*आत्महत्या*
काह्यले रे शेतकर्या तू आत्महत्या करतं ?
बळिराजाचा वारस न जिंदगिले डरतं !
तुह्याच होता पैसा थो,जे घेतलं तुनं कर्ज
मारल्या होत्या चकरा अनं केला होता अर्ज
फेडासाठी बायकोसंगं राबराब राबला
बुढा झाला बाप तरी डवरा दुंडा दाबला
तरी नाही फिटलं कर्ज ह्या दोस नोहे तुह्या
आतातरी उघड डोये,अन खोस बरं बाह्या
मांगतल्यानं भेटत नाही, नियम हाये जुना
हिसके मारल्याबिना गाय सोडते का पान्हा ?
तपू देरे रगत ! ऊठ आतातरी पेटून
ये असा रस्त्यावर,बस चांगला रेटून
बांधुनशां मुठा सांग सार्यायिले यंदा
शेती दुसरं काही नाही, हाये उद्योगधंदा
सोडून दे राजकारन,अन त्याहिचा नाद
आपसातले भुलून जा जुने-नवे सारे वाद
शत्रु अन मित्राची आता कर बरं पारख
कोनता होये बिबा, न कोनती होये खारक
एवढं जर केलंतं सारे तुह्याजवळ येतीन
बिसलरी सोडून माठातलं पानी पेतीन
शेतीप्रधान देशात जर शेतकरीच मरन
तर मंग सांग कसा देश आपला तरन ?
"""""""""""""""""""""""""""
खुशाल गुल्हाने,
'वरदा',गोकुळ काॅलनी,
साईनगर,अमरावती-४४४६०७
9403019795
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
छान.
छान.
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी आणखी मिळतेजुळते करता येत असेल तर बघावे.
पाने