नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

वृत्तांत, छायाचित्र, Vdo आणि बरेच काही >>>  Fingure-Right    क्लिक करा.

  

नांगरणी

Dhirajkumar Taksande's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
गझल

पोषणकर्त्याला कुठवर दारिद्र्य पांघराव लागेल ।
ओंजळीभर सुख जुने मनामध्ये अंथरावं लागेल ।।१।।

अन्नधान्य पीकवून किती पोसत बसायचे जगाला ।
जन्मो जन्मी तुला असं उपास पोटी मरावं लागेल ।।२।।

तिजोरीत त्यांच्या कुठवर भरशील तुझ्या स्वप्नाना ।
शोधण्यासाठी व्याकुळ होवून तुज हंबरावं लागेल ।।३।।

श्रध्देच्या बाजारात कसा खुंटलास भोळ्याभक्ता ।
माजल्या तणासाठी औषध जहाल वापरावं लागेल ।।४।।

हक्क देत नसते कुणी घ्यायचे असते हिसकावूनी ।
कळस गाठण्यासाठी घाटमाथ्यातून चढाव लागेल ।।५।।

कर्जमुक्त जगण्यासाठी कुठवर होतील आत्महत्या ।
दोन हात करून मरण्यास शस्त्र नव धरावं लागेल ।।६।।

व्यवस्था मिळत नाही अशी करशील कधी निर्मीती ।
जोमदार पीक घेण्या व्यवस्थेलाच नांगरावं लागेल ।।७।।

Share

प्रतिक्रिया