नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जाचा डोंगर कसा
हा वाढता वाढला
कुणब्याचा याने
उभा कणाच मोडला
पोरीचं लगीन कसं
आता हो करावं?
हुंड्याच भांडं सांगा
नेमकं कशाने भरावं?
त्यात दुष्काळ पहा
कशी करतोय चेष्टा
दिनरात्र राबूनही
फळ आलं नाही कष्टा
सरकार झाल दुष्ट
कधी देणार ते लक्ष
मंत्री-संत्री हमखास
करती कास्तकारा भक्ष्य
आता पेटून उठावं
आणि लढून मरावं
नांगराच्या फळाला
तू आता हत्यार कराव
रात अंधारी जरी ही
सूर्य नक्की उजडेल
बळीच्या राज्यासाठी
अवघड शिवार झगडेल
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने