कवी संमेलन/गझल मुशायरा 2017 : नोंदणी

गंगाधर मुटे's pictureतिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

दिनांक : २५ व २६ फेब्रुवारी २०१७
स्थळ : संस्कृती सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली

कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी

नमस्कार,

           तिसर्‍या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.

नियम, अटी आणि सूचना :

 1. शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणार्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने व गडचिरोलीसारखा आदिवासी बहुल भौगोलिक प्रदेश लक्षात घेता सहभागींना मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
 2. ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी कृपा करुन नोंदणी करु नये.
 3. सर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे. स्टेजवर संधी मिळणार असेल तरच मी येणार, रसिक म्हणून येणे माझे काम नव्हे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी सुद्धा कृपा करुन नोंदणी करु नये
 4. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ शेतीमातीशी बांधिलकी राखणार्‍यांची असावी, तिथे व्यक्तिगत अहंभावनेला थारा नसावा.
 5. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे सर्व कामकाज पारदर्शीपणाने व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो.
 6. कॉमन स्वरूपाची निवास व्यवस्था करण्यात येईल. जेवण, फराळ, चहाची व्यवस्था निशु:ल्क असेल.
 7. सहभागींना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाईल.
 8. कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी. काही तांत्रिक अडचण आल्यास abmsss2015@gmail.com या विरोपाव्दारे (इमेल) किंवा बळीराजावरील व्यक्तिगत निरोपाच्या माध्यमातून आमचेशी संपर्क साधावा.

आपण सदस्य असल्यास लॉग इन करा. सदस्य नसल्यास सदस्यत्व घेऊन लॉग इन करा.
*d*  नंतरच खालील लिंकवर क्लिक करा*d*

कवी आणि गझलकारांची नोंदणी 

**********
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
**********

प्रतिक्रिया

ravindradalvi's picture

मा.मुटे सर आपल्या आवाहनानुसार मी तीसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात कवीता सादर करण्यास ईच्छुक आहे कृपया माझी नोंदणी व्हाववी ही विनंती

रवींद्र अंबादास दळवी
नाशिक

गंगाधर मुटे's picture

नमस्कार

खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.

http://www.baliraja.com/node/add/kavi2017

मुक्तविहारी's picture

मा. मुटे सर, माझी नोंदणी कविता व गझल सादर करण्यासाठी करावी. ही नम्र विनंती !

मुक्तविहारी

गंगाधर मुटे's picture

नमस्कार

खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.

http://www.baliraja.com/node/add/kavi2017

विनिता's picture

नोंदणी फॉर्म इंग्रजी मधेच आहे का??

मराठीत टायपिंग करता येत नाहिये.

गंगाधर मुटे's picture

इंग्रजी मधेही चालेल.
फक्त पूर्ण नाव मराठीत लिहावे. म्हणजे नाव प्रिंटींगमध्ये चुका होणार नाहीत.

नाही तर आडनाव फ्यूचर चे फुटुरे व्हायचा धोका आहे.

विनिता's picture

हो ते पण खरे

वैभव भिवरकर's picture

सरजी
नोंदणी केली आहे
धन्यवाद !!

ravindradalvi's picture

ही नोंदणीची स्वयंचलीत पध्दत नाविन्यपुर्ण उपक्रम स्वागत

रवींद्र अंबादास दळवी
नाशिक

विनिता's picture

ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी कृपा करुन नोंदणी करु नये.>>>

गंगाधर मुटे's picture

जो गूण सर्वत्र आढळतो तोच गूण अनेक साहित्यिकातही आढळतो. त्यांची कशाचीच बांधिलकी नसते, त्यांच्यासमोर कुठलेच ध्येय्य नसते. कटीबद्धताही नसते.
फक्त स्वत:ला मिरवणे, एवढेच त्यांचे जिवितकार्य असते. अशा व्यक्तींपासून अ.भा.मराठी शेतकरी चळवळ आपल्याला दूर ठेवायची आहे.

विनिता's picture

अगदी बरोबर आहे सर.
आपली कविता वाचून झाली की पळ काढणारे पण बघतेय.

बाळ पाटील's picture

श्री गंगाधरजी मुटे सर,माझी गझल मुशायर्यासाठी नोंदणी करावी

गंगाधर मुटे's picture

नमस्कार

खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
http://www.baliraja.com/node/add/kavi2017

गंगाधर मुटे's picture

नवीन सदस्यांसाठी कवी आणि गझलकार नोंदणीची सुलभ प्रक्रिया

 1. आपण सदस्य नसल्यास http://www.baliraja.com/user/register या लिंकवर क्लिक करुन सदस्यत्व घ्या.
 2. फॉर्ममध्ये सदस्यनाम भरा. सदस्यनाम म्हणून स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा.
 3. विरोपाच्या बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल E-Mail लिहा.
 4. फॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (ऐच्छिक)
 5. फॉर्म सबमिट करा.
 6. आपण दिलेल्या E-Mail वर आपणास संकेताक्षर किंवा लिंक पाठविली जाईल. त्याचा उपयोग करून Sign In करा / प्रवेश घ्या.
 7. सदस्यत्व घेतल्यानंतर http://www.baliraja.com/user या लिंकवर क्लिक करुन लॉग इन करा.
 8. नंतर http://www.baliraja.com/node/add/kavi2017 या लिंकवर क्लिक करा.
 9. योग्य ती माहिती भरुन प्रकाशित करा या बटनवर क्लिक करा.

आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.

- गंगाधर मुटे

नितीन सुभाष चंदनशिवे's picture

काव्यवचनासाठी नाव नोंदवत आहे...

नितीन सुभाष चंदनशिवे

गंगाधर मुटे's picture

http://www.baliraja.com/node/add/kavi2017 या लिंकवर क्लिक करून आपली नाव नोंदणी करावी.

गंगाधर मुटे's picture

कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी
नोंदणीची अंतिम तारीख - ११/०१/२०१७

vineeta's picture

namaskar sir maz naav kuthech dist naahi....

admin's picture

आता बघा