नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

चोरीस सूट आता

प्रदीप थूल's picture

असल्यामुळे न काही चोरीस सूट आता
आडून धोरणांच्या करतात लूट आता

दावून दे ठिकाणा पाजून घूट आता
घे होड़ दुश्मनांची हो एकजूट आता

खाऊन तुज बळावर छळतात जे तुलाची
कपटी अशा जनांना शोधून कूट आता

लप्पास राजनेते कामी न येत तुझिया
सरकारच्या थुक्यावर जगतात छूट आता

सरकारला विनवणी घालून फार झाले
हिसकून घे 'प्रदीपा' आक्रांत तूट आता

वृत: आनंदकन,
(गागाल गालगागा, गागाल गालगागा)

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
गझल
Share

प्रतिक्रिया