नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*काळ्या आईचे वारकरी*
--------------------------------------
काळ्या आईचे आईचे
आम्ही आहोत वारकरी
भाळी मातीचाच बुक्का
हाती कूदळ फावडे
भूई ओलीचिंब ही सारी
साऱ्या घामाच्याच सरी
आम्ही आहोत वारकरी
काळ्या आईचे आईचे
आम्ही आहोत वारकरी ॥धृ॥
तिफनचाडयातूनी खाली
पडती माणीक अन् मोती
आऊत पाभरी राख्या
करीतो मातीआड
कोंब उगती अष्टीगंधी
डोले शिवारं हि सारी
आम्ही आहोत वारकरी
काळ्या आईचे आईचे
आम्ही आहोत वारकरी ॥१॥
पाणी दंडा दंडातूनी
असे वाहते झूळझूळ
रानी पाखरे अन् आम्ही
रोज रंगतो भजनी
घडो वारी ही आईची
सार्थ जिंदगानी सारी
आम्ही आहोत वारकरी
काळ्या आईचे आईचे
आम्ही आहोत वारकरी ॥२॥
सरी वाफ्या वाफ्यातुनी
फूले माईचा हा नेसू
फळे फूले अन् कणसे
इथे विठ्ठल रखुमाई
नको राऊळे गया काशी
रानी वसते पंढरी
आम्ही आहोत वारकरी
काळ्या आईचे आईचे
आम्ही आहोत वारकरी ॥३॥1
*प्रा. डॉ. राजेंद्र अशोक गवळी*
*कुकाणा ता. नेवासा जि. अहमदनगर*