नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

Shetkari Sanghatana Mobile App

शेतकरी संघटना मोबाईल ऍप
हे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा. 
 
 
 

रोज नवेच मरण

Sidheshwar Ingole's picture

कविता शिर्षक -रोज नवेच मरण (अष्टाक्षरी)

-------------------------------------------------------------------

रीन काढून बियाणं
काळ्या मातीत पेरलं
वाट थेंबाची पाहता
सालं यंदाही सरलं

पीक मशागतीसाठी
दाम किती मी घातले
राब राबूनिया त्यात
प्राण किती मीओतले

रास धान्याची मुठीने
आली माझ्या पदरात
खर्च निघावा कशाने
गेले पडक्या भावात

किती खपून राबून
सालभर या मातीत
घाम सारा जिरवून
काय उरले हातात

घट्टे हाताला पडले
सल सलते उरात
कोण ठरविला भाव
बसूनिया त्या ए.सी.त

कसे जगावे बळीने
गांडू शासन धोरण
शेतकरी भोगतोया
रोज नवेच मरण

- सिद्धेश्वर इंगोले
परळीवै.जि.बीड
9561204691

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता
Share

प्रतिक्रिया