नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोनात ही दिला हात
रोग वाढता कोरोना
पाखरं परदेशी येती
चुकीचं नियोजन
शिक्षा सामान्य भोगती
रोज कोरोनाची भिती
वाईट बळीची गती
मिळेना मजुर कामाला
झाली पिकाची गा माती
जग भिऊनं घरात
गावोगावी शहरात
झोप येईना बापाला
पीक झुरे वावरात
शेत पिकवलं गड्यांनो
करून श्रम दिस-रात
कोरोना विषाणू नडला
कुणी घेईना विकत
कोरोनाच्या भितीनं
सारे दडले घरात
दुनियेचा पालनकर्ता
अवतरला रस्त्यात
धान्य, दूध, भाजीपाला
घरोघरी पुरविला
केली ना जीवाची फिकीर
नमन या हिम्मतीला
निळ्या आभाळाशी नातं
जुळलेली मातीशी नाळ
कोरोना संकटातही
फुलविला उजाड माळ
झालं ठप्प इथे सारं
झाले कित्येक बेकार
माणसं नागवता
उचलला शेतीनं भार
घ्यावं जाणून महत्व
माझ्या शेत माऊलीचं
आहे तिचं ही काळीज
जन्म देणाऱ्या आईचं
नाही कुणी या जगती
काळ्या आईहुन थोर
कोलमंडल्यावर सारं
दिला तिनं जना आधार
कवी
लक्ष्मण लाड
c/oराधाकिशन गित्ते
शारदा नगर परळी वै .
ता .परळी वै . जि. बीड
मो .९८५०५६९१३२
८६६८७०४३९२
gmail-laxmanlad76@gmail.com
प्रतिक्रिया
खूप छान रचना
खूप छान रचना
खूप सुंदर कविता
लाड सर, कविता खूप सुंदर लिहिली आहे!
मुक्तविहारी
कोरोना संकटातही
कोरोना संकटातही
फुलविला उजाड माळ... वाह अप्रतिम रचना
शुभेच्छा सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण