Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

मराठी गझल

Main page content

माझी गझल निराळी - भूमिका

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:42 AM IST, Wed May 08, 2013
मराठी गझल




माझी गझल निराळी



घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी

तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी



शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा

निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी



एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची

सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी



लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे

जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी



युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
शेतकरी
शेतकरी गीत
शेतकरी काव्य
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
समीक्षण
मराठी गझल
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
माझी गझल निराळी
अभिप्राय
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Read more about माझी गझल निराळी - भूमिका
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 8698 views

वाढदिवसाची कविता

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:15 PM IST, Sat February 28, 2026
मराठी गझल

वाढदिवसाची कविता

भेटत राहू असेच आपण
दरवर्षाच्या या दिवशी
आपण सारे मिळून वाढू
जन्मदिनाच्या या दिवशी

मी तर आहे युगायुगाचा
शाश्वत पंथी वाटसरू
या तुम्हीही आशिष द्याया
सर्व युगांच्या या दिवशी

जाणे येणे पुन्हा जाणे
पुन्हा येणे नित्य करू
सजवू मैफल सदैव अपुली
चिरंतनाच्या या दिवशी

पुनर्जन्म असतो की नसतो
वा चौऱ्याशीचा फेरा
हवी कशाला माथापच्ची
उल्हासाच्या या दिवशी

आदि-अनादी अनंत काळी
असेन मी! भास पुरेसा
येई मानवतेची दृष्टी
दिव्यत्वाच्या या दिवशी

माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
कविता
काव्यधारा
  • Read more about वाढदिवसाची कविता
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 3351 views

उत्तेजना अशी तू देऊ नकोस

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 7:09 PM IST, Thu September 26, 2024
मराठी गझल
महागजल
 
उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया
 
स्वस्तात मागते जी आलू लसूण कांदा 
तीही तयार नाही अजिबात भाव द्याया 
 
मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया
 
आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
होणार साध्य काही की जाणार जन्म वाया
 
महागजल
महागझल
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
  • Read more about उत्तेजना अशी तू देऊ नकोस
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 5579 views

बहुसंख्य-अल्पसंख्य : गझल ।१८।।

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:24 PM IST, Tue July 26, 2022
मराठी गझल
बहुसंख्य-अल्पसंख्य : गझल ।१८।।
 
बहुसंख्येला सामर्थ्याचा माज असतो
लघुसंख्येला छल-कपटाचा बाज असतो
 
गहाण जर का झालो असतो काल मीही
सत्तेमधला हिस्सा मीही आज असतो
 
सौंदर्याची मला जराशी जाण असती
तुझ्या दिलाची मीही नक्की खाज असतो
 
सांगड व्हावी आचाराची विचाराशी
सात्विक शाई लेखणीचा साज असतो
 
केली नसती अभय वकीली शोषितांची
माझी वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
कविता
काव्यधारा
  • Read more about बहुसंख्य-अल्पसंख्य : गझल ।१८।।
  • Log in or register to post comments
  • 3080 views

काही सुटे अन काही मुटे शेर

Profile picture for user admin
By admin | 8:47 AM IST, Sun July 17, 2022
मराठी गझल
काही सुटे अन काही मुटे शेर



तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही

मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन


© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
=-=-=-=-=
sher
Gajhal
Marathi Gazal
Marathi Gajhal
काही सुटे अन काही मुटे शेर
सुटे शेर
मुटे शेर
गझल
गजल
रानातले शेर
शेतीमातीचे शेर
मराठी गझल
कविता
  • Read more about काही सुटे अन काही मुटे शेर
  • 17 comments
  • Log in or register to post comments
  • 15820 views

घे मशाली

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 1:09 PM IST, Mon August 23, 2021
मराठी गझल

घे मशाली

शासनाच्या सवे मेघही पांगले
कास्तकारा तुझे दैवही बांधले

कोण देतो तुझ्या पाय पोटावरी
का कळेना तुला नेमके चांगले

तेच झाले तुझे आज मारेकरी
काल पायापुढे जे तुझ्या रांगले

झोप आली तुला जागता जागता
त्याच पायी तुझे दैन्यही लांबले

काय अपराध माझा कळेना मला
सांग जे कष्टले तेच का गांजले

इंडियाच्या गुलामीत ताजी सुखे
भारताच्या घरी का शिळे रांधले

पारतंत्र्यात स्वातंत्र्य धास्तावले
सैनिकांनो वृथा रक्त का सांडले

घे मशाली अभय आज हातामधी
का असे शस्त्र खुंटीवरी टांगले

Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
माझी गझल निराळी
मार्ग माझा वेगळा
वाङ्मयशेती
शेतकरी गीत
कविता
काव्यधारा
  • Read more about घे मशाली
  • Log in or register to post comments
  • 2375 views

कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:34 AM IST, Sat August 14, 2021
मराठी गझल
कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक
 
हळूहळू शाब्दिक चकमक पुन्हा झडणार बहुतेक 
हे शब्दच कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक
 
काल न्यायमंदिरात बाटल्यांची मैफल रंगली
आज सुकले कमी ओलेच जास्त जळणार बहुतेक
 
मोर झाडाकडून झुडपाकडे निघाला दिसतोय
बघा झाडावर भयंकर वादळ चढणार बहुतेक
 
सत्य असते सारं तर मग असत्य ते काय असते?
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
माझी गझल निराळी
वाङ्मयशेती
कविता
  • Read more about कुणाचे तरी कुंकू पुसणार बहुतेक
  • Log in or register to post comments
  • 2288 views

कसा लिहू मी गझल तुझ्यावर?

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:00 PM IST, Tue August 10, 2021
मराठी गझल
कसा लिहू मी गझल तुझ्यावर?
 
सोज्वळ प्रितीची तू प्रतिमा, निर्मळ माया समर्पल्यावर
उरली केवळ पवित्र मीरा, कसा लिहू मी गझल तुझ्यावर?
 
प्रेमाला बघ उकळ्या येती, इतक्या येती, उतूच जाती
शोधत फिरती कुठे सांडवू, या फुलांवर की त्या कळ्यांवर
 
काय पिऊनी असा माणसा, न्याय लादतो मानवतेवर
गुन्हा तर पदराने केला, दोष ठेवतो पागोट्यावर
 
तुलाच दिसतो तुझ्यात भारी, अस्सल गाढा थोर समीक्षक
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
मराठी गझल
माझी गझल निराळी
वाङ्मयशेती
कविता
  • Read more about कसा लिहू मी गझल तुझ्यावर?
  • Log in or register to post comments
  • 2546 views

गझल :अस्तित्व भारताचे

Dhirajkumar Taksande
By Dhirajkumar Taksande | 4:05 PM IST, Sat September 28, 2019


गझल :अस्तित्व भारताचे

व्यवसाय हा कृषीचा झाला जुगार आहे.
झाली असून मोडी पेरा दुबार आहे.

हा कोणत्या तऱ्हेचा सांगा उतार आहे.
मी फेडतो तरीही वाढत उधार आहे.

कृषिकर्म एक हुकमी पत्ता असून देखील,
खेळात मिळकतीच्या त्याचीच हार आहे!

मरण्याशिवाय नाही पर्याय कोणताही,
जगण्यास पण तरी मी करतो पुकार आहे.

सर्वत्र इंडियाचे प्राबल्य आज असुनी,
अस्तित्व भारताचे देशात ठार आहे.

घाट्यात कास्तकारी गेली तरी इथे या,
खात्यात शेतकीच्या भारी पगार आहे.

  • Read more about गझल :अस्तित्व भारताचे
  • 10 comments
  • Log in or register to post comments
  • 11103 views

गझल :शेती चरून गेली.

Dhirajkumar Taksande
By Dhirajkumar Taksande | 9:10 PM IST, Fri September 13, 2019


गझल : शेती चरून गेली

शेती पहा किती ही धाकी भरून गेली.
विळख्यात ती ऋणाच्या बघ गुदमरून गेली.

न्यायालयातही हो मी न्याय मागला पण,
बकरीच कायद्याची शेती चरून गेली.

मज वाटले असे की मिळणार दाम माझे,
फुकटात पण व्यवस्था मज वापरून गेली!

म्हणताच फक्त द्यावा मज भाव या पिकाला,
कुत्र्यापरी व्यवस्था ही कावरून गेली.

दुष्काळ सोसतांना मग याचना फुलांची,
वाटेत शेत्कऱ्यांच्या काटे करून गेली.

"सर्वास पोषणारा बेजार शोषणाने"
पाहून या व्यथेला नयने भरून गेली.

  • Read more about गझल :शेती चरून गेली.
  • 6 comments
  • Log in or register to post comments
  • 7363 views

Pagination

  • Page 1
  • Next page ››
Subscribe to मराठी गझल

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 4 सदस्य उपस्थित आहेत.
  • spatil
  • Liladhardawande786
  • निलेश देवकर
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 21 *
Who's new नवीन सदस्य
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18
  • Gauspasha Shaikh

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    19 minutes 10 seconds ago
  • लेखनाचा विषय : शेती/महिला…
    2 hours 21 minutes ago
  • अत्यंत हृदयाला भिडणारे आणि मातीशी घट्ट नाळ जोडणारे
    4 hours 3 minutes ago
  • वैचारिक लेखाचा विषय दिलेला…
    5 hours 25 minutes ago
  • अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
    18 hours 5 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