नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रति महोदय,
कृपया ही कविता स्पर्धेत घ्यावी.
|| हक्क जगण्याचे वंचित होते ||
प्रश्न खूप पडले होते,
उत्तर त्याचे एकच होते |
शेतमालास रास्त भाव,
ह्या प्रश्नाचे उत्तर होते ||
भंगलेल्या स्वप्नांना,
द्वार आसवांचे खुले होते |
आमिष गुलाबाचे हुंगतांना,
काटे बोटांस बोचत होते ||
कोपलेल्या निसर्गावर,
मात करण्याचे धाडस होते |
मातलेल्या सरकारचे,
डोके ठिकाणावर कुठे होते ||
जळलेल्या शिवारात,
जगणे कस्पटासमान होते |
पेरलेल्या जमिनीत,
बियाणे कसे मुर्दाड होते ||
मदतीच्या घोषणांचे,
पिक यंदा मायंदाळ होते |
घेणारे ते हात,
मात्र दोरास लटकत होते ||
कुठवर सहावे बळीराजाने,
दु:ख त्याचे नागडे होते |
कधी अवर्षणाने वा अवकाळीने,
हक्क जगण्याचे वंचित होते ||
नको भिक सबसिडी वा कर्जमाफीची,
बळीराजाचे मागणे एकच होते |
शेतमालास रास्तभाव हवा,
शरद जोशींचे सांगणे होते ||
रविंद्र कामठे
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
मस्त
मस्त
पाने