![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा
विषय- शेती आणि करोना
लेखन प्रकार- छंदमुक्त कविता
शिर्षक- विलगीकरण
इथल्या निरागस मातीत पेरून
तथाकथित जागतिकीकरणाचे विषाणू
तुम्ही चालवले आहे विलगीकरण
मातीपासून माणसाचे.....
माणसापासून माणसाचे.
वावराच्या वेदनेशी कधीच
दाखवली नाही सलगी
बाजारसमितीमधील ढेरपोट्या खुर्च्यांनी.
आमचे हक्क झाले आहेत आयसोलेट
लालफितींच्या निगरगट्ट गाठींमध्ये.
आम्ही मात्र नेमाने येणाऱ्या सर्व
गारपीटी झेलत भरवत राहिलो तुम्हाला
आमच्या हिस्स्याचा घास...
आयुष्याची आकण कांडता कांडता
आम्ही झालो आहोत मरणाची खुराक.
तुमची इम्यूनिटी तुम्हाला लखलाभ !
आमच्या ओठांंचे होते विलगीकरण
हातात आलेल्या घासापासून हरसाल....
तरीही आम्ही नाही होऊ शकत विलग
या मातीपासून..... तहहयात !
आणि ...त्या नंतरही !
प्रदीप देशमुख
चंद्रपूर
प्रतिक्रिया
खूप छान
खूप छान
Ganesh Varpe
खूप छान कविता प्रदिप सर.
खूप छान कविता प्रदिप सर.
अप्रतिम
अप्रतिम कविता सरजी! वाह!
मुक्तविहारी
छान लिहिलयं.. सुंदर......!
छान लिहिलयं..
सुंदर......!
Narendra Gandhare
वाह जबरदस्त प्रतिमा! थेट
वाह जबरदस्त प्रतिमा! थेट काळजाचा ठाव घेतात ! अंतर्मुख करणारी रचना
देशमुख सर खूप खूप शुभेच्छा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप