बळीराजा डॉट कॉम

Change Font Size

Change Screen

Change Profile

Change Layouts

Change Menu Styles

Cpanel
काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, 
या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.

स्वप्नरंजन फार झाले

गंगाधर मुटे's picture
लेखनप्रकार : 
वाङ्मयशेती
काव्यप्रकार: 
मराठी गझल

स्वप्नरंजन फार झाले

स्वप्नरंजन फार झाले
सौख्यही बेजार झाले

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले

झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नकोडे ठार झाले

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद सारे बार झाले

                                   गंगाधर मुटे
……………………………….…
वृत्त : मनोरमा
लगावली : गालगागा गालगागा
…………………………………

प्रतिक्रिया (2)

मस्त!

प्रमोद देव's picture

छोट्या बहरमधली ही गझल..मस्त झालेय.

धन्यवाद देव साहेब.

गंगाधर मुटे's picture

धन्यवाद देव साहेब. स्मित

माझी वाङ्मयशेती
www.gangadharmute.com

* * * * पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न. * * * *