Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी

आम्ही वृक्षासाठी,वृक्ष सर्वांसाठी
डॉ.आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी
मध्यवर्ती रोपवाटिका(बियाणे विभाग )
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
मो.9404032389

सर्वसामान्य नागरिकांना मुळातच निसर्ग जपण्याची आंतरिक ओढ असते.त्यांच्या या आंतरिक भावनेला हात घातला त्यांना सजग केल तर खरोखरच मोठ काम होऊ शकत. दर वर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातोय परंतु ही तारीख आपल्या हवामानाला सुसंगत अशी वाटत नाही. कारण आपल्याकडे हवामानातील बदलांमुळे मृग नक्षत्राचा पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन-तीन पाऊस पडून गेल्यावर जर रोप लावली तर ती तग धरण्याची, जगण्याची शक्यता अधिक असते.म्हणून मृगाचा आणि आद्राचा पाऊस पडून गेल्यावर म्हणजेच जुलै महिन्यात झाडे लावली आणि त्यांची निरंतर जोपासना केली तर अधिक फायदेशीर ठरेल.
यंदाच्या वर्षीचे असह्य करून टाकणारे तापमान, पाण्याची काही भागात असणारी तीव्र टंचाई आणि त्यामुळे एकंदर जनमाणसावर, सुष्टीवर आणि अनेक घटकांवर उद्भभवलेल्या अनेकविध समस्यांचा वेध घेत असताना हे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ एकच उपाय आहे तो म्हणजे झाडे लावणे त्यांची जोपासना करणे, त्यांना जगविणे. झाडांची संख्या वाढली तरच या समस्या सुटणार आहेत. एका पर्यावरण भूशास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे की, झाड म्हणजे अवकाशाला जमिनीचे निरोप देणारे टॅावर आहेत. झाडामार्फत ठराविक काहीतरी संदेश यंत्रणा कार्यान्वित आहे, जी पाऊस-उन- वारा याला नियंत्रित करते अस त्याने सप्रमाण सिद्ध केल.झाड अवकाशाला निरोप देतात! नुसत विचार केला तरी सद्य परिस्थितीत निसर्गाला वाचवण्याचे अनाहूत प्रयत्न मनापासून करावेसे वाटतात.
पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर समाजातील सर्वच घटकांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.आपल्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी ते फार आवश्यक आहे.पर्यावरण संरक्षणाच्या विषयीची केवळ पर्यावरण दिनीच आठवण येत असेल तर ती आपल्यासाठी एक भयंकर चूक ठरेल.जग बदलत राहणार, नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान
आपल्या झाडे आपल्याला काय देतात.! एक झाड ५० वर्षात ३५ लाख किमतीचे वायू प्रदूषण टाळते.एक झाड ४० लाख रुपये किमतीचे पाण्याचे डिसाइकलिंग करते. एक झाड एका वर्षात ३ किलो कार्बन डायऑक्साईडचा नाश करते.एक परिपूर्ण झाड एक हजार मानवांचे जेवण शिजविण्यासाठी उपयोगी पडते.एका झाडापासून आसपासच्या परिसरातील तापमान २ डिग्री अंशाने कमी करते.एक झाड १२ विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.एका झाडापासून १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या २५ पिढ्या जन्माला येतात. मधमाशांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखांवर जाते.एक झाड १८ लाख रुपये किमतीची धूप थांबवते.एक झाड माणसाला लहानपणीच्या पाऊलपणापासून ते आरामखुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठीपासून स्मशानातील लाकडापर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोल्याची भर टाकून जमिनीची कस वाढवते.एक झाड फळे,फुले,बिया आपल्याला देते.
जीवनात परिवर्तने घडवतच राहणार.मोठ मोठी शहरे उभारली जाणार, आपले जीवन अधिक सुखमय व्हावे म्हणून प्रयत्न करीत राहणार.याचा अर्थ निसर्गाने चक्र रोखण्याचा परवाना आपल्याला मिळाला असे नाही. ग्लोबल वार्मिगची चर्चा केवल जागतिक स्तरावर किंवा राष्ट्रीय पातळीवर करण्यासाठी नाही.तर त्यावर आपल्या सर्वानी मिळून मात करण्यासाठी शाश्वत रक्षणाचा मार्ग अवलंबविल्यास हिताचे ठरेल.मागील पिढी शाळेत शिकली त्यावेळी निसर्गच मुख्य शिक्षक होता.पर्यावरण, वन्यप्राणी, झाडे-वनस्पती जंगले हे आताच्या पुस्तकातले विषय मागच्या पिढीचे सोबती होते.ग्रामीण भागात अजूनही पर्यावरणाचे नैसर्गिक जतन केले जाते,परंतु छोट्या–मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच आहे.या दृष्टीने शाळेपासूनच अगदी गांभिर्याने याविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
आयआयटीएम या संस्थेच्या अभ्यासात नुकतेच असे आढळले आहे की आपण आयुष्यातील सरासरी साडेतीन वर्ष प्रदुषित हवेमुळे कमी करत आहोत.एका दृष्टीने ही आत्महत्याच म्हणावी लागेल! वाहनांमुळे उत्सर्जित होणाऱ्या प्रदुषित वायू मनुष्याच्या श्वसनात गेल्यामुळे श्वसनाचे विकार होण्याचे प्रमाण राज्यात ७ टक्के आहे. त्यामुळे आपण काही छोट्या गोष्टी आताच केल्या तर त्याचे दीर्घकालीन परिणाम नक्कीच दिसतील.
संतुलित पर्यावरणामुळे निसर्गाचे चित्र बिनभोबाटपणे फिरत राहते.जैवविविधता सुद्धा या चक्रातील एक महत्वाचा भाग आहे. जंगलाची भूमिका तर अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रीय वननिती १९८८ च्या धोरणानुसार एकूण भैागोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनीकरण आवश्यक आहे.महाराष्ट्र हे राज्य देशातील प्रगतशील आणि आघाडीचे राज्य आहे.राज्यातील ३ कोटी ७ लाख हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आहे, परंतु याचे प्रमाण वाढविण्याची गरज ध्यानात घेऊन ३३ टक्के क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड १ जुलै ते ३१ जुलै,२०१८ दरम्यान करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
निसर्गात झाडे जास्त प्रमाणात असतील तर पावसासाठी पोषक वातावरण झाडे तयार करतात. झाडे ही पावसाचे पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यास मदत करतात. पूर्वी वृक्ष भरपूर होते,म्हणून पाणी मुबलक उपलब्ध होते.मुसळधार पावसात झाडे नसलेल्या भागातील माती सैल झाल्यामुळे पाण्याबरोबर सहज वाहून जाते परंतु वृक्ष असलेल्या ठिकाणी झाडांची मुळे माती धरून ठेवतात.मातीची झीज होत नाही. एकंदर मृद व जलसंधारणाचे महत्वाचे काम झाडे करतात.अशुद्ध हवा स्वछ करण्यासाठी झाडांची गरज आहे. वड,पिंपळ,तुळस इत्यादी झाडे आपणास शुद्ध हवा देतात.वृक्षाच्या सानिध्यात मन प्रसन्न होते.कारण हवा शुद्ध असते. झाडे प्रदूषण नियंत्रणात ठेवतात.तेव्हा निरामय आरोग्यासाठी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाची कुशी आपल्याला हवी असेल तर झाडे लावायलाच हवी.
निर्धार हरित महाराष्ट्राचा
लावून वृक्ष कोटी कोटी
धरती ही नटविण्याचा...

