![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
रखरखणाऱ्या प्रखर उन्हावर गझल लिहीतो आहे
शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे
ज्या प्रश्नाने बळी घेतला माझ्या शेतकऱ्याचा
त्या जगण्यावर...त्या प्रश्नावर गझल लिहीतो आहे
ताटामधला काढुन ज्याने घास जगाला दिधला
त्या कर्णाच्या दातृत्त्वावर गझल लिहीतो आहे
मातीमध्ये जीव पेरुनी देश पिकवला ज्याने
त्यास मिळालेल्या फासावर गझल लिहीतो आहे
या हृदयाला हाय लागते इतकी लिहिताना की
असे वाटते..तप्त तव्यावर गझल लिहीतो आहे
शेतीवर, मातीवर अगदी त्याच्यावरही लिहिले
आता मी त्याच्या मरणावर गझल लिहीतो आहे
त्याची दैना होण्याचे बस् हेही कारण आहे
आणि म्हणूनच कोरोनावर गझल लिहीतो आहे
- महेश बाळासाहेब मोरे (स्वच्छंदी)
प्रतिक्रिया
मातीमध्ये जीव पेरुनी देश
मातीमध्ये जीव पेरुनी देश पिकवला ज्याने
त्यास मिळालेल्या फासावर गझल लिहीतो आहे....
अप्रतिम ... शुभेच्छा सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!