नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का?

महेश's picture

माणसांच्या जिवापेक्षा..तुमचा भाव जास्त का?

पाऊसांन दगा दिला...
मातीनं सोड चिठ्ठी लिहिली
माझ्या कष्टाऊ बापाला..
सरकारनं फाशी दिली

तो हांबरत राहिला वासरूसारखा
अन् राबतही राहिला बैलासारखा
पण सत्ताधीश गाढवानी नवीन डाव मांडून
आपलाच पगार वाढवून घेतला...

तो कासावीस होऊन...
बघत राहिला ढगांचा खेळ
त्याच्या शेतमालाची लुट होऊन..
कचऱ्याची किंमत दिलेली पिकं

तो हसला, पुन्हा फसलो...
राम नाही राहिला शेतीत
ऊभा आयुष्यभर खचलो...
विष घेत आहे मिठीत

ढेरपोड्या आला सरणासमोर...
गळा फाडून गेला वातानुकूलात बसायला
पुन्हा कुणाचा तरी खुन करु म्हणून...
लागला भष्ट्राचारी डाव मांडून घर भरायला

दोन दिवस झाले बाप जावून...
लोक सार काही विसरून गेले
पुन्हा कोण आत्महत्या करेल म्हणून..
वाहिनीवाले वादविवाद घडवू राहिले

वा रे लोकशाही देश...
आणी त्याची ही व्यवस्था
माणसांच्या जिवापेक्षा..
तुमचा भाव जास्त का?
- महेश
8806646250.
08:33am. @. 09.10.18

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
पद्यकविता
Share

प्रतिक्रिया