झाडे लावतांना स्थानिक झाडांचा विचार जरूर करावा, पर्यावरणपूरक झाडांची लागवड करून आपल्या बरोबर इतर वन्यजीवानांही वाचवा.हवामान स्वछ ठेवण्यासाठी धुजा, पळस,सावर,कदंब,आमलतास ही झाडे लावा.पळस व चारोळी ही झाडे हवेतील प्रदूषण दर्शवितात.वड,पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडुनिंब, कदंब ही झाडे १२ तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी आहेत. धुळीचे कण व विषारी वायूपासून निवारण करण्यासाठी आंबा, अशोक, बकुल, सोनचाफा, जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, मोगरा हि सर्वजीवनदायी वृक्ष लावावीत.पिंपळ,करंज,पुत्रजीवी,उंबर,अशोक,शिरीष,आंबा,सीताफळ,जांभूळ,रामफळ,अमलतास,पेरू,बोर,कडूनिंब,आवळा,चिंच,कदंब,मोह,बेल ही झाडे औदोगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारण्यासाठी लावावीत.
रोपे असूद्या छोटी वा मोठी...
लावू या तेरा कोटी चला भू-मातेला अर्पण करूयात
हिरव्या शालूच लेण...
विविध रोगांवर हिरडा,बेहडा,आवला,अर्जुन,कडूनिंब,करंज,रिठा,निरगुडी या औषधी वनस्पती मानवजातीला अत्यंत उपुयक्त आहेत.शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी उंबर,करंज,साधी बाभूळ,शेवरी ही झाडे उपयुक्तआहेत.आवळा,अंजीर,फणस,चिंच,तुती,करवंद,बोर,करंज ही झाडे वनशेतीसाठीउपयुक्तआहेत.रस्ताच्यामधीलभागात कोरपड,,शेर,कोकली,रुई,जट्रोफा,अश्वगंधा,सीताफळ ही झाडे लावावीत. बांबू, हदगा,शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडूनिंब, कढीपत्ता ही झाडे शेताच्या बांधवर लावण्यास योग्य आहेत. शेताच्या कुंपनासाठी सागरगोटा, चिल्लर, शिकेकाई, हिंगणी, घायपात, जट्रोफा ही झाडे लावावीत.रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक,बेल ही झाडे घराभोवती लावण्यास योग्य आहेत.सरपणासाठी देवबाभूळ, खैर,बाभूळ, हिवर, धावड, बांबू ही झाडे उपयुक्त आहेत.वरीलप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता संरक्षित होईल.
३ वर्षात ५० कोटी वृक्ष
२०१८ चे एकच लक्ष्य
१३ कोटी वृक्ष संकल्प ...
वन्य व वन्यजीव संवर्धनाचा
३३% भूभागावर वृक्षाच्छादनाचा...

