गज़ल : विळखा अरे ऋणाचा

By Dr. Ravipal Bh… , 10 September 2019
लेखनविभाग
गझल

विळखा अरे ऋणाचा

विश्वलेखन स्पर्धेत सादर केलेली गज़ल - २०१९

फळली मला कधीही नाही कृषी मुळावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.

कर्जास या अता मी फेडायचे कशावर,
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.

जीएम बी बियाणे पेरायला मनाई,
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.

जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या,
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.

'रविपाल ' तू कितीदा ऋण फेडले तरीही,
विळखा महा-जनांंचा पडला तुझ्या घरावर.


• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.

• अक्षर गणवृत्त •
आनंदकन

• लगावली •
गागालगा लगागा गागालगा लगागा

बघितल्या बद्दल धन्यवाद !
शोधखुणा
सदस्याचे पूर्ण नाव

महेश मनोहर देसले

Comment

खुप छान सर

सदस्याचे पूर्ण नाव

केशव बालासाहेब कुकडे ऊर्फ मुक्तविहारी

Picture
सदस्याचे पूर्ण नाव

Pradip thool

Picture

Comment

Ati sunder Dr. Saheb must