Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




अभय

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
कथा

विदर्भातील एका छोट्याश्या गावात अभयचा जन्म झाला. घरात अठरा विश्वे दारिद्र्य. तीन एकर जमिनीच्या तुकड्यात आईवडील अहोरात्र खपायचे पण दारिद्र्य काही संपत नव्हते. तीन भावंडात अभय सगळ्यात लहान शांत व हुशार. अशाच हालात मोठ्या जिद्दीने त्याने बी. एस. सी. कृषी ची पदवी संपादन केली व मोठं स्वप्न साकारण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरू केली परंतु वयोमानानुसार आईवडिलांना शेतीतील काबाडकष्ट शक्य होत नव्हते त्यात दोन बहिणी लग्नाच्या. सारा विचार करुन आपलं स्वप्न बाजूला सारत तो गावाकडे परतला आणि बैल व रेड्याच्या कुळवासह शेतीतील सारे कामे करु लागला. अहोरात्र काम.......काम......काम....आणि काम.

एवढे काबाडकष्ट करून दोन वेळच्या जेवणाखेरीज काही शिल्लक पडत नव्हते. त्यात जमीनीवर आणखीन कर्ज घेऊन दोन्ही बहिणींची लग्न उरकली. हुंड्यासाठी वडीलांनी घर आणि दुभती जनावरे सुद्धा विकून टाकली. अभय हे सगळं उघड्या डोळ्यांनी पहात होता. तो प्रचंड आशावादी होता. शेती आणि शेतीच्या विकासा बाबत नवनव्या कल्पना त्यास सुचत होत्या पण खिश्यात एक नवा पैसा नव्हता, मात्र मनात जिद्द होती, स्वप्न होती.

सावकार आणि अन्य देणेकऱ्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. सतत झगडे भांडणं, मारहाण करेपर्यंत त्यांची मजल गेली. इकडे निसर्गाच्या अवकृपेने कष्टाला फळ येत नव्हते. त्रस्त झालेल्या वडीलांनी शेतातल्या बाभळीला गळफास लावून आपल्या आशा आकांक्षेला पूर्णविराम दिला. हा धक्का इतका जबरदस्त होता की ह्या बातमीने आईने दुसरा धक्का दिला. अभयवर तर दुःखाचं आभळचं कोसळलं.

आता पुढे काय करायचे. कुठेतरी नोकर म्हणून काम करायचे कि पुन्हा हे जीवन दुःखी काबाडकष्टी कर्जाचे परत एकदा आजमावून बघायचे. शेतीला आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा म्हणून छातीला माती लाऊन पुन्हा नव्याने त्याने आपले पाय शेतीत रोवले.

मोठ्या प्रयत्नांनी जमवाजमव करुन उभारलेल्या डोलाऱ्यास प्रचंड फळाची चिन्हे दिसू लागली पण काळाने त्यालाही नजर लावली. गारबीच्या पावसाने त्याचं सारं स्वप्न धुवून काढलं.

तो प्रचंड दुःखात क्रोधात होता. बाप लटकून मेलाल्या त्या भल्यामोठ्या बाभळीच्या झाडास त्याने हातातल्या कुराडीने न थांबता जमीनदोस्त केले. नंतर फावडे घेऊन आत्महत्येची आठवण करून देणारी ती शेतविहीर त्याने बुजवून टाकली. तो इतका थकला की रात्रभर शेतातल्या त्या चिखलात तसाच पडून राहिला. आत्महत्येच्या विरोधातला त्याचा हा क्रोध असावा. आत्महिंसा त्याला मान्य नव्हती. या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्याने निवडला अहिंसा! कारण तो अस्तित्वावर प्रेम करणारा होता.

आता कुणाच्या मदतीच्या आशा त्याच्या मनात नव्हत्या. ना घरादाराचं ओझ, ना कर्जाचे भय, ना समाजाचा दबाव, ना कोणते स्वप्न. सारं काही त्याच्या मनातून सहजच निघून गेलं आणि खऱ्या अर्थाने तो अभय झाला. मृत्यूलाही सहजच आलिंगन देता येईल इतकं बळ त्याच्या बाहुत आलं होतं. माणसाचे जग सोडून मानवरहित जगात जाण्याचा त्याने निश्चय केला आणि मेळघाटातल्या खोल दरीत तो उतरू लागला.

दरीतल्या तळालगत त्याने आपल्या निवासाची जागा शोधली. शरीराच्या तहान भूकेसारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी जणू तो अस्तित्वाची परीक्षा घेण्याच्या आवेशात जवळच्या घनदाट परिसरात फिरु लागला. अस्तित्व त्याला जगविण्यासाठी समर्थ असल्याची त्यास जाणीव झाली. नकळतपणे त्याचा हात सदऱ्याच्या खिश्यात गेला. प्लास्टिकच्या पिशवीत त्याने संशोधन करून मिळविलेले नवे वाण नवे बीज त्याला आढळले. आपण जे सोडून आलो ते पुन्हा उभारायचे नाही ह्या भावनेने त्याने ते बीजं टाकुन दिले.

