माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस
नमस्कार मित्रहो,
आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. आंतरजालावर १-२ लेख लिहिल्या नंतर इंटरनेटसुद्धा शेतकर्यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही.
मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी
वांगेमय/वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या
वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.
मागील १२०० दिवसांचा लेखाजोखा :-
माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या.
खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही.
मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे स्पष्ट आहे.
एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.
Thank you Mr Internet!
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------