नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*आँरेंज सिटीतील पाणी समस्या*
वरूड शहर विदर्भाचा कँलीफोर्निया म्हणून ओळखले जाते.
पण पाण्याच्या अभावी संत्रा बागा वाळू नये म्हणून शेतकऱ्यांची जी परवड झाली ती या कवितेतून व्यक्त केली आहे.)
कसंकाय पाटील ,
बरं हाये काय।
हिरीच्या पाण्याच,
खरं हाये काय।
काय सांगू दादा तुले।
आंबीया फुटला।
हीर आटली म्हणून,
म्या बोरच मारला ।
बोरनं पाणी फेकलं,
धार मोठी आली।
जमलं गड्या आता,
मले खुषी किती झाली।
हाटेलात जाऊन
दोन किलो पेढे आणले।
माह्या लहान खेड्यात,
म्या मुठीनच वाटले।
सारे झाले खूष
माहे लेकरं पाखरं।
आता दिस पालटन।
गोड सपन पाह्यलं।
चार दिस पाणी आलं।
खुषी मोठी झाली।
पाणी पाह्याले शिवारात।
माही लक्षमी आली।
बटन दाबलं तीनं।
पण पाणी च नाही आलं।
बोरचं पाणी आटलं व।
मंग माह्या ध्यानात आलं।
होतं नव्हतं किडूक मिडूक।
थेबी खर्च केलं।
घेतलं कर्ज पाण्यासाठी।
थे आंगभर झालं।
तेल गेलं तूप गेलं।
धूपारणं हाती आलं।
नाही तरी शेतकऱ्याले।
देवानं काय देल्लं।
ऊन तपते आगीवानी।
पाण्याचा थेंब नाही।
बँक धाडते नोटिसा।
कर्ज बी माफ नाही।
बँकेत आणा आधार कार्ड।
कोणाचा सातबारा।
किती झाड मेले।
ह्या फार्म भरा।
कोणाच्या नावे होते।
इथं सही करा।
गर्दी नोका करू।
रांगेत उभे सरा।
पटवाऱ्याची सहीआणा।
त्या काऊंटरवर जा।
रहीवासी दाखला।
त्या साहेबाजवळ जा।
साहेब सुटीवर आहे।
परवाच्या दिवशी या।
तूच सांग बापा आता।
सुचत नाही मले।
आरे पाण्यासारखे पैसे ।
माहे पाण्यातच गेले।
पाणी कुठून आणू आता
संत्रा नाही वाचत।
काय करू भेजा माहा।
काम नाही करत।
पण *लेकरावाणी झाडं* ।
मी मरू नाही देणार।
अरे सोय करन पाण्याची।
पण जीव नाही देणार।
*आत्महत्या*
नाही करणार
नाही करणार
नाही करणार।
मंदा वानखडे
वरूड
अमरावती
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.