उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया
स्वस्तात मागते जी आलू लसूण कांदा
तीही तयार नाही अजिबात भाव द्याया
मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया
आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
होणार साध्य काही की जाणार जन्म वाया
वाटेवरील काटे सरता सरे सरेना
गंतव्य गाठणे तर ना पंखही उडाया
सत्यापरीस वरचढ झालीय लोभमाया
कोणी तयार नाही सोज्वळ साक्ष द्याया
दिसण्यात कार्य अपुले, दिसतेय सारखे पण
तू धावते पळाया, मी धावतो धराया
जे जे दिसेल ते ते, सारेच प्रिय त्याला
इतरांस सांगतो की, ही व्यर्थ मोहमाया
ओढावयास नांगर कोणीच येत नव्हता
आता सुगीत आला कोकीळ गीत गाया
तोट्यात कास्तकारी? मग अटळ यादवीही
भाऊच भावकीशी लढणार रक्त प्याया
लाचारिचे विषाणू वृत्तीत पोसले तर
प्रत्येक पावलावर लागेल छत्रछाया
लाचार एक झाले, घनघोर बंड केले
घडले असे कधी तर कळवा मला कळाया
काही हशील नाही जागे करून आता
मरणार हे तसेही खंगून जीर्ण काया
तपवून शब्दधारा मग शब्दयज्ञ केला
बघताच शब्दाशक्ती जळ लागले जळाया
पाणी दुधात नव्हते, पाण्यात दूध होते
गेली हयात सारी इतकेच उलगडाया
माझे; मलाच; मी; मी! खुंटीस टांगले तर
होईल मार्ग सोपा निरपेक्ष व्यक्त व्हाया
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी
व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
चल तोडुयात काही भिंती जुन्या - पुरान्या
तेव्हा मिळेल संधी पाया नवा रचाया
प्रतिक्रिया
ऐश्वर्य संपदेने आहे कुबेर तो
ऐश्वर्य संपदेने आहे कुबेर तो पण;
असतो सदैव राजी पैशामध्ये खपाया
तो हात जोडतो अन भीक मागतो पण
नसतो तयार अपुल्या स्वत्वास तो विकाया
गोंजारल्या भुकेला लाडात पोसले तर
दिसताच कंच चारा अक्कल निघे चराया
शेतकरी तितुका एक एक!
पाने