समाजाची मानसिकता बदलण्यासाठी शासनापेक्षाही सामाजिक संस्था,स्वयंसेवी संस्था यांना प्रयत्न करावे लागतील.केवळ कायदे करून किंवा फक्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. अनेक लहान लहान गोष्टीतून आपण सुरुवात करू शकतो.आपल्या राज्यात वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही.तिचा वापर काटकसरीने केला तर वीज वाचेल. सैार शेगडी, सूर्यचूल वापरली तर,गॅसची बचत होईल.सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे,कागदाच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरल्यामुळे कागदाची बचत होईल. शासनातील कागदांचा अनावश्यक वापर कमी करण्याची सुद्धा गरज आहे.पेपरलेस वर्क वर भर देण्याची आवशकता आहे.प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यापेक्षा कापडी पिशव्यांवर भर द्यावा. पर्यावरण पूरक विकास हा आपल्या सर्वांचा ध्यासच नव्हे,तर श्वासही झाला पाहिजे आणि यासाठी साधी सोप्पी सूत्रे पाळली पाहिजेत.कमीत कमी वृक्षतोड होईल असा आराखडा तयार करणे,ज्या झाडांची तोड अपरिहार्य आहे,त्यांचे पुनर्वसन करणे,त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. शासनाच्या एकच लक्ष १३ कोटी वृक्ष या हाकेस प्रतिसाद देऊया आणि जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पावलावर पाउल टाकून वनयुक्त शिवार साकार करुया आणि समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या.

होऊ आपण सर्व एक ...
लावू रोपे अनेक
---------------------------------------------------------------------------------------

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
वैचारिक लेख
Share

प्रतिक्रिया