शरीराला जगविल एवढे कंदमुळे गोळा करण्यासाठी तो जवळपास भटकंतीला निघाला. बरेच दिवस पुरेल इतके अन्न गोळा केले. आज त्याला चांदण्यांनी भरलेलं आकाश बघण्याची इच्छा झाली. तसा तो डोंगरमाथ्यावर आला.

अचानक त्याला पश्चिमेकडे अत्यंत पांढरा शुभ्र प्रकाश दिसला. आसमंत त्या तेजस्वी प्रकाशात न्हाऊन निघाला होता. थोड्याच वेळात आगीच्या लाल रंगात आकाश रंगून गेले आणि निळसर काळा गोलक आसमंत व्यापू लागला. त्याने अंतराचा अंदाज घेतला. त्याला सैतान जागृत झाल्याची जाणीव झाली. "हिरोशिमाची पुनरावृत्ती!" हा भयकारी, अभद्र दिवस कधी न उगवावा असं साऱ्या जगाला वाटत होतं. "हायड्रोजन बॉम्ब! परमाणू बॉम्ब पेक्षा अधिक पट! अणूध्वम बाप रे!" क्षणाचाही विलंब न करता तो सरसर खाली उतरला.

आत शिरताच दगडी शिलेने गुहेचं तोंड त्याने बंद केलं आणि गच्च डोळे मिटून तो आसनस्थ झाला. ते भयंकर मृत्यूचे तांडव त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हते. लक्षावधींचे बळी घेऊनही माणसाची रक्तपिपासा संपलेली नाही सैतान जागवण्याचं कार्य आजही जगात सर्वत्र सुरू आहे. सैतान आणि सज्जन ह्या दोन व्यक्ती नाहीतच. एका माणसातल्या त्या दोन प्रवृत्ती आहेत. कुणाला वाढवायच हे त्या माणसावर समाजावर अवलंबून असते. अस्त्रांच्या बळावर जग जिंकण शक्य आहे का... सिकंदर, नेपोलियन, हिटलर किंवा बाबरालाही जमलं नाही.

आणि गौतम बुद्ध, महावीर! प्रेम करुणेच्या बळावर जग जिंकलं त्यांनी. तसं ते त्यांना जिंकायच नव्हतच मुळी. लोकच त्यांना शरण गेले. शंभर वर्षापूर्वी विवेकानंदांनी विश्वबंधुत्वाची साद घालून कुणालाही पराभूत न करता विजय संपादन केला. मग जिंकण्याचा हा मार्ग आहे तर... मन क्षुद्र करुन दुसऱ्याला मारुन किंवा स्वतःला मारुन आपण विजयी होऊच शकत नाही. असा विचार करीत तो मनाच्या अचेतन अवस्थेत दाखल झाला.

कधीतरी त्याची सुप्तावस्था उमलली. तो गुफेतुन बाहेर आला. तो त्याच्या चहूबाजूंनी फुललेली वृक्षवल्ली पाहून त्याचे डोळे दिपून गेले. "फेकलेली बीजं!" तो उद्गारला! त्याने टाकून दिलेली ती बीजं हजार हजार पटीने मोठी होवून त्याला धन्यवाद देत होती. जनु त्याचे कौतुक करीत होती नवजीवन दिल्याबद्दल! फुललेला बगीचा नव्या बीजांनी फळाला आला होता!! पशुपक्षांना माणसांना जीवन देणारा त्याचा मळा कदाचित वाट बघत असावा भुकेल्यांची.

आणि अशातच अस्थीपंजर झालेली माणसे अन्नाच्या शोधात भटकत भटकत त्या परिसरात पोहचली. अणुध्वमाच्या संहाराचे भयंकर परीणाम त्यांच्या शरीरावर दिसत होते. अभयने त्यांना आसरा दिला. फुललेल्या त्या बागेतील फळे त्यांना दिली व त्यांना जगविले.

आज त्याला खुप समाधान वाटत होते. आपण जीवणाची साथ सोडू शकतो पण जीवन आपली साथ कधीच सोडत नाही, नव्हे तो त्याचा स्वभावच नाही. मृत्यू त्यास माहितच नाही. जीवन व्यर्थ आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते व्यर्थ नसून आपणच व्यर्थ विचार करीत असतो.. आपली अशांती निवावी असा त्यास बोध होत त्याचे मन विलीन झाले! तसा तो देह, बाळ आईच्या पोटात असते त्या मुद्रेत डोके ठेवून जमीनीवर नतमस्तक झाला.

Share

प्रतिक्रिया