पोळ्याच्या झडत्या
पोळा म्हणजे शेतकर्याचा मोठा सण. या दिवशी बैलांची शिंगे रंगवून,बेगड लावून बैलांना सजविले जाते. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. कामाला अजिबात जुंपले जात नाही.
मग पोळा भरवून बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या.
“एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!” चा एकच जल्लोष होतो.
त्यापैकी काही गाणी झडत्या संकलीत करून येथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
=-=-=-=-=-=-=
*पोळ्याच्या झडत्या… (१)*
आभाळ गडगडे
विजा कडकडे
सरकारात घुसले रेडे
इकडे कास्तकार झाले
कर्जापायी येडे
अन आमदार खासदार खाते
मलाईचे पेढे
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (२)*
चाकचाडा बैलगाडा
बैल गेले हो गोहाटीला
गोहाटीहून आणले खोके
मग देवेन्द्राने लावले डोके
एका नाथाने मारली कलटी
अन उद्धवभाऊले देल्ली पलटी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (३)*
फुटला रे फुटला
उद्धवचा पोळा
पन्नास झाले आमदार
एकनाथपाशी गोळा
शरद म्हणे तुम्ही
खेळू नका रडी
आम्ही खाऊ कितीबी
तरी लावू नका ईडी
संजय माझा चेला
अन मी त्याचा गुरु
ईडीबिडी सापशिडी
नका करू सुरु
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (४)*
कांदा रे कांदा,
अकलेचा कांदा
काँग्रेसनेच केला हो
राहुलचा वांदा
मग आल्या प्रियांका,
त्यायनं फुकला बिगुल
मग होती नोती थेयबी
हवा झाली गूल
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (५)*
कांदा रे कांदा
नाशिकचा कांदा
घेणाराबी घेईना अन
भाव काही देईना
गळ्यातलं गेलं
नाकातलं गेलं
पायातलं गेलं
डोक्याचं गेलं
तरी बळीराज्याले जाग काही येईना
गेलं जरी कमरेचं.... संघटित काही होईना
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर_मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (६)*
ओके ओके म्हणता
आमदार झाले गोळा
आमदाराचा भाव म्हणे
सत्तर हजार रुपये तोळा
सोन्यापेक्षाबी हे तर
भलतेच महाग झाले
त्यायचं पाहून अपक्षबी
शेंडा-बूड न्हाले
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
=-=-=-=-=-=-=
काही संकलित झडत्या
पोळ्याच्या झडत्या… (१)
चाकचाडा बैलगाडा,
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माझ्या बैलाचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
*******
पोळ्याच्या झडत्या… (२)
आभाळ गडगडे,
शिंग फ़डफ़डे
शिंगात पडले खडे
तुझी माय काढे
तेलातले वडे
तुझा बाप खाये पेढे .
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
*******
पोळ्याच्या झडत्या… (३)
गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
*******
पोळ्याच्या झडत्या… (४)
बळी रे बळी लिंब बनी
अशी कथा सांगेल कोणी
राम-लक्ष्मण गेले हो वनी
राम-लक्ष्मणाने आणली वनफुले
ते दिले महादेव पारबतीच्या हाती
तीनशे साठ नंदी
एक नमन गौरा.. महादेव..!
*******
पोळ्याच्या झडत्या… (५)
चक चावळा, बैल पावळा
बैल गेले हो पोंगळा.
पोंगळ्याची आणली माती,ते देली हो अंबाणीच्या हाती.
अंबानीन घडवला हो मोदी नंदी.
त्या मोडीनंदी न केली हो नोटबंदी
त्या नोटबंदी आणली हो मंदी.
एक नमन कवडा-पारबती हर बोला हर हर महादेव.
*******
पोळ्याच्या झडत्या… (६)
घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!
त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!
मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******
पोळ्याच्या झडत्या… (७)
पोई रे पोई,, पुरणाची पोई !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो,
कर्ज माफीची गोई !!
त्या गाईले चव ना धव,
कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!
रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,
आश्वासनावर,कास्तकार बसला
जिवमुठीत दाबून !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******
पोळ्याच्या झडत्या… (८)
वसरी रे वसरी, शम्याची वसरी,
पयलीले लेकरू, नाई झाल,
मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!
दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,
जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!
इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’
सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******
पोळ्याच्या झडत्या… (९)
पोया रे पोया, यवत्याचा पोया
आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!
काया मातीत टोब तो बीया,
तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!
शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..
आम्ही तुमच !! ३!!
घामाचा पैसा, मागतो आम्ही
थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!
