे ||६||
~~~
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
प्रतिक्रिया
विश्वजीतः कविता आर्त आहे.
विश्वजीतः कविता आर्त आहे. हृदयाला भिडते. शुभेच्छा.
प्रद्युम्नसंतु
शेतकरी व्यथा नेमकेपणाने
शेतकरी व्यथा नेमकेपणाने व्यक्त झालीय.
शेतकरी तितुका एक एक!
पाने