नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
श्रावण
आला नाचरा श्रावण
मनी पिसारा फुलला
सखे पंचमीचा झोका
तुझ्या उरात झुलला
आलं आनंदा उधाण
सणासुदीची ही वेळ
संगे पाऊस खेळतो
पाठशिवणीचा खेळ
नभ भारावूनी जाती
चिंब भुईचं माहेर
श्रावणात चढविती
हिरवळीचा अहेर
भाऊराया पाठीराखा
राखी बांधती हातात
मायबापाचा आशिष
लेकी नांदती सुखात
श्रावणाचं आगमन
नवी उमेद भरतं
नभ भुईचं हे नातं
पुन्हा जगणं पेरतं
महादेवा देगा दान
सुखी राहूदे सकलां
नानाविध पानफुलं
तुझा देव्हारा सजला
शेतकऱ्यां यावी सुगी
स्वप्न होवोत साकार
कष्ट घामाच्या मखरा
येवो यशाचा आकार
••••
©®✍️अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(पाऊलखुणाकार )
रा- गोपालखेड ता. जि. अकोला
MO. 9689634332
©® Aniket J. Deshmukh
प्रतिक्रिया
खुपच छान अनिकेत
खुपच छान अनिकेत
ही प्रवेशिका ग्राह्य नाही.
प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.
सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा. या धाग्यावर क्लिक करून आपली प्रवेशिका नव्याने सादर करावी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने