Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***पाऊस पडतो तरी कसा!

लेखनविभाग: 
वैचारिक लेख

पाऊस पडतो तरी कसा!

भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा हा शेती व्यवसायाने उचलला.तसेच भारताला जास्तीत जास्त म्हणजे ५९ टक्के रोजगार शेती आणि त्यासंबंधीत व्यवसायातून उपलब्ध होतो.भारतातील बहुतेक उद्योगधंदे शेती व्यवसायावरच आधारित आहे आणि शेती एका महत्वाच्या गोष्टीवर अवलंबून असते ती म्हणजे पाऊस!
मान्सून हा शब्द अरेबिक भाषेतल्या “माऊसीम “ या शब्दापासून आलाय. माऊसीम म्हणजे वाऱ्याची दिशा बदलल्याने झालेला ऋतूबदल. सुरुवातीला मान्सून हा शब्द दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या वापरला जात असे.अरेबियन खलाशी अरबी समुद्रात वाऱ्याची दिशा सांगायला या शब्दांचा वापर करीत होते.पण आता वर्षाच्या ठरविक वेळेत पडल्या जाणाऱ्या पावसाळ्याच्या ऋतूसाठी हा शब्द वापरला जातो.
 मान्सूनमध्ये पडणारा पाऊस आणि इतरवेळी पडणारा पाऊस यात फरक असतो.,कारण मान्सून पाऊस पडण्यामागे सूर्याचे वाढलेले तापमान ही महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरते.शिवाय वाऱ्याची दिशा कशी आहे.यावरूनही पाऊस तयार होणारी प्रक्रियाची वेगही असे.त्यामुळे त्याचे चांगले परिणाम शेतीवर आणि नदी, नाले, ओढे अशा साठ्यावारही दिसतात.
भारतासोबत मेक्सिको आणि नैऋत्य अमेरिका,पश्चिम अमेरिकेचा  काही भाग स्वीस, पश्चिम जर्मनी,उत्तर फ्रांस चीनचा भारतालगत असलेला भाग,कोरिया,जपान फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया काही भागातही मान्सून येतो. या सगळ्या देशात वर्षातल्या वेगवेगळ्या वेळी पाऊस पडतो.भारतात साधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस येतो.यावेळी वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून ईशानेकडे म्हणजेच साधारण केरळपासून अरुणाचल प्रदेशाकडे अशी असते.या पावसावर भारतातल्या प्रत्येक माणसच जगण अवलंबून असत. यामुळे मान्सून कसा  तयार होतो हे समजून घेणे  तितकच महत्वाच आहे.
कुणी म्हणेल पाऊस कसा  तयार होतो ते आम्ही शाळेतच शिकलोय.सुर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ तयार होते,ती वाफ वर जाते तिथे तिला गरम लागल्यामुळे पाणी असलेले ढग तयार होतात आणि ते ढग जमिनीवर येऊन पाऊस पाडतात.पावसाच्या या निर्मितीच हे साध विज्ञान तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती असत.पण हे ढग समुद्रातून जमिनीवर कसे येतात.
भारतात फक्त उन्हाळ्यातच पाण्याची जास्त वाफ होते आणि भारतात वेगवेगळ्या  भागात वेगवेगळा पाऊस का पडतो अशा भन्नाट प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी पावसाचे सूक्ष्म विज्ञान समजून घ्याव लागेल.इंडियन अँकेडमी आँफ सायन्सच्या रेसोनांस या मे २००७ च्या मासिकात अंकात तेथील  दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या पावसासाठी फक्त समुद्राच्या पाण्याचा नाही तर जमिनीचे तपमान वाढण गरजेच असत.कारण पृथ्वीची रचना साधारणपणे जमिन आणि समुद्र अशी झालीय शिवाय आकाशात हवेच्या दाबाचे पट्टेही असतात.सुर्याच्या उष्णतेने जमिन आणि समुद्राच पाणी याचं तापमान एकसारखाच गरम झाल तर हवेच्या दाबाचे पट्टे एका सरळ रेषेत राहिले असते पण मुळात तस होत नाही. जमिन लवकर गरम होते आणि लवकर थंड होते,याउलट पाण्याला गरम आणि थंड व्हायला वेळ लागतो,त्यामुळे जमिनीच्या तुलनेत समुद्राच्या पाण्याच तापमान कमी असून,सूर्य  आला कि जमिनीवरच्या पृष्ठभागावरून  एकच थर गरम होतो आणि सूर्य मावळेपर्यंत  किंवा सूर्याची प्रखरता कमी होईपर्यंत तो अजून गरम होत राहतो. पण समुद्राच्या पहिल्या थरातल पाणी गरम झाल कि त्याची वाफ होते आणि त्या जागी खालच पाणी घेत त्याचं  अशा प्रकारच अभिसरण होत राहत.
समुद्र आणि जमिनीच तापमान अस वेगवेगळ होण्याला  तापमान विसंगती अस म्हणतात.या तापमान विसंगतीचा परिणाम हवेच्या दाबावर होतो ते एका सरळ रेषेत न राहता वर खाली होतात.
मान्सूनचा पाऊस निर्माण होण्यासाठी अस पोषक वातावरण लागत,त्यात जमिनीवरची हवा,जास्त गरम असल्याने तिथे दबावाची तीव्रता वाढते.थोडक्यात दाबाच्या पहिल्या पट्ट्यातील हवा वर वर जाते म्हणजे पृथ्वीच्या कक्षेबाहेर वायूमंडलाच्या शेवटच्या पट्ट्याला जाते आणि तिथून वाहत समुद्राच्या बाजूने खाली येते अशा प्रकारे या हवेचा आणि  त्या बरोबर पाण्याच्या वाफेचा गोलाकार पद्धतीने वर खाली होण्याचा खेळ चालू असतो.

असा पडतो मान्सूनचा पाऊस !

नैऋत्य मोसमी वाऱ्यानाच मोसमी वारे किंवा मान्सूचे वारे असे म्हणतात या वाऱ्यापासून भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्याना भारताच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.हे नैऋत्यकडून येणारे वारे समुद्राकडून प्रवास करत भारतात प्रवेशतात.
मान्सून म्हणजे समुद्र्वरील बाष्पयुक्त वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे. भारताची भौगोलिक रचना द्विकल्पीय असल्याने तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमिन ,त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो.उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमिन जास्त तापते.जमिनीचा पृष्ठभाग तापल्यामुळे तेथील हवा प्रसारण पावते आणि तेथील दाब कमी होतो.याच काळात जमिनीच्या तापमानाच्या  तुलनेत समुद्रचे तापमान कमी राहते आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे समुद्राकडून  कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात.या  वाऱ्यात बाष्प कमी प्रमाणात असते.हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरील समुद्र सपाटी पासून उंचावर असलेल्या भागात जातात  व तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने परत फिरतात  आणि एक चक्रपूर्ण होते याच काळात जेंव्हा हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरून वाहत असते तेंव्हा ती हवा थंड होते यामुळे वाऱ्याची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.आणि ते पावसाच्या स्वरुपात जमिनीवर बरसतात.यालाच मान्सूनचा पाऊस म्हणतात 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने( आयएमडी) अनेक वर्षांच्या निरीक्षणावरून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत, त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम २० मे च्या सुमारास अंदमान-निकोबार बेटावर दाखल होतो.तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक,तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळात दाखल  होतो.
नंतर प्रवास करत तो १०  जूनला महाराष्ट्,छत्तीसगड,प.बंगाल,बिहार राज्यांत दाखल होतो.त्यानंतर मान्सून १५ जूनपर्यंत गुजरात,मध्यप्रदेश,झारखंड,हिमाचल प्रदेश ,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो.
१ जुलै ला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह  हरियाना,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. मान्सून दाखल होण्याला ऑनसेट ऑफ मान्सून असे संबोधतात.दरवर्षी मान्सून या ठरविक तारखेलाच येतो असे होत नाही,काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस अगोदर किंवा पाच सहा दिवस विलंबाने  दाखल होतो.यालाच मान्सून लवरकर आला किंवा उशिरा आला असे म्हंटले जाते.
  भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या दृष्टीनेदेशाचे चार प्रमुख विभाग आणि ३६ उपविभाग केले आहेत चार प्रमुख विभाग असे, वायव्य भारत,मध्य भारत,पूर्व व ईशान्य भारत आणि दक्षिण भारत. 
आयएमडीच्या मते देशात सर्वसाधारणपणे सरासरी ८८७,५ मि.मी. पाऊस पडतो.वायव्य भारतात या  विभागाची सरासरी ६१५ मि.मी.,मध्य भारत विभागाची ९७५.५ मि..मी. पूर्व व ईशान्य भारत १४३८,३ मि.मी. तर दक्षिण भारत विभागाची सरासरी ७१६.१ मि.मी. आहे. आयएमडी ने महिनेवार  पावसाची सरासरी ही निश्चित केली आहे.त्यानुसार  देशात जून मध्ये १६३.३ मी.मी ,जुलै मध्ये २८९.२ मी.मी  ऑगस्ट मध्ये २६१.३ मी.मी तर सप्टेंबरमध्ये सरसरी १७३.४ मी.मी पाऊस पडतो.
आयएमडीने महाराष्ट्रातील  उपविभाग वार  पडणाऱ्या पावसानुसार जून ते सप्टेंबर या काळात कोकण व गोवा या उपविभागात २९१५ मि.मी.,मध्य महाराष्ट्र ७२९ मि.मी. ,मराठवाड्यात ६८३ मि..मी तर विदर्भात ९५५ मि.मी. पाऊस पडतो.
भारतामध्ये मान्सून दोन प्रकारे पडतो ,एक बंगालच्या उपसागरातून कार्यरत राहते तर दुसरा अरबी समुद्राकडून .महाराष्ट्रात कोकण ,पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यातील काही जिल्ह्यात मुख्यत: अरबी समुदराचा लाभ होतो,तर विदर्भाला बंगालच्या उपसागराचा लाभ होतो. महाराष्ट्रात सह्याद्री किंवा  पश्चिम घाट हा पावसाचा दुभाजक म्हणून काम करतो.या पर्वतरांगामुळे कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर पश्चिम महाराष्ट्रात  आणि मराठवाड्यात त्य तुलनेत कमी पाऊस पडतो. बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या रागांना पर्वतरांगात अडतात आणि घाटमाथा  व कोकणात भरपूर पाऊस येतो. मात्र पुढे पश्चिम महाराष्टातील मुख्यत: अहमदनगर,सांगली ,सोलापूर  आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद,लातूर,बीड,औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येईपर्यंत या मोसमी वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते.त्यामुळे या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.
अवकाळी पाऊस: ज्याप्रमाणे जागतिक वातावरणात बदल होतात तसेच स्थानिक वातावरणामध्ये ही बदल होत असतात. जगभरातील विविध देशात पडणारा पाऊस हा तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो.भारतातला मान्सून दोन भागातून येतो एक बंगालच्या उपसागरातून आणि दुसरा अरबी समुद्रातून,हे दोन्ही वारे  संपूर्ण भारतात आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होते.ज्याची तीव्रता भौगोलिक परिस्थितीनुसार कमी जास्त होत असते. 
 
डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ
एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी 
अहमदनगर ४१३७२२ 
-----------
राजेश्वर कॉलोनी,राहुरी खुर्द 
ता. राहुरी ,
जि. अहमदनगर ४१३७०५
मो.९४०४०३२३८९
 
Share

प्रतिक्रिया