Ravindra Kamthe
updates its status
October 3, 2019 at 03:03pm
|| श्री ||
दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१९
विषय : विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे*
पद्यलेखन स्पर्धा-२०१९ : विभाग* : अ) पद्यकविता
प्रती,
श्री. गंगाधर मुटे,
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
नमस्कार,
माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या ह्या विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०१९ : वर्ष ६ वे* पद्यलेखन स्पर्धा-२०१९ : विभाग* : अ) पद्यकविता पाठवत आहे.
|| विळखा कर्जाचा ||
आजकाल ह्या पावसाचं काही खरं नाही
त्याच्यावर विसंबून काही राहता येत नाही ||
कधी असते अवकाळी तर कधी कधी दुष्काळी
किती पेरावं कधी पेरावं प्रश्नच पडतात मायंदळी ||
पेरलं तर उगवलं ह्याची खात्री नसते काही
उगवलं तर भीती सतत किड्याकीटकांची राही ||
एखादं बारीला येतं की पिकं हो मुबलक येरवाळी
बाजारभावानं बळीराजाची तोंड मात्र पडतात काळी ||
विळखा कर्जाचा जातो आवळला बळीराजाच्या मानेला
लुटतात सरकार व सावकार दोन्ही हातांनी बळीराजाला ||
जगतो बिचारा आशेवर मिळेल योग्य दाम त्याच्या पिकाला
फिकीर कुठे असते हो त्याच्या ह्या व्यथांची मुर्दाड सरकारला ||
असतात की हो त्याची पण संसाराची स्वप्न हलकी फुलकी
दोनाचे चार हात करून धाडावे लाडक्या लेकीला सुखासुखी ||
नसतो अधिकार बळीराजाला ही असली सुखी स्वप्न पाहण्याचा
रोष असतो त्याच्यावर ज्यांच्यासाठी तो खपतो त्याच शहरी माणसांचा ||
बेजार होतो लाचार होतो परिस्थती पुढे तो माघारही घेतो
कंटाळून शेवटी पत्करून शरणागती गळ्याला फास आवळतो ||
तो जातो उघड्यावर टाकुनी लेकरंबाळ, करुनी विधवा बायकोला
अजुन एक मेला, लटकून, नोंद होते त्याची सरकारी दप्तराला ||
नाही संपत ही शोकांतिका अशी ह्या कर्जाच्या विळख्याची
आज त्याची पाळी होती, तर उद्या असेन अजून कुणाची ||
आपला स्नेहांकित,
रविंद्र कामठे