घाम गाऊन पिकवतो शेती
नांदी लागाल तर होईल माती !! ५!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
*******
पोळ्याच्या झडत्या… (१०)
वाटी रे वाटी
खोबऱ्याची वाटी,
शेतकरी लढे जन्मंभर
रास्त भावासाठी
एक नमन गौरा.. महादेव..!
*******
पोळ्याच्या झडत्या… (११)
अभाय गडगडे शिंग फडफडे
जो तो जाये काँन्वेंटकडे
मराठी वाचतानी अडखडे..
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे
अगाऊ कामानं मास्तर होये वेडे
त्यायलेच पहा लागते खिचडीतले किडे.....
कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे....
बिना कामाच्या कामानं मोडे कंबरडे....
एक नमन गौरा पारबती हरबोला महादेव.
*******
पोळ्याच्या झडत्या… (१२)
चकचाडा बैलबाडा बैल गेला हो पहुनगडा,
पहुनगड्याची आनली माती
ती दिली हो गुरुच्या हाती
गुरु न घडविला हो नंदी,
साजुन भाजुन भर सभेत उभा केला
पुढुण दिसते हिरवा पिवळा
मागुन दिसते हो नितनवरा,
चक्करशोभ्या मंधी
बैल तोरणामंधी
द्याहो आमच्या चौऱ्यामटाट्याचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमन गौरा पार्वती हरभरा महादेव
*******
पोळ्याच्या झडत्या… (१३)
पोया रे पोया
बैलाचा पोया
तुरीच्या दायीन
मारला हो डोया
कांद्यान आमचे
केले हो वांदे
ऊसावाला बाप
ढसा ढसा रडे
एक नमन कवडा पार्वती हर बोला हर हर महादेव!!!!!
*******
पोळ्याच्या झडत्या… (१४)
पोळा रे पोळा
पाऊस झाला भोळा
शेतकरी हीता साठी
सगळे व्हा गोळा.
*******
पोळ्याच्या झडत्या… (१५)
वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी,
महादेव रडे दोन पैश्यासाठी,
पार्बतीच्या लुगड्याले छप्पन गाठी,
देव कवा धावल गरिबांसाठी,
एक नमन गौरा पर्बती हरबोला हर हर महादेव.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: संकलन साहाय्य :
श्री ज्ञानेश्वर चौधरी, हिंगणघाट
श्री राजेश रेवतकर
श्री पांडुरंग भालशंकर, वर्धा
श्री संदीप अवघड, अमरावती
श्री पद्माकर शहारे, आर्वी छोटी, हिंगणघाट
श्री नरेश नरड, आर्वी छोटी, हिंगणघाट
श्री अच्युत रसाळ, परभणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
पोळ्यांच्या झडत्या
पोळयाच्या झडत्याच खूप छान संकलन, सर
याच झडत्याच व्हिडिओ संकलन करा
धन्यवाद सर
धन्यवाद सर
नक्कीच प्रयत्न करू.
शेतकरी तितुका एक एक!
पोळ्याच्या-झडत्या
*पोळ्याच्या झडत्या… (१)*
चाकचाडा बैलगाडा
बैल गेले हो गोहाटीला
गोहाटीहून आणले खोके
मग देवेन्द्राने लावले डोके
एका नाथाने मारली कलटी
अन उद्धवभाऊले देल्ली पलटी
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (२)*
ओके ओके म्हणता
आमदार झाले गोळा
आमदाराचा भाव म्हणे
सत्तर हजार रुपये तोळा
सोन्यापेक्षाबी हे तर
भलतेच महाग झाले
त्यायचं पाहून अपक्षबी
शेंडा-बूड न्हाले
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (३)*
फुटला रे फुटला
उद्धवचा पोळा
पन्नास झाले आमदार
एकनाथपाशी गोळा
शरद म्हणे तुम्ही
खेळू नका रडी
आम्ही खाऊ कितीबी
तरी लावू नका ईडी
संजय माझा चेला
अन मी त्याचा गुरु
ईडीबिडी सापशिडी
नका करू सुरु
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (४)*
कांदा रे कांदा,
अकलेचा कांदा
काँग्रेसनेच केला हो
राहुलचा वांदा
मग आल्या प्रियांका,
त्यायनं फुकला बिगुल
मग होती नोती थेयबी
हवा झाली गूल
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर-मुटे
*पोळ्याच्या झडत्या… (५)*
कांदा रे कांदा
नाशिकचा कांदा
घेणाराबी घेईना अन
भाव काही देईना
गळ्यातलं गेलं
नाकातलं गेलं
पायातलं गेलं
डोक्याचं गेलं
तरी बळीराज्याले जाग काही येईना
गेलं जरी कमरेचं.... संघटित काही होईना
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव
#पोळ्याच्या-झडत्या